करुया जय जयकार छत्रपती शिवरायांचा

करुया जय जयकार छत्रपती शिवरायांचा

करुया जय जयकार

अभिमानाने झुकतो अमुचा, माथा वारंवार,
छत्रपती शिवरायांचा, करुया जय जयकार.

शहाजी राजे जिजाऊंच्या,
पोटी जन्मले शिवाजी राजे.
स्वराज्याच्या निर्मितीसाठी, लढले अपरंपार,
छत्रपती शिवरायांचा, करुया जय जयकार.

आदिलशाही निजामशाही,
थरथर कापे बेबंदशाही.
बोटं कापून शाहिस्त्याचे, अफजल केला ठार,
छत्रपती शिवरायांचा, करुया जय जयकार.

गोमातेला रक्षण लाभे,
शेतकऱ्यांचे रक्षक शोभे.
रयतेच्या हिताला त्यांनी, सदैव जपले फार,
छत्रपती शिवरायांचा, करुया जय जयकार.

शिवनेरी अन रायगडाशी,
जुळले नाते जणू प्राणाशी.
राजे झाले जरी किती, असा राजा नाहोणार,
छत्रपती शिवरायांचा, करुया जय जयकार.

© प्रा.बी.एन.चौधरी.
      देवरुप, धरणगाव.
     (९४२३४९२५९३)

करुया जय जयकार छत्रपती शिवरायांचा
छत्रपती शिवराय

श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी

छत्रपती शिवराय

2 thoughts on “करुया जय जयकार छत्रपती शिवरायांचा”

Leave a Comment