श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 9
बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनात घोळत होती. पदरी माणसे गोळा होत होती. मित्रपरिवार वाढत होता. त्यात गुंजवण्याचे येसाजी कंक होते; मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर, नऱ्हेकरांचे बाळाजी चिमणाजी होते. कावजी कोंढाळकर, जिऊ महाला, वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे यांसारखी लहान-थोर मंडळी होती. बाजी पासलकर तर साठीच्या घरातले उमराव; पण • राजांशी त्यांची दाट मैत्री जमली होती. हे साथीदार घेऊन राजे आता स्वतंत्रपणे फेरफटक्याला जात होते. पूर्वी टापांचा आवाज ऐकताच ‘मोगल आले’ समजूनरानाचा निवारा घेणारी माणसे आता टापांचा आवाज ऐकताच ‘राजे आले’ धावत आडवी येत होती; बाळराजांना डोळे भरून पाहत होती. समजून
राजे रांझ्यावरून असेच जात होते. थंडीचे दिवस होते. टापांचा आवाज डोंगरकपारींतून परतत होता. राजांच्या कानांवर अस्पष्ट हाक आली, “राजेऽऽ”
घोड्यांचे लगाम खेचले गेले. परत तीच हाक आली. सारे चौफेर पाहत होते.
येसाजी म्हणाला, ‘राजे! ते पाहा!’
शिवारातून एक इसम धावत येत होता. राजे पायउतार झाले. पळत येणाऱ्या त्या इसमाचा झोक जात होता. एकदा तर तो पडला; तसाच परत उठला, आणि राजांच्या रोखाने • धावू लागला. तो इसम जवळ आला. माथ्यावर टक्कल. कडेने वाढलेले पांढरे केस. पांढरे कल्ले. चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे. धापा टाकीत तो इसम आला आणि उभ्या उभ्या राजांच्या पायांवर पडला. धाप, हुंदके यांनी त्याचे अंग हलत होते. येसाजीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला; पण मिठी सुटत नव्हती. राजांनी हाताने येसाजीला खुणावले. पायांची पकड हळू हळू ढिली होत होती. राजे म्हणाले,
“उठा!”
तो सावकाश उठला.
‘काय झालं? न रडता सांगा.’
‘राजे, काय झालं नाही, म्हणून विचारा!’ परत त्याचे डोळे भरून आले. पुसून तो म्हणाला,
‘राजा, माझं वाटोळं झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती. तिला पळवली. बाटवली. माझ्या पोरीनं जीव दिला. राजा, पोरीविना पोरका झालो मी!’
‘हे कुणी केलं, माहीत आहे?’ राजांनी विचारले. ‘नसायला काय झालं? साऱ्या पाणवठ्यानं सारं पाहिलंय. पन इचारनार कोन?” ‘कोण आहे तो?”
‘कुंपणानंच शेत खाल्लं, राजे! गावच्या पाटलानंच हे केलं.’
‘थांबा इथंच… येसाजी, आम्ही इथं थांबतो. गावात जा, आणि पाटलांना इथं घेऊन या.’
येसाजीने घोड्यावर मांड टाकली. भरधाव वेगाने तो रांझ्याकडे दौडला. राजे त्या इसमाचे सांत्वन करीत होते, सारी माहिती काढून घेत होते. बऱ्याच वेळाने येसाजी आला, पण एकटा. त्याचा चेहरा गोरामोरा झाला होता.
‘काय झालं? पाटील भेटले नाहीत?’
‘भेटले.’
‘मग का आले नाहीत?’ राजांचा आवाज कठोर झाला.
येसाजीने ओठांवरून जीभ फिरविली. तो चाचरत म्हणाला, ‘पाटील मस्तवाल आहे. हुकूम सांगितला, तर तो म्हणाला… ‘जाऊन तुझ्या
राजाला सांग, त्यो नावाचा राजा हाय, तसा मी नावाचा पाटील न्हाई, म्हनाव, गाव माझं. बटीक समजतो.”
‘असं म्हणाले पाटील ? व्वा!’ राजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. संतापाने भान हरपून बाजी म्हणाला,
‘येसाजी, आनी असला निरोप घेऊन आलास? कमरेची तलवार सोबेची हाय काय ?? ‘बाजी, येसाजीनं केलं, तेच बरोबर! नाही तर मोगलाईत आणि आमच्यांत
फरक काय ?’
‘राजे!’ तो इसम हताश होऊन म्हणाला.
‘तुमचं नाव काय?’ राजांनी नजर वळवून विचारले. ‘रामजी खोडे. याच गावचा मी.’
‘काळजी करू नका…. येसाजी, एक स्वार पायउतार करा. रामजींना संगती घ्या.’ रामजीसह सारे पुण्यात आले. वाड्यावर न जाता राजे सरळ पागेकडे गेले. राजांना अचानक आलेले पाहताच स्वार अदबीने गोळा झाले. राजे म्हणाले,
‘येसाजी, पत्रास स्वार घेऊन तुम्ही रांझ्याला जा. पाटलांच्या मुसक्या आवळून, त्यांना उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा.’ येसाजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. येसाजी रामजीसह स्वारांचे पथक घेऊन रांझ्याकडे दौडू लागला.
सकाळी राजे नेहमीप्रमाणे उठले. स्नान झाले. राजे आपल्या महाली ठेवणीचे कपडे करीत होते. चुणीदार विजार घातली होती. अंगात कलाबुतीचा जामा होता. कमरपट्ट्यात बिचवा खोवला होता. कमरेला तलवार लटकाविली होती. दर्पणात पाहून त्यांनी आपला जिरेटोप मस्तकी घातला. कपाळी लावलेल्या गंधावर त्यांची नजर गेली; आणि ते हसले. महालात जिजाबाई उभ्या होत्या. राजांनी जाऊन त्यांचे पाय शिवले. आशीर्वाद देऊन त्यांनी विचारले,
‘काय गोंधळ घातलात, राजे? दादोजींनाही खबर नाही. सारा चौक भरून गेलाय… आणि आज हे सणासुदीचे कपडे बरे?’ ‘नावाचे का असेनात, पण राजाचे कपडे आहेत. … चला, मासाहेब. आजचा
गोंधळ फार मोठा आहे.’
खरेच चौक भरला होता. राजे जाताच मुजरे झाले. पंतांच्यासह सारी दप्तरीची • माणसे गोळा झाली होती. राजांनी नजर फिरविली आणि ते बैठकीवर वीरासन घालून बसले.
‘येसाजी, पाटलांना हजर करा!’
काढण्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले.
‘रामजी, हेच ना पाटील?”
‘महाराज, हाच तो हरामखोर!’ ‘राजेऽऽ’ पाटलाने भयभीत हाक मारली.
राजे हसले. ते म्हणाले, ‘पाटील. आम्ही नावाचे राजे असू. तुम्ही गावचे खरे पाटील असाल; पण आम्ही धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई, बहिणी म्हणून ओळखतो… प्रजेला बटीक समजत नाही!’ येसाजीकडे वळून त्यांनी विचारले, ‘घडला गुन्हा खरा ?”
‘होय, महाराज!’
‘पाटील, प्रजा ही पोरासारखी! ती राखण्याकरिता पाटिलकी दिली… आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केलात? मुसलमानी सल्तनीचे रिवाज आमच्या मावळात पाळलेत? पाटील, जाब द्या!’
पाटील पुढे सरसावले. त्यांनी पंतांचे पाय धरले. म्हणाले, ‘पंत, मला न्याय द्या. गोतमुखानं मला न्याय हवा.’
‘राजेऽऽ’ पंत म्हणाले.
राजे पंतांच्याकडे नजर न वळविता म्हणाले, ‘पंत, तुम्ही यात लक्ष घालू नका.. .पाटील, जरूर तुम्हांला गोतमुखानं न्याय मिळेल; पण अट आहे.’ ‘कसली?’ आशेने पाटलाने विचारले.
‘कसली? रामजीच्या मुलीला उभी करा. तिलाही काही सांगायचं असेल.’ ‘अन्याय आहे!’ पाटील ओरडला, ‘मेलेलं माणूस कधी उभं राहील का?’ ‘बस्स!’ राजे नजर रोखीत म्हणाले, ‘पाटील, गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्यांकरिता असतो; तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांकरिता नव्हे.’
‘पंत, चुकलो! एक डाव माफी करा.’ ‘खामोश!’ राजे संतापाने थरथरत उभे राहिले. ‘ती पोर जेव्हा किंचाळली असेल,
तेव्हा काय कान बहिरे झाले होते? येसाजी, या पाप्याचे हात आणि पाय तोडा. गाढवावर बसवून रांझण्यात नेऊन सोडा. गावचे पाटील आहेत ते! मानानं गावी गेले पाहिजेत. घेऊन जा… शिक्षेची अंमलबजावणी झाल्याचं ताबडतोब सांगायला या.’ आक्रोश करणाऱ्या पाटलांना नेले गेले. राजे महालात आले. पाठोपाठ जिजाबाई, दादोजी आले होते. जिजाऊंच्या अंगाला कापरा सुटला होता. पंत म्हणाले,’राजे, एवढी कठोर शिक्षाऽऽ’
गर्रकन वळून राजे म्हणाले, ‘पंत, मघा बोललो; क्षमा करा! बांदल देशमुख आम्हांला मानीत नव्हते, तर त्यांचे हात-पाय तुटले. शिक्षा कमी व्हायची होती, ती तिथं!’
‘पण, शिवबा…!’
‘मासाहेब, पद्मिनी आठवते? तुमच्या जाऊबाई आठवतात?… नाही, मासाहेब. हे आता थांबवलंच पाहिजे. आमचा नाइलाज आहे. हे होत नसेल, तर आम्हांला ही जहागीर नको, राजेपणा नको, काही नको! त्याची आम्हांला हौस नाही.’
शिवाजीराजे तसेच संतापाने निघून गेले. हतबुद्ध झालेल्या जिजाबाई म्हणाल्या, ‘भलताच भडकतो!’ दादोजी डोळे टिपीत म्हणाले, ‘मासाहेब, आज मी तृप्त आहे. हे पाहायला
आज इथं थोरले महाराज हवे होते. आज शिवबा राजे शोभले. गजाननाला दंडवत
घालून येतो.’
पाटलाचे हात-पाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागला नाही. सारे राजांना धन्यवाद देत होते. पाटील-देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले होते. – आता राजांच्या लहान वयाचा हिशेब कुणाच्या मनात राहिला नव्हता.
‘मासाहेब!’ शिवाजीराजे महालात प्रवेश करीत म्हणाले, ‘आम्ही पहाटे रोहिडेश्वराच्या दर्शनाला जाणार आहो.’
संध्याकाळ होत आली होती. जिजाबाई म्हणाल्या, ‘राजे, संध्याकाळ होत आली. सकाळी तरी सांगायचं नाही? न्याहरी करायची केव्हा?”
‘दोन प्रहरीच ठरलं आमचं.’
‘दादोजी येताहेत?’
‘नाही.’
‘मग?’
‘बाजी, येसाजी, चिमणाजी, बाळाजी हे सारे आहेत.’
‘पंतांना सांगितलंत?’
‘हो. जा, म्हणाले.’
‘ठीक आहे. येणार केव्हा?’
‘परवा येऊ.’
‘मुक्काम ?’
‘नाचणीलाच करणार! बाजीचं घर आहे तिथं.’
‘त्यांच्या घरी राहणार?” ‘मग त्यात काय बिघडलं?’
‘त्यासाठी म्हणत नाही मी. पण, राजे, गरिबाचं घर. राजा घरी आला, तर पार
धुऊन जातं. तुमचे लोक, अश्वपथक!’ “मग नाचणीला स्वार सोडू! वर्दी देऊ!’
‘तोही गावाला भूर्दंडच ना?”
‘मग?’
‘काळजी करू नका, राजे! तुम्ही जरूर बाजीकडे उतरा; पण स्वारांचा शिधा आत्ताच रवाना करा. मी काढून द्यायला सांगते. स्वारांना रांधून घ्यायला सांगा.’ शिवबा आनंदाने बाहेर गेले.
आळंदी, जेजुरी यांसारखी ठिकाणे फिरायला राजांना फार आवडे. त्यांतच
रोहिडेश्वराची भर पडली होती. डोंगराच्या उंच माथ्यावर दाट जंगलात हे शंकराचे
मंदिर होते. निसर्गाने नटलेल्या त्या मुलुखाने शिवाजीच्या मनात ओढ निर्माण केली होती. रोहिडेश्वराच्या अनेक वेळच्या दर्शनांत दादाजी नरसप्रभू गुप्ते यांसारखी मंडळी जिव्हाळ्याची बनली होती. भर दुपारची वेळ असूनही रोहिडेश्वर कसा शांत होता. गार वारा अंगात चैतन्य
आणीत होता. समोर पसरलेला मावळ विलोभनीय वाटत होता. शंभूचे दर्शन घेऊन सारे देवासमोर बसले होते. राजे काही बोलत नव्हते. चिमणाजी नन्हेकर म्हणाले,
‘राजे, आज आपण बोलत नाही.’ ‘काय बोलू, चिमणाजी? नुसतं नावाचं राजेपण मिरवणाऱ्यांना काही बोलता
येत नाही, चालता येत नाही.’
‘कोण नावाचे राजे?’
‘आम्ही! दुसरे कोण? पाहा, गुप्ते, सारा मुलूख कसा बेहोश पडल्यासारखा वाटतो. पूर्वी निजामशाही, आता आदिलशाही. पण मुलुखात काही बदल नाही. शाही फौजा आल्या, की त्यांनी मुलूख लुटायचे; आपला भरणा करायचा. किल्लेदारांनी त्याला हातभार लावायचा… आणि लोक तरी किती निर्लज्ज! हे सारं सहन करतात. बेचिराख झालेली गावं तिथंच उठवतात. बायका-पोरी पळवून नेल्या, तरी काही परिणाम नाही.’
‘राजे, ही कुनाला हौस आहे?’ येसाजी म्हणाला, ‘परजा म्हणजे मेंढरागत. धनगर नाही. अशीच रानोमाळी फिरायची.’ ‘येसाजी, मावळी हाडाची ताकद मला माहीत आहे. साध्या काठीनं लांडगा झोपविणारे मावळे जर एक होतील, तर…’
‘तर काय, राजे…?’
‘तर… तर काय सांगू?’ राजांची छाती रुंदावली. ‘तर आमच्या दैवतांना असं डोंगरकपारी दडावं लागणार नाही. बायाबापड्यांना मोकळ्यावर वावरायला अशी भीती वाटायची नाही. लोक कोण, राज्य कुणाचं ?’
‘पण हे जमणार कसं?’
‘न जमायला काय झालं? हे जहागिरदार, देशमुख, पाटील, कुलकर्णी एक झाले, तर केवढी प्रचंड ताकद वाढेल!’ ‘विजापूरची ताकद कमी आहे होय?’ बाळाजीने शंका काढली.
‘आहे ना! आम्ही बघून आलोय ती. उंटावरून शेळ्या हाकणारी जात बादशहाची, बाळाजी, रामाजवळ कोणाचं सैन्य होतं? रावण तपस्वी होता, योगसामर्थ्यवान सिद्ध होता; पण त्याचा पराभव झाला, तो कशानं? माकडांच्या मदतीनं राक्षसांचा पराभव! तो बळाच्या जोरावर नव्हता; निष्ठेवर होता, बाळाजी! आमच्या जवळ कमी आहे, ती निष्ठा. बळाला तोटा नाही.’
‘बोल, राजा!’ सुभान म्हणाला, ‘कानाला गोड वाटतंय्, बघा.’ ‘हं!’ राजे हसले, ‘सुभाना, सारे कीर्तनकार देवाचा पत्ता, ठावठिकाणा सांगतात, म्हणून कुणाला देव सापडतो का, रे? अरे, कीर्तन ऐकून देव सापडत नाही.’ ‘आमांस्नी सापडलाय्… ‘ सुभाना म्हणाला..
‘कुठं आहे?’
‘तूच आमचा देव!’ सुभाना म्हणाला.
‘खुळा आहेस, सुभाना. बोलून देव होत नसतात.
‘मग काय करायचं, सांग. अरं, तू हाक दिलीस, तर सारा मावळ उठल. तुझं नाव मावळातल्या बायाबापड्यांच्या तोंडांत बसलंय्. देसाई, देशमुख, देशपांडे तुज्या वाड्याचा उंबरठा झिजवत्यात, ते काय उगीच? तसं नसतं, तर रांझ्याच्या पाटलाचं हात-पाय तोडलंस, तवा गप बसली नसती सारी. अरं, रांझं तुज्या वाटेकडे डोळे लावून बसलंय्…”
राजे उठत म्हणाले, ‘चल, सुभाना. विचारांनी डोकं फिरायची पाळी आली. शंकराला दंडवत घालू. त्याला सांगू. त्याच्या मनात असेल, तर सारं होऊन जाईल. नाचणीला येसाजी वाट पाहत असेल.’
नाचणी चिमुकले, दीडदोनशे वस्तीचे गाव. डोंगराच्या कुशीत वसलेले. सारे गाव राजांची वाट पाहत होते. घोड्यांच्या टापांनी एवढेसे गाव भरून गेले. येसाजीची छाती अभिमानाने फुलून गेली. गावचे पाटील म्हणाले,
‘राजे, येसाजीच्या पुण्याईनं आपले पाय गावाला लागले. वाड्यात चलावं. ‘का? येसाजी आम्हांला घराबाहेर काढणार काय?’
“तसं कसं होईल?” ‘पाटील, आम्ही या खेपेला येसाजीचे पाहुणे. पुढच्या खेपेला तुमच्याकडे येऊ बसक्या घराच्या कट्ट्यावर घोंगड्या पसरल्या होत्या. राजांनी पाय धुतले. ते कट्ट्यावर बसले. येसाजीची आई, बायको बाहेर आली. राजे उठले. त्यांनी हात
जोडले. येसाजीच्या आईने पाय धरताच ते वाकले. म्हातारीला उठवीत ते म्हणाले. “आई, येसाजी सुद्धा माझ्याहून मोठा. तुम्ही त्याच्या आई. जसा येसाजी, तसा मी! तुम्ही आशीर्वाद द्यायचे.’ राजे परत बसले.
सारा गाव गोळा झाला. पीकपाणी, अडीअडचणी… साऱ्या गोष्टी सांगितल्या
जात होत्या. येसाजीचे सख्य पाहून लोकांची भीड चेपली होती. त्याच सलोख्याने राजांना ते भेटत होते. त्याच वेळी हवालदार येऊन मुजरा करून उभा राहिला.
राजांनी विचारले,
‘सारी सोय लागली ना?”
“जी!’
‘वैरणकाडी, दाणागोटा… कशाची तसदी गावाला लागू देऊ नका. तक्रार आली, तर मुलाहिजा राखला जाणार नाही.’ ‘राजे, गाव तुमचं. शिधापानी आनलासा. गावाला तुमचा बोजा वाटला असता व्हय ?’
‘तसं नाही, पाटील. आम्ही येसाजीचे पाहुणे आहोत, म्हणून आमच्या अश्वपथकाचा भार येसाजीवर टाकणं खरं नाही. मासाहेबांनी आम्हांला सांगितलं आहे… राजानं वाटेतल्या तुळशीचं पानदेखील तोडताना दक्षता घ्यावी. नाही तर राजानं पान
तोडलं, मागच्या दळाच्या हातात तुळसही उरत नाही.’ ‘बरं आठवलं, बगा!… अरं, कोन हाय? मनूला बोलवा बघू.’
राजे पाहत होते. एक बारा-तेरा वर्षांची रेखीव, कोकणी सौदर्यानं नटलेली
मुलगी राजांच्या पाया पडली.
‘कोण ही?”
‘हिचं नाव मनोहारी, महाराज!’ ‘मनोहारी! नाव वेगळंच वाटतं.’
‘मनोहर मनसंतोष गडाची ही. गडाचंच नाव ठेवलंय् तिचं. ती काल आली.’
‘का?’
‘गडकरी मुसलमान, त्याची नजर पडली पोरीवर पोरगी अनाथ, गडकऱ्यानं जनानखान्यात पाठविण्याचा हुकूम केला. रातोरात गावानं तिला इकडे पाठविली. म्हटलं, राजा येणारच. त्याच्यावर ही जिम्मेदारी सोपवावी.”
राजे हसले. ते म्हणाले, ‘पाटील, याचा निर्णय आम्ही लावू शकत नाही. तुम्ही मासाहेबांच्याकडे हिला घेऊन या. मासाहेब सारं पाहतील. हिंदूची पोर अनाथ झाली, म्हणून ती जनानखान्यात जावी, असं आता व्हायचं नाही.’
“तसं करतो.’ पाटील म्हणाले.
रात्री जेवण झाल्यावर सारे बाहेरच्या कट्ट्यावर बसले. रात्र अंधारी होती. गावच्या उजव्या हाताला अश्वपथकांनी शेकोट्या पेटविल्या होत्या. हवेतला गारवा जाणवत होता. रात्री बराच वेळ शिवाजीराजे अंथरुणावर जागे होते.
भल्या पहाटे शिवबांनी नाचणीचा निरोप घेतला. पुण्याकडे घोडदौड चालली होती. पक्ष्यांच्या थव्यांबरोबर शिवाजीचा जथा टापांचा आवाज करीत कूच करीत होता. पहाटेला रस्त्यावर चरायला बाहेर पडलेल्या रानकोंबड्या फडफडत होत्या. एखादे सांबर भरकन आडवे जात होते. कौतुकाने शिवाजीराजे हे सारे निसर्गसौंदर्य पाहत होते. सूर्य उगवला. उन्हे डोंगरावर आली. डोंगराच्या वळणावर रस्ता सोडून आत गाव वसले होते. झोपड्यांनी सजलेले सह्याद्रीच्या कुशीतले एक घरटे. गावाच्या वर डोंगरकडेला माणसे गोळा झाली होती. राजांनी हात उंचावला. अश्वपथक थांबले.
‘बाजी, गावचे लोक सकाळच्या वेळी डोंगरकडेला का?” बाजीने पाहिले. तो म्हणाला, ‘कोणी तरी गेलं असेल.’
‘तसं वाटत नाही मला. अनेक लोक बोडके आहेत. चला पाहू.’
टापांच्या आवाजाने आधीच सावध माणसे अश्वपथक येताना पाहून भयभीत झाली. काही पांगले. गावाला वळसा घालून घोडी जवळ गेली. राजे पायउतार झाले. लोक पाया पडत होते. वाट देत होते. लोकांच्या मध्ये गाय पडली होती. तिच्याभोवती सारे गोळा झाले होते. राजांनी विचारले,
‘काय झालं?’ मेलेल्या गाईवरून हात फिरवीत बसलेल्या म्हाताऱ्याने नजर वर केली. अश्रू
पुशीत तो म्हणाला, ‘राजा! माझी गाय वाघानं मारली, रं! काल राती घरला आली न्हाई. आज
हुडकून आनली.’ ‘अणि वाघ ?’
‘त्यो हाय रानातच. राजा त्यो! तेला बाहिर कोन काढणार? जलम फुकट
आमचा राजा, अरं, बादशाहीचं लोक येऊन पीक नेत्यात, आनी रानचं राजे येऊन जनावरं नेत्यात. मानसानं जगावं कसं? महिन्यात तिसरं जनावर हे.’ ‘हाय की घळीत. समद्यांस्नी दिसतुया. सोकावलाय त्यो. रान सोडून
‘वाघ आहे?”
कशाला?”
‘बाजी, येसाजी!’
दोघे पुढे झाले.
‘हाका काढून शिकार करू या. आमची बंदूक आहे. कसं?? ‘करू या की!”
“गोहत्या करणाऱ्या वाघाला सोडणं हा क्षत्रियधर्म नव्हे.’ बाळाजी नव्हेकर म्हणाले.
शिवाजीराजा शिकार करणार, म्हटल्याबरोबर त्या चिमण्या गावात एकच उत्साह संचारला. त्याखेरीज अश्वपथकाचे लोक होतेच. घोडी बांधून सारे एकत्र झाले. वाघाच्या ठिकाणाची माहिती काढली गेली. त्याच्या वळणाचा अंदाज घेतला. रानचे माहितगार हुडकून हाकेकऱ्यांच्या बरोबर दिले. वाघाची जागा होती, तेथपासून खालीपर्यंत एक मोठी उतरंडीची घळ होती. तिच्या खाली रान पातळ होते; मोठा माळ लागला होता. त्या रानाच्या जागेवरच शिकारी बसायचे ठरले. राजांनी साऱ्यांना सांगितले, ‘बार झाला, की हाकेकऱ्यांनी झाडांचा आश्रय घ्यावा. तुतारी होईपर्यंत कोणी
उतरू नका. हाकेकरी जंगलात गेले. राजांनी आपला भाला, तलवार, कट्यार सर्व हत्यारे पाहून घेतली; आणि ते शिकारीच्या जागेकडे जाण्यासाठी वळले. बरोबर बाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी वगैरे साथीदार होते. शिकारीची जागा आली. रानाचा अंदाज घेऊन एका मोठ्या जाळीचा आडोसा निवडण्यात आला. बंदूक ठासली जात होती. बंदूक तयार झाली. सारे हाक्याची वाट पाहत होते.
जंगलावर निःस्तब्ध शांतता होती. कुठेच कसला आवाज येत नव्हता. ऊन्ह चढत होते आणि एकदम डोंगराच्या वर हाका सुरू झाला. भांड्यांचे आवाज, आरडाओरडा करीत हाका डोंगरावरून उतरत होता. सावधगिरीने पुढे सरकत होता. पक्ष्यांचे थवे आकाशात भिरभिरले. माकडांचा चीत्कार झाला. हाका सुरू होऊन थोडा वेळ झाला, तोच भेकरांचे टोळके वायुवेगाने खाली उतरले, राजांना डावी घालून दिसेनासे झाले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. बाजीची मूठ पल्लेदार
भाल्यावर आवळली गेली होती. आपले भाले सरसावून सारे रानाकडे पाहत होते. रानाच्या वर खसफस वाढली. बाजीने बोट दाखविले. जाळीतून राजांनी पाहिले. श्वास रोखले गेले; आणि समोरच्या रानातून डुकरांचा कळप बाहेर पडला. अंगावर
ताट केस फुललेले. परतलेल्या सुळ्यांनी भेसूर दिसणारी ती जनावरे हुंदडत जवळून गेली.
शिकार पचवून निर्धास्तपणे झोपी गेलेला वाघ अचानक उठलेल्या कोलाहलाने जागा झाला. दगड कोसळत होते; आवाज वाढत होता. संतापाने गुरगुरून त्याने शेपटी फुलविली; आणि चपळतेने तो गुहेबाहेर पडला. धीमी पावले टाकीत, आवाजाच्या बाजूला पाहत तो घळण उतरत होता.
हाकेकऱ्यांचा आवाज एकदम थांबला. दुसऱ्या क्षणी पूर्वीपेक्षाही ओरडा उठला. भांड्यांच्या आवाजांनी रान दणाणून गेले. माकडे डोंगराच्या माथ्यावरून झाडांचे शेंडे गाठीत, म्हणाले, चीत्कार करीत जंगल उतरत होती. शेंड्यांवरून माकडे दिसताच राजे
‘बाजी, बाघ येतोय्.’
नजर न हलविता राजे रान निरखीत होते. हाका जवळ येत होता… आणि राजांना वाघाचे दर्शन झाले. ते अजस्र धूड संतापाने शेपटी फडकावीत, पंजे रोवीत पुढे येत होते. उचलणाऱ्या पावलाबरोबर त्याच्या अंगाचे पट्टे झळाळत होते. वाघ अगदी समोरच येत होता. राजांनी गुडघ्यावर हात घेऊन बंदूक पेलली. जाळीतून नळीचे टोक पुढे सरकत होते. राजांनी नेम धरला. वाघ टप्प्यात येताच बार उडाला. बारापाठोपाठ वाघाच्या गर्जनेने सारे रान दणाणून गेले. बाराच्या दारूच्या
धुरांडीने जाळी भरून गेली. सारे चूपचाप बसून होते. बार होताच हाकेकऱ्यांनी झाडे गाठली. राजांनी पाहिले. वाघ डरकाळ्या फोडीत जमिनीवर लोळत होता. दमला, की धापत होता; चालण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याचा कणोठाच मोडला होता. हलणे शक्य होत नाही, हे समजताच सारी ताकद लावून संतापाने उशी घेत होता. तोंडात आलेला दगड फोडीत होता. वाघाच्या थैमानात सारे रान थरथरत होते.
‘बार लागला.’ बाजी म्हणाला.
‘शूऽऽऽ’ राजांनी दटावले.
वाघाची गुरगुर थांबली. काळ्या कडांनी सजलेले पांढरे पोट धापत होते. राजे हळूच जाळीबाहेर आले. पाठोपाठ सारे होते.
‘माझा ‘माला…’
‘पण, राजे…’ येसाजी कुजबुजला. “माझी फेक झाल्यावरच गरज पडली, तर फेक करा. चला.”
राजांनी भाला पेलला. जाळीबाहेर सारे आले. पडल्या जागेवरून वाघाने डोळे उघडते. अनर्थाला कारणीभूत झालेला शत्रू त्याच्याच रोखाने पुढे येत होता. वाघ गर्जत उठला; आणि त्याच क्षणी राजांचा फाळ त्याच्या छातीत भसकन घुसला. तोंडाशी आलेली काठी दातांनी फोडीत असतानाच त्याची मान लटकी पडली.• बाजीने फाळ उचलला. राजांनी याला थांबविले. वाघ मेला होता. सारे नजीक गेले… ते प्रचंड धूड पाहत असताना येसाजी म्हणाला, -आणि आनंदाने बेहोश झालेल्या येसाजीने तुतारी उचलली. क्षणात तुतारीचा
‘वाघीण हाय.’
आवाज साऱ्या रानाला शिकारीची वार्ता देऊन मोकळा झाला. आनंदाने बेभान झालेले गावकरी आरोळ्या ठोकीत धावत येत होते. कित्येकांनी भान विसरून शिवाजीराजांना मिठी मारली. त्यांना उचलले.
हाकेकरी गोळा होत होते. एका हाकेकऱ्याने वाघाचे दोन छावे आणले; राजांच्या समोर सोडले. राजांनी एका छाव्याला घेण्यासाठी हात पुढे केला. एका एवढ्याशा छाव्याने पंजा उगारला; ‘ठिस्’ करून दात दाखविले. बळजबरीने छाव्याला कुरवाळीत राजे म्हणाले, ‘या छाव्यांसाठीच एका जागी अडली होती… हवालदार, हे छावे बरोबर घ्या. आपल्या शिकारखान्यात शोभतील.’
एका म्हाताऱ्याने भराभर वाघाच्या मिशा उपटल्या; आणि चकमक काढून जाळल्या. मिशी भारी विषारी, असा समज. म्हाताऱ्याचा ऊर भरून आला होता. पचकन वाघावर तो थुंकला, आणि म्हणाला,
‘शेराला सव्वा शेर एक ना एक दिवस भेटतोच.’
म्हाताऱ्याने राजाला हलू दिले नाही. थोड्याच वेळात गावातून करडी लेझीम
आली. वाघाचे पाय वाशावर बांधले गेले. वाघ उचलायला दहाजण लागले.
साऱ्यांनी उत्स्फूर्त ठोकली, ‘शिवाजी महाराज की जय!’
पाठोपाठ राजांना उचलले गेले. माणसांच्या खांद्यावरून राजांची मिरवणूक निघाली. संकोचून राजे पाहत होते. बाजी, येसाजी, चिमणाजी राजांकडे पाहून हसत होते. गावाचा निरोप घेत असता राजांनी विचारले,
‘गावाचं नाव काय?’
म्हातारा म्हणाला, ‘कुठलं गाव? वरीससुदीक झालं नाही गाव करून.’ ‘मग ‘वाघमार’ नाव ठेवा.’