सरकारने समाजाशी गद्दारी करू नये
सरकारला पहिल्यांदा चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मराठा समाजाच्या भवितव्याचा विचार करत पुन्हा दोन पावले मागे सरकलो. आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारच्या विनंतीवरून आता २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. सरकारने आता मराठा समाजातील नागरिकांशी गद्दारी करू नये. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समाजातील नागरिकांनी राजकीय नेत्यांच्या सतरंज्या उचलणे बंद करावे,
मनोज जरांगे यांच समाज बांधवांना आवाहन
■”मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मागे पळू नका. आता सरकारनेही समाजाच्या भावनांशी खेळू नये. मराठा समाजातील गोरगरीब मुलांना २४ डिसेंबरपर्यंत सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा अध्यादेश काढून आरक्षण द्यावे. एक डिसेंबरपासून गावागावांत साखळी उपोषण करून सरकारवर दबाव वाढवा. परंतु, हे साखळी उपोषण शांततेच्या मार्गाने करा. यात इतर समाजातील नागरिकांच्या भावना दुखावतील असे वर्तन करू नये.”
भूलथापांना बळी पडू नका’
■”राजकीय नेत्यांच्या मागे फिरून त्यांना मोठे करण्यापेक्षा आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आरक्षण लढ्यात सक्रिय सहभागी व्हा. राजकीय नेते आता दोन समाजांत भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना कुणीही बळी पडू. नका. राजकीय नेते आपल्या जिवावरच मोठे झाले आहेत. आता आपली वेळ आली, तर ते आपल्या मुलाबाळांसाठी एकही शब्द बोलायला तयार नाहीत. त्यामुळे तुम्ही हुशार व्हा,” असाही सल्ला मनोज जरांगे यांनी उपस्थित नागरिकांना दिला.
