इंदोरनरेश मल्हारराव होळकर

इंदोरनरेश मल्हारराव होळकर

१५ डिसेंबर १७३७ निजाम भोपाळला पोहोचला होता .दक्षिणेतून सैन्यासह नसिर जंग येताच दोन्ही कात्रीत मराठ्यांना चिरडून टाकावे अशी निजामची योजना होती . श्रीमंत बाजीराव पेशवे भोपाळ जवळ पोहोचले. मराठ्यांवर सरळ चाल करून न जाता निजामाने शहराचा आश्रय घेतला .शहराच्या मागे दोन तलाव होते , आणि समोर नाला होता .निजाम आणि अशा रीतीने संरक्षणात्मक पाऊल उचलल्यामुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी लागलीच आक्रमक पवित्रा घेतला .निजामाने संरक्षणात्मक पाऊल उचलले ते निजामा सारख्या नावाजलेल्या सेनापती ला शोभणारे नव्हते . श्रीमंत बाजीरावास याबद्दल आश्चर्य वाटले .निजामाला उत्तरेकडून मदत मिळवून न देण्याच्या कामगिरीत इंदोरनरेश मल्हारराव होळकर गुंतले असल्यामुळे सरदार राणोजी शिंदे, सरदार सयाजी गुजर , सरदार पिलाजी जाधव व इतर सरदार यासह श्रीमंत बाजीराव पेशवे आणि निजामावर चढाई केली. श्रीमंत बाजीराव पेशव्यांस दक्षिणेतच पायबंध बसेल अशी अपेक्षा निजामाची असल्यामुळे श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्यावर चालून आलेला पाहून निजामाची तारांबळ उडाली . या चकमकीत कित्येक लोक मोगल सैनिक ठार झाले . निजामाने भोपाळगडचा आश्रय घेतला .आणि बादशहा व नासिरजंग याचे कडे तातडीने मदती करिता पत्रिका पाठविली.

बादशहाकडून निजामाला मदत मिळणार नाही ही खात्री बाजीरावास होती. कारण खान दौरान वजीर याची निजामाशी वाकडे आहे .त्यामुळे तिकडे फौज येणार नाही. दक्षिणेतून निजामाला मदत येण्याची शक्यता नव्हती .कारण चिमाजी अप्पा तापी नदीच्या काठी ठानमांडून बसलेला होता . तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे आणि चिमाजीला वारंवार पत्र लिहून कळविले , की नासिरजंगला नर्मदा ओलांडू देऊ नये . हा प्रसंग अत्यंत आणीबाणीचा होता . म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी नागपूरकर रघुजी भोसले व इतर मराठे सरदार यांना श्रीमंत बाजीरावाच्या मदतीला जाण्याची आज्ञा केली .

नानासाहेबास ( बाळाजी बाजीराव ) यास जेव्हा वस्त्रे मिळाली . वडीलांबरोबर व चुलता चिमाजी आप्पा यांचबरोबर लहानपणापासून राजदरबार व स्वारीशिकारी जेथें सूत्र सोडले तेथेंच त्यांनी उचलून ते जेथवर नेतां येईल तेथपावेतों आपले २१ वर्षाचे (इ.स.१७४० ते १७६१ ) कारकीर्दीत नेऊन ठेविलें .यातील पहिली ९ वर्षे छत्रपती शाहू महाराज यांच्या थोड्याबहुत हुकूमतीखालींच गेले . ता.१५ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती जेव्हा स्वर्गवासी झाले . निपुत्रिक छत्रपती शाहू महाराजांच्या गादीवर छत्रपती रामराजा (राजाराम दुसरे )यांना गादीवर बसवले. त्यांचा विधीवत राज्य रोहन संस्कार झाला नाही . आणि मराठेशाहीची सर्व सूत्रे बाळाजी बाजीराव ( नानासाहेब पेशवे ) यांची हाती आली .
छत्रपती शाहू महाराज यांच्या निधनाच्या वेळी राजे मल्हारराव होळकरांनी (मानलेला भाचा उमेदसिंह ) होते , तातडीने सातारा नंतर पुणे पोहोचले .
वरील केलेल्या घडामोडी कडे होळकर राजवटीचा इतिहास या दृष्टीने आपणास पहावयाचे आहे. या राजवटीचे प्रस्थापक मल्हारजी होळकर हे शिलेदार पतकी व शेवटी सुभेदार याप्रमाणे श्रीमंत बाजीराव साहेबांच्या तालमीत व कारकिर्दीत वाढले ही इ.स. १७२० ते १७४० या आयन घडामोडीच्या व विजयाच्या काळात बाजीराव साहेबांबरोबर ती सदा सर्वदा सज्ज असत.
या २० वर्षाच्या स्वारी शिकारीत जेथे जेथे त्यांचा उल्लेख कागदोपत्री सापडतो .
या २० वर्षाच्या अवधींत बाजीरावसाहेबांसारख्या कुशल गुरूच्या शिक्षेंचे युद्धविषयक व राजकारणविषयक शिक्षण मिळाले असणार ते खरोखरच बहुमोल असणार . मल्हारजींच्या कामगिरीवरून व त्यांनी आपल्या सुनबाईस ( देवी श्री अहिल्याबाई ) जे शिक्षण दिले त्यावरून स्पष्ट होतेच .

रोहिल्यास नरम करण्यासाठीं मराठी फौजदार अंतर्वेदींत ( गंगा- जमुना यांच्या दुआबा मधला प्रदेश ) गेल्या. बंगशकडे पानिपत पूर्वी असलेले साडेसोळा परगणे मराठ्यांनी मागितले . बंगश लढाईला उभा राहिला . मराठ्यांची छावणी गंगेच्या काठीं रामघाट येथे होती. नद्यांना पूर सपाटून आला होता. बाजूचा मुलुख शत्रूचा होता. सुजा व इंग्रज टपलेलेच होते . अशा स्थितीत मराठ्यांनी युक्तीने यमुने अलीकडे आपले लष्कर हलविलें. नजीबखान मरण पावला .नद्यांचे पाणी ओसरले आणि मराठ्यांना कुच करणें सुलभ झाले . बंगशची फौज समोरासमोर आली . झटापटी तीन-चार महिने चालू होत्या . दरएक प्रसंगी मुसलमानांचाच पाडाव होत गेला. ता.१५ डिसेंबर १७७० रोजी मराठ्यांनी इटाव्याचा किल्ला हस्तगत करून फरूकाबादेवर चाल केली .तेव्हा बंगश शरण आला आणि त्याने मराठ्यांच्या सर्व अटी कबूल केल्या .आणि तोही पुढे थोड्याच दिवसांनी मरण पावला .
याप्रमाणे जाट व रोहिले नामोहरम झाले . नजीबुउद्दौला व बंगश मृत्यू पावले . कंपनी सरकार तर तटस्थ राहिले आणि मराठ्यांसमोर उभे राहण्यास कोणीही राहिला नाही .

गफूरखानाने संधी साधून राजे यशवंतराव होळकरांची पत्नी तुळसाबाई होळकर व मुलगा मल्हाररावांना अटक केली . त्यांचा खून करण्यासाठी जाव-या कडे निघाला .परंतु धर्माकुंवरने बोभाटा केल्यामुळे हा खुणाचा प्रयत्न निष्फळ ठरला . गफूर खानने धर्माकुंवरचा शिरच्छेद करून ठार केले.
मेजर माल्कम ने ‘तालेन ‘येथे आपले सैनिक घेऊन आला. युद्ध करायचे आधीच ठरलेले होते . खुनाचा एक प्रयत्न फसला होता . नवी योजना आखण्याची गरज होती .दरम्यान इंग्रजांच्या हालचालींची खबर लागल्याने तुळसाबाई होळकरांनी ब्रिटिशांशी युद्धाचा निर्णय घेतला. तात्या जोग, जो ब्रिटिशांशी समझोता करावा या मताचा होता त्याला पदावरून हकलून नजर कैदेत ठेवले . राजे यशवंतराव होळकर पुत्र मल्हारराव आणि कन्या भीमाबाई व सर्व सेनानी माहीदपुरकडे ससैन्य निघाले होते. गफूरखान तेवढा मागे राहिला होता . त्यांचे सैन्य मात्र मल्हारराव सोबत रवाना झाले होते .या वेळी होळकरांकडे १०० तोफा , १५ हजार घोडदळ व १० हजाराचे प्रशिक्षित पायदळ होते. यामुळे माल्कम पुन्हा तुळसाबाईशी तह करण्याच्या मागे लागला. ता.१५ डिसेंबर १८१७ रोजी होळकरांच्या तीन वकिलांशी त्याने वाटाघाटी करायचा निष्फळ प्रयत्न केला .

कर्नल ड्यूरेंडसाहेब ऑक्टोबर महिन्यातपावेतों ऑक्टोबर महिन्यात पावतो महूस होते . नंतर मोहूहून फौज घेऊन प्रथम धारेस ( धार ) येथे गेले आणि धारेस कटांतील लोकांस शिकस्त देऊन किल्ला पाहून मंदसौरास गेले . तेथेंही कटांतील लोकांस शिकस्त देऊन महतपुरास जाऊन इंतजाम करून फौजेसह ता.१५ डिसेंबर १८५७ रोजी इंदोरी आले . त्यावेळेस त्यांनी काही तोफा आणि फौज सोळसिंध्यास महूहून परभारे मागविली आणि दुसरे दिवशीं साहेब मोसूफ इंदुरी रेसिडेन्सीत आले . बाणगंगेपावेतों दरबारची मंडळी हत्तीवर बसून पेशवाईस गेली होती .
ड्युरेडसाहेबही हत्तीवर बसले . मंडळींनीं साहेबांस रेसिडेन्सी पावेतो पोहोचविले . साहेब खडखड्या घाटावरून छावणीत गेले . तिसरें प्रहरीं सरकार वाड्यात सरकारचे भेटीस येणार म्हणून तयारी झाली आणि तिसऱ्या प्रहरीं ड्युरेंड साहेब तीस-पस्तीस फौजी ऑफिस रासह (अर्दलीत गोरे व काळे लोक स्वरांची टोळी समागमे होती ). सरकारवाड्यांत आले. बडेसाहेबांची व महाराजांची (द्वितीय महाराज तुकडोजीराव होळकर )ची मुलाखत मोती महालात झाली . साधारण बोलणें चालणे होऊन पान सुपारी देऊन साहेब लोक रुकसत झाले .याच दिवशीं संध्याकाळी सर राबर्ट हामिल्टन साहेब मुंबईहून बग्गीच्या डाकेतून येणार होते व त्यांस घेण्यास सर काशीरावदादा मुंबईच गेले होते .त्यांजकरिता रेसिडेन्सीत बावट्याजवळ डेरे लावले होते , हामिल्टन साहेब रात्रीं आठ वाजतां आले व लागलीच एजन्सीचा चार्ज घेतला . कर्नल ड्युरेंड दुसरें दिवशीच पहाटेस महूस गेले . रामचंद्रभाऊ व खुमानसिंग हे महू पावेतो गेले होते .

महाराजा दुसरे तुकोजीराव होळकर हे जेजुरी श्री मार्तंडाचे दर्शनास जाण्यास निघाले होते. २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी कुच केले . खांडवापर्यंत काही सैनिक सोबत घेतले. त्यानंतर स्पेशल ट्रेन ने मनमाड पर्यंत जाण्याचे ठरले. मनमाड होऊन साकुर ,भांडूंरचे वाटेने पुणे व जेजुरीस जावें . याप्रमाणें हुकूम काढला .ता.१३ डिसेंबर १७७३ रोजी साकूर येथे स्वारी दाखल झाली .श्रीमंत सौ राधाबाई साहेब याच गावातील असून येथे त्यास काही नवस फेडणें होते सबब ता. ता.१५ डिसेंबर १८७३ पावेतों साकुर येथेच मुक्काम होता .

कप्तान बारसाहेब ता.१५ डिसेंबर १८७६ रोजी प्रयाग येथे मुक्कामी होते .स्वारीने त्रिवेणीवर स्नान केले ‌ तिसरे प्रहरी सरकार ( महाराजा दुसरे तुकोजीराव होळकर ) जनरल मिड साहेबाचे भेटीस गेले . सर हेनरी डेली साहेबही तेथेंच होते . सरकारांनी प्रयागचा किल्ला पाहिला .बार साहेब किल्ला दाखविण्यास बरोबर होते . किल्ल्यांत बारूद, गोळे वगैरेची तयारी आहे .४० हजार शिपाई एकदम तयार होतील इतके सामान येथे होते.

श्रीमंत महाराजा दुसरे तुकोजीराव होळकर जनान – खाण्यासह रामपुरा भानपूरकडे स्पेशल ट्रेन ने रवाना झाले. ता.१५ डिसेंबर १८८१ रोजी बक्षीजी (खुमानसिंग ), धोंडो शामराव हे बडेसाहेबांकडे (डेली साहेब ) गेले. जावरा व ठाकूर कडोद्या आणि गुलजी जगन्नाथबद्दल बोलणे झालें . बडेसाहेबांनी रामराव भगवंत मोतमीनाने ( विश्वासू व्यक्ती, मूळ उर्दू शब्द मोअतमिद ) खोटी सही केली आहे . त्यांस महकूब करून दुसरा मोतमीम नेमावा असे सांगितलें . श्रीमंतांस धोंडो शामराव यांनी श्रुत केले .

कर्नाटकचे नवाब सरकारांस ( महाराजा दुसरे तुकोजीराव होळकर ) यास येऊन भेटले . सरकारांनी नबाबसाहेबास ८०० रुपये नगदी व सव्वाशें रुपयांचे कपडे दिले .ता.१५ डिसेंबर १८८२ रोजी कमांडर इन चीफ रात्री रेसिडेन्सीत आले . ते महूस जाताना सरकारांची भेट स्टेशनवर झाली . आपलेकडून इनफंट्री गार्ड आफ आनर होता .सलामीचे ११ फेर झाले .
इसवी इ.स. १८८२-८३ सालचा रेसिडेन्सीत गेलेल्या अहवालातील उतारा खालील प्रमाणे आहे. येकंदर खातेवार उत्पन्न रुपये ७३,८८,४०० असून खर्चाचा तपशील राजघराणें व संस्थांचा इतर बाबी मिळून रुपये ५८,८२,००० आहे .

श्रीमंत महाराजाधिराज राजराजेश्वर सवाई यशवंतराव होळकर ( द्वितीय ) यांचा जन्म ता.६ सप्टेंबर १९०८ रोजी झाला .
तिसरे तुकोजीराव होळकर यांची सुमारे २२ वर्षे कारकीर्द गाजली .त्यानंतर त्यांच्या हयातीतच त्यांचा मुलगा दुसरे यशवंतराव होळकर यांना ता..२६ फेब्रुवारी १९२६ होळकरांच्या गादीवर बसवले ,ते उच्चशिक्षित होते . संस्थानात प्रजेच्या हितासाठी अनेक परदेश दौरे करून सुधारणा घडवून आणल्या . दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा,बाल हत्या प्रतिबंधक कायदा , स्त्री -पुरुष , उच्च -नीच ,जाती _धर्म असे भेदभाव नष्ट केले .आंतरजातीय विवाहाला चालना देत असताना स्वतः आंतरजातीय विवाह करून समाजात आदर्श घालून दिला . त्यावेळचे कोल्हापूर संस्थांचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची चुलत बहीण कागलच्या घाडगे घराण्यातील राजकुमारी चंद्रप्रभाबाई यांच्याशी ता.९ फेब्रुवारी १९२४ रोजी विवाह संपन्न झाला .
इंदोर येथे आयोजित करण्यात आलेला होळकर संस्थान विलीनीकरणाचा सोहळा नयनरम्य होता . सुमारे सव्वा दोनशे वर्षाची परंपरा असलेले बलाढ्य होळकर संस्थान भारतात विलीन झाल्याने देशाची शान वाढली . होळकर संस्थान विलीनीकरणाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या अहवानानुसार हिंदुस्थानात छोटी मोठी राजे विलीनीकरण करण्यासाठी हालचाली सुरू होत्या .विशेषता पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देखील या वीजलीनीकरणासाठी पुढाकार घेतला .ता.१६ जून १९४८ रोजी इंदूर येथे होळकरांचे संस्थान अखंड हिंदुस्तानात विलीनीकरण करण्याचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला .
या विलीनीकरण सोहळ्याला होळकर राज्यातील सर्व सरदार, जहागीरदार ,पाटील हे हत्ती, घोडे यांच्या पलटणीसह सहभागी झाले होते. याशिवाय राज्यातील ३,००० गावच्या पाटलांना निमंत्रित करण्यात आले होते. या वैभवशाली सोहळ्यामुळे इंदोर नगरी गजबजुन गेली होती. होळकरांचे निशाण सजवून हत्तीवरील अंबारीच सन्मानपूर्वक ठेवण्यात आल्यामुळे हे निशाण डौलाने फडकत होते. इंदोर येथील राजवाड्यातून मिरवणूक निघाली, ही मिरवणूक लालबाग पॅलेस कडे मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत निघाली होती. महाराजा दुसरे यशवंतराव होळकर यांनी प्रथम होळकरांच्या ध्वजाला मुजरा केला. त्यानंतर ही मिरवणूक लालबाग महालाकडे निघाले .२१ तोफांची सलामी देण्यात आली.
लालबाग पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या या नयनरम्य सोहळ्यात हिंदुस्थानातील बलाढ्य असलेले होळकर संस्थान अखंड हिंदुस्थानात विलीन करण्याचा निर्णय झाला संपूर्ण होळकरांच्या संस्थानात आनंद पसरला होता. दुसरे यशवंतराव होळकर यांनी अखंड हिंदुस्तान व्हावा यासाठी स्वतः पुढाकार घेऊन होळकरांचे संस्थान भारतात विलीन केले. त्यानंतर पुढे दुसरे यशवंतराव होळकर सार्वजनिक कार्यक्रमात कधीही सहभागी झाले नाहीत . ता.१५ डिसेंबर १९६१ रोजी श्रीमंत महाराजाधिराज सवाई यशवंतराव होळकर यांचे निधन झाले . त्यांच्या पाठीमागे एक मुलगा राजकुमार श्रीमंत शिवाजीराव होळकर (रिचर्ड होळकर ) आणि एक मुलगी राजकन्या श्रीमंत उषा राजे होळकर होते.
अशा प्रकारे हिंदुस्थानातील बलाढ्य असलेले होळकर संस्थान अखंड हिंदुस्थानात विलीन झाले आणि संपूर्ण भारताला बळकटी देण्यास आणि देशाची शान वाढण्यास मदत झाली.
प्रा.मुरहरी कुंभारगावे नांदेड (महा.) ७५८८०६८३१५ .
फोटो साभार:- श्रीराम तळे तांदुळवाडी (सोलापूर) .

1 thought on “इंदोरनरेश मल्हारराव होळकर”

Leave a Comment