मराठा सेवा संघाचे बडोदा येथे राष्ट्रीय अधिवेशन
National convention of Maratha Seva Sangh at Baroda

जय जिजाऊ माँसाहेब
सिंधू संस्कृतीच्या व सर्व पुरोगामी महामानवांच्या विचारांवर चालणारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व वैज्ञानिक, आधुनिक, पुरोगामी विचारांचे वैचारिक प्रबोधन करणार्या मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन बडोदा, गुजरात येथे दिं ९ डिसेंबर २०२३ शनिवार रोजी दादा भगवान मंदिर, डभोई रोड, बडोदा येथे नरेश श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड यांचे वंशज महाराज नरेश श्रीमंत महाराज समरजीत सिंह गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
उद्घाटन सत्राचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर (संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ) असतील, याप्रसंगी विशेष अतिथी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज श्री राजवर्धन कदमबांडे (माजी आमदार) श्री सी आर पाटील (खासदार नवसारी) श्री विजय नवल पाटील (माजी केंद्रीय उपमंत्री) सौ. संगीता पाटील (आमदार सुरत) सौ रेखा खेडेकर (माजी आमदार) सौ. डॉ लीना पाटील पोलीस उपयुक्त श्री एम जी मुळे (माजी आमदार कर्नाटक) डॉ नरेंद्र पाटील (उपमहापौर, सुरत) श्री रणजीत सिंह चौहान ( माजी महापौर बडोदा) सौ धरती देवरे (माजी सभापती जिल्हा परिषद ) श्री कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ) हे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने, व जिजाऊ वंदनाने सुरुवात होईल.
प्रथम सत्र
याप्रसंगी अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष श्री सुनील गणदेवीकर (लेखक व विचारवंत ) हे मनुष्य व मानवता ‘या विषयावर मांडणी करतील तसेच श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांचे जीवन कार्यावर स्लाईड शो व व्याख्यान श्री चंद्रशेखर पाटील सादर करतील तसेच सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन कार्याचा परिचय व योगदान विषयावर सुप्रसिद्ध लेखक संजय बच्छाव व्याख्यान देतील त मराठा सेवा संघ काल, आज व उद्या या विषयावर व्याख्यान देतील.
दुसरे सत्र
दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष श्री डॉ सोपानराव क्षिरसागर (राष्ट्रीय अध्यक्ष, अर्थकोष कक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा सेवा संघ काल, आज व उद्या या विषयावर श्री प्रा. दिलीप चौधरी हे व्याख्यान देतील या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी इंग्रजी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या शिवधर्म दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन होईल.
तिसरे सत्र
श्री प्रदीप पाटील ( राष्ट्रीय महासचिव, मराठा सेवा संघ) यांच्या अध्यक्षतेखाली सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व संलग्नित सर्व कक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे कार्य अहवाल व मनोगत मांडले जाईल.
चौथे सत्र
श्री कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा सेवा संघाचे देशातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष व कंक्षाचे प्रदेशाध्यक्ष कार्य अहवाल व मनोगत मांडतील व खुले सत्रात चर्चा, संवाद होईल. व विविध ठरांवावर चर्चा होऊन मंजूर करण्यात येऊन केंद्र व संबंधित राज्य सरकारांना ठरावाचे विषय कळविण्यात येतील.
समारोपीय सत्र
श्री पुरुषोत्तम खेडेकर (संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ) यांच्या अध्यक्षतेखाली होईल, या प्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा विज्ञान क्षेत्रात व सेवा संघाचे संघटनात्मक राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण व प्रमुख
मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर करतील. अधिवेशनाच्या सुरुवातीला स्वागत पर राष्ट्रीय अधिवेशनाच्या नियोजन समितीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब पवार मांडणी करतील व प्रास्ताविक डॉ संजय पाटील (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ) करतील. व अधिवेशनाचा आढावा वआभार प्रदर्शन गुजरात प्रदेशाध्यक्ष श्री अशोक पवार करतील.
दिंडी
अधिवेशनाच्या सुरुवातीला ग्रंथ दिंडी व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे व महाराज सयाजीराव गायकवाड व राष्ट्रीय महामानवांच्या प्रतिमांसह, ग्रंथ दिंडी वारकरी , छत्रपती च्यां वेशभूषेत, अश्वांवर, खान्देशी सुंभळ वाद्याने दिमाखात प्रारंभ होईल.
सांस्कृतिक कार्यक्रम
दिं ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी गुजरात राज्यातील व बडोदा शहरातील कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील तसेच दिं ९ डिसेंबर रोजी समारोपीय सत्रा नंतर संध्याकाळी देशभरातील विविध राज्यांतील कलाकारांच्या सहभागाने सगितसुर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद कलात्मक कार्यक्रम सादर करतील.
या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन नियोजन समिती चे अध्यक्ष श्री भाऊसाहेब पवार, प्रदेशाध्यक्ष श्री अशोक पवार, प्रदेश महासचिव श्री डॉ गिरीश ठाकरे आदरतिथ्य समिती च्या सौ कोकीळा पवार, श्री उज्वल सिंह गायकवाड, विचारपीठ समिती चे श्री परिमल सोंडकर, श्री पंकज बोरसे, भोजन समिती चे श्री साहेबराव पाटील, श्री गजेंद्र महाराज,
प्रवास मार्गदर्शक श्री संजय बोरसे, सौ राजश्री साळुंखे, प्रचार प्रसिध्दी समिती चे श्री प्रकाश पाटील, श्री वाल्मिक पाटील, श्री विजय जाधव, संकलन समिती चे श्री सुनील मोरे, श्री धनराज पाटील,
सांस्कृतिक समिती च्या श्रीमती वत्सला पाटील, कु. हेमांगीनी सोनवणे, सन्मान समिती चे श्री शांताराम पवार, श्री राजेन्द्र कदम, निवास समिती च्या कु मिनाक्षी खैरनार, सौ देवश्री पाटील, श्री शरद पाटील, श्री चंद्रकांत अंतरोलकर, सभागृह समिती चे श्री माधवराव पाटील, श्री शरद पाटील, वैद्यकीय समिती च्या डॉ जिज्ञेशा पाटील, डॉ प्रियांका ढोलारे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे

2 thoughts on “मराठा सेवा संघाचे बडोदा येथे राष्ट्रीय अधिवेशन”