छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिन

छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिन

॥ जय शिवराय ॥

३ एप्रिल महाराष्ट्रातला काळाकुट्ट दिवस

कारण ३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून निघून गेले.
आभाळातल्या सूर्यालाही कसलीतरी सावली भेडसावत होती. प्रतापी सूर्याला त्या भीषण सावलीचे जणू वेधच लागले होते. सूर्यग्रहणप्रसंगी महाराजांनी नेहमीच्या आचरना नुसार दानधर्म स्नानादि विधी केले आणि एक-दोन दिवस उलटत नाही तोपर्यंतच महाराजांना ताप आला. दिवसेंदिवस चिंता वाढू लागली प्रकृतीला उतार पडेना.
महाराजांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या सरदारांचे, मावळ्यांचे हृदय पिळवटून निघू लागले. प्रत्येक दुपार चढत्या वाढत्या चिंतेत जाऊ लागली.
महाराज मात्र शांत होते. त्यांनी ओळखले होते की, आता आपल्याला जायचे आहे. मासाहेबांना भेटायला. लाडक्या सईबाईना भेटायला .
उपचारांची उणीव नव्हती, जीवात जीव देणारी माणसे होती,परंतु प्रकृतीत उतार पडत नव्हता. उलटणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर राजांचे अवघे रूप पालटत होते. दिवसेंदिवस चिंता वाढू लागली. काय प्रकार आहे हे समजत नव्हते.

अंगात ज्वर होता महाराजांच्या वर जीवापाड प्रेम करणाऱ्या निष्ठावंतांचे चेहरे कासावीस होऊ लागले. ३ एप्रिल १६८० रोजी
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजारपणाने निधन झाले. महाराजांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगणे शिकवले. अन्याय सहन करायचा नाही.
त्याच्याविरुद्ध पेटून उठायचे, हे आपल्या वर्तनातून दाखवून दिले. महिलांशी कसे वर्तन असावे, याची शिकवण दिली. याबाबत प्रसंगी कठोर भूमिका घेऊन शिस्त लावली. महाराजांचा ध्वज भगवा असला तरी लढा कोण्या एका धर्माविरुद्ध नव्हता तो स्वतःच्या रयतेच्या हक्कासाठी सुखासाठी होता.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेरणादायी आहे. त्यातून बरेच काही शिकायला मिळते. त्यातून आपल्या जिवनाला दिशा देता येऊ शकते. आयुष्य कसे व्यतित करावे ते महाराजांनी मराठी माणसाला शिकवले आहे. मराठी माणसाला एवढा मोठा आदर्श उभा राहिला राजांच्या निमित्ताने म्हणून महाराष्ट्र लढवय्या आहे. अखंड काळाची खंत असेल, ऐसा राजा पुन्हा होणे नाही ! राजे आपण इथे नसाल पण आपले विचार आणि आपला  अभास कायम आमच्या सोबत आहे महाराज.


सूर्यास्त होतो, सूर्योदय होतो पण सूर्य कधीच विझत नाही.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतीदिना निमित्त मानाचा मुजरा.

||जय शिवराय  ..जय महाराष्ट्रदेशा ||

||स्मरण ते   देव ..विस्मरण ते ना देव||
शिवस्मरण
करू नका एवढ्यात
चर्चा पराभवाची,
रणात आहेत झुंजणारे
अजूनही काही ,
घाई कशाला शरणागती पत्करण्याची?
विझून माझी चिता युगे लोटली तरीही .१

विझायचे  आहेत राहिले निखारे  काही,                               उगाच नको स्मरण माझे काही,                                                                गनिम गारद करण्याची गरज आहे की नाही?
म्हणून राहीलेले उचला निखारे करा घाई,
गनिम असेल तिथे जळून खाक होई.२

नसेल जमत तर विसरा स्मरण माझे,
दुकानेही बंद करा असतील जी माझ्या नावाची?
स्वराज्याचा ज्वाजल्य इतिहास नाही ओझे,
दाखवा हिंमत जसाचातसा सांगण्याची.३
नकोत भारांभार चोपड्या पुरस्कारांसाठी,
आधुनिक मावळ्यांना दाखवण्यासाठी,
काढून टाका पाट्या ज्या आहेत स्वार्थासाठी,
उभारा स्मारके तयांची अजरामर स्वराज्यासाठी.४

जयंती,पुण्यतिथी साजरी करा प्रबोधनासाठी,
मराठ्यांचा इतिहास मनी निरंतर मनी ठेवण्यासाठी,
नकोच निव्वळ देखाव्यासाठी,
अन्यथा बंद करा ऐशा वृथा खटपटी.५

स्मरण ते देव..
विस्मरण ते ना देव..
स्मरण आज तयांचे.
विश्वश्रेष्ठ राजे शिवरायांचे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्मरण दिनी.
तयांना विनम्र अभिवादन व विश्वातील सर्वात मोठा मानाचा मुजरा.

शिवमावळा

मझिसु प्रा. मगन सुर्यवंशी

Leave a Comment