मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लिहिलेल्या आंतरवाली सराटी ते मुंबई पुस्तकाला देशभरातून मागणी
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरूणाने आपल्या जिवाची बाजी लावत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला,
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली ते मुंबई हे पुस्तक ८ डिसेंबरला प्रकाशित झाले. प्रकाशनापूर्वीच वा पुस्तकाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मागणी होऊ लागली आहे. पत्रकार प्रताप नलावडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रकाशनापूर्वीच राज्यभरातून अनेकांनी या पुस्तकासाठी नोंदणी केली असून तामीळनाडू, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरातमधूनही वाचकांनी पुस्तकासाठी नोंदणी केली आहे.
पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून अतिशय प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे. आंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज, सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवाद जसा या पुस्तकात आहे, तसाच मनोज जरांगे पाटील यांच्या एकूणच वीस वर्षाच्या आंदोलनाचा आढावाही आहे. त्यांच्या रोखठोक शैलीतील भाषणांचा आणि राज्यव्यापी दौऱ्याचाही वृत्तांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे. मराठा आरक्षणाची आवश्यकता, आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे, कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी, आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणाची केलेली मांडणीही या पुस्तकात आहे.
राजकीय मंडळींशी जरांगे पाटील यांचा झालेला वाद आणि बीडमध्ये आंदोलनाला लागलेल्या हिंसकवळणाचीही कहाणी या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.
आरक्षणाची गरज मराठा समाजाला का
आरक्षणाचा लढा घराघरात पोहोचविण्यासाठी मनोज जररांग पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणासाठीचा लढा घराघरात पोहोचविण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असल्याचे बीएफएम इंटरप्राईजेसच्या वतीने सांगण्यात आले. आरक्षणाची गरज मराठा समाजाला का आहे, याचीही मांडणी वा पुस्तकातून करण्यात आलेली आहे.
पुस्तकाची ऑनलाईन मागणी कशी करावी
पुस्तकाची ऑनलाईन मागणी करण्यासाठी ९४०४६७६५०७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बीएफएम इंटरप्राईजेसच्या वतीने करण्यात
आले आहे. ना नफा ना तोटा, अशा तत्वावर या पुस्तकाची विक्री करण्यात येत आहे.
1 thought on “मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लिहिलेल्या आंतरवाली सराटी ते मुंबई पुस्तकाला देशभरातून मागणी”