मराठा सेवा संघच्या राष्ट्रीय अधिवेशनात उत्कृष्ट समाजसेवेसाठी निमगुळ च्या दिपक आर पाटील यांचा सन्मान

मराठा सेवा संघच्या राष्ट्रीय अधिवेशनात उत्कृष्ट समाजसेवेसाठी निमगुळ च्या दिपक आर पाटील यांचा सन्मान

बडोदा गुजरात येथे झालेल्या मराठा सेवा संघ 2023 च्या राष्ट्रीय अधिवेशनात उत्कृष्ट समाजसेवेसाठी निमगुळ च्या दिपक आर पाटील यांचा सन्मान

9 डिसेंबर रोजी गुजरातमधील बडोदा येथे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. सध्या सुरत (मूळचे निमगुळ तालुका जिल्हा, महाराष्ट्र) येथे वास्तव्यास असलेले दिपक आर पाटील यांचा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याची विशेष दखल घेऊन मराठा सेवा संघ द्वारा त्यांचा सन्मान करण्यात आला. दिपक पाटील के समस्त मराठा.कुणबी पाटील समाज वेल्फेर ट्रस्ट सुरत चे संस्थापक व मराठा सेवा संघ दमण दिनाचे प्रभारी आहेत
.समाजासाठी सामाजिक जनजागृती करण्यासाठी वैद्यकीय शिबिर, शिवजयंती वकृत्व स्पर्धा, तरुण-तरुणींच्या लग्नासाठी परिचय पुस्तक, करियर मार्गदर्शन शिबीर, पोलिस भरती मार्गदर्शन शिबीर, कोरोना काळात गरजू लोकांना औषधी, खाऊ, फूड किटचे वाटप करण्यात त्यांनी केले तसेच. लग्न जमलेल्या आणि विवाह इच्छूक युवक युवतींसाठी कलेक्टर साहेब कडून परवाना पास काढून सरकारी नियमांचे पालन करवुन 14 जोडप्यांना लग्नासाठी मदत केली.कोरोना काळात कलेक्टर साहेब यांच्या कडून आपत्कालीन गावात जाणाऱ्या लोकांना मार्गदर्शन पास काढून दिले तसेच त्यांना मार्गदर्शन केले . समाजातील तरुणांसाठी पोलीस भरतीसाठी 160 युवकांसाठी 6 महिने मोफत प्रशिक्षण वर्ग चालवण्यात आले. 5 वर्षापासून समाजातील तेजस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सन्मान सोहळ्याचे आयोजन करून समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व बालकांचा गौरव करण्याचे कार्य तसेच बेटी बचाओ, समाजाच्या विविध समस्यांसाठी सदैव मदत केली, अशा विविध सामाजिक कार्याची मराठा सेवा संघातर्फे नोंद घेऊन दीपक आर पाटील यांचा गौरव करण्यात आला.

दीपक पाटील यांचे सहकारी मित्र व गावातील वरिष्ठ ग्रामस्थ मंडळी यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या

Leave a Comment