श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी न भुतो न भविष्य

श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी



न भुतो न भविष्य :

श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी
महाराजांचे ‘ भारतीय मनावर आजही
आहे गारुड

जगले कमी पण चंद्र ‘ सूर्याची
तेजस्वीता चमकत होती अंगा अंगात
नसा नसात आदर्श चारीत्र्याची खोदून
खाण ‘ पसरविले होते समाजात वाण

शुर मावळ्यांच्या सोबतीने हवेत
उडणाऱ्या बहादशहांना पाजले
होते पाणी वारंवार अपयशांमुळे
आठवायला लावली होती नानी

उराशी स्वप्न एकच की माझ्या
सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचले
पाहिजे दाना पाणी

ज्या ज्या सहकाऱ्यांनी जीवावर
बेतून स्वराज्याची केली होती
उभारणी त्यांसही आजारपणाच्या
वेळी अपूरी पडू दिली नाही नाणी

इतर धर्म ग्रंथांची एखादया प्रतेची
कुणी केली असेल मानहानी ‘ असं
आलं असेल कानी ‘ महाराजांनी
अशी अद्दल घडविली होती की
आयुष्यभर राहील ध्यानी

छत्रपतींचे कार्याच्या महतीची वर्णन
टागोर ‘ टीळक ‘ नेहरु ‘ फुले यांनी ही
केले होते पण कधी ही नाही केले
राजकारण

आज मात्र छत्रपतींच्या नावाने
खुर्ची लालसा ‘ अगणीत संपत्ती ‘
खोटी कीर्ती या मोहाने प्रांत ‘ देश ‘
समाज याची कितीका होईना हानी
तरुणांची कितीका होईना उलटी
गणती या बाबत डोळ्यावर बांधली
मात्र पट्टी

छत्रपतींची जयंती आली रे आली
पुतळ्याला हार तुरे घालून
गुण गुणतात जय भवानी जय
शिवाजी आम्ही मात्र देश एकतेची
सुधारणेची ‘ विकासाची कधीच
करणार नाहीत काशी

फक्त एकच जयंतीच्या दिवशी
ध्यानी ठेवले पाहीजे छत्रपतींची
जशी नाड जुळली होती समाजाशी
गरीबी हटविण्याची  ‘ विकास
कामांची ‘ सर्व धर्म समभावाची
घराणेशाही न जपण्याची
तरच खरी साध्य होईल जयंती
तरच खरी साध्य होईल जयंती


सुनिल भाईदास बोरसे
मोहाडी उपनगर धुळे

श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी
श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी

6 जून शिव राज्याभिषेक सोहळा

1 thought on “श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी न भुतो न भविष्य”

Leave a Comment