ऐशा राजमाता होणे नाही

ऐशा राजमाता होणे नाही


ऐशा राजमाता होणे नाही,
जयांनी दोनदोन छत्रपती घडविले.
ऐशा राजमाता होणे नाही,
जयांनी बळीराजा सुखीसंपन्न व्हावा,
ऐसे बाळकडू दिले,
सोन्याचा नांगर,
शिवरायांच्या हाती देऊन.
ऐशा राजाऊ होणे नाही,
जयांनी राजा हाती तलवार देण्याआधी,
श्रीराम अन् श्रीकृष्ण दिला माथी.
जियेचे अलौकिक स्फूरण लिहिता,
लेखणी थिजती,
शाई न पुरती.
तियेची आज जयंती.
दुजा महाथोर,
जयाचे नांव स्वामी विवेकानंद अपारंपार,
जयाने हिंदू धर्माची महती गायीली सातासमुद्रापार.
ऐकता विश्व,विश्वबंधुत्व,
जाहले शिकागोत स्तिमित.
जयाचा एक एक शब्द बहुमोल,
ज्यांनी धर्ममार्तंडाचे झाडले कान,
विसरले सारे भान,
जडले स्वामी विवेकानंदावरी मन.
आज शुभदिनी करा भिष्मप्रतिज्ञा,
करा धारण दोन्ही विभूतींना,
जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी,
तीच खरी मानवंदना.
तीच खरी दृढनिश्चयी प्रार्थना.
तयांच्या परमपवित्र जयंतीदिनी.
तयांना कोटी कोटी प्रणाम,
तयांच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या कार्यास,
मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन.

Leave a Comment