मराठा कुणबीच्या नोंदी प्रस्थापितांनी दडवून ठेवल्या होत्या
1805 पासून 2023 पर्यंत आरक्षणाच्या नोंदी प्रस्थापिताने दडवुन ठेवल्या होत्या. मात्र आतापर्यंत ३५ लाख नोंदी सापडल्याने काही लोकांची सोय झाली आहे. त्यामुळे आरक्षणाचा ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के आरक्षणाचे काम २४ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अन्यथा पुढची दिशा मुंबई की अन्य काय हा निर्णय १७ डिसेंबरच्या सराटी येथील बैठकीत ठरवू, असे प्रतिपादन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावरील (दि.१०) विराट सभेला संबोधित करताना केले.
५०० किलोचा फुलांचा हार प्रारंभी घालण्यात आला. हुतात्मा समकापासून सभास्थळापर्यंत ५१ जेसीबीद्वारे फुलाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना जराग पाटील म्हणाले की, आरक्षणासाठी कधी नव्हे तो मराठा समाज एक त्र आला आहे. १९३१ साली इंग्रजांच्या काळात ओबीसीच्या नोंदी घेतल्या गेल्या नाहीत. १९५१ साली मंडळाच्या शिफारशीनंतर १४ टक्के आरक्षण मिळाले व १९९४ ला ३० टक्के आरक्षण कसे काय दिले गेले? हे मोठ गौड बंगाल आहे. १९८९ ला मराठा आरक्षणातून ओबीसी बाहेर कोणी काढले, हे सर्वांना माहीत आहे. मात्र आता ३५ लाख नोंदी कशाबशा सापडल्या या कुणी दडपून ठेवल्या होत्या? ८० टक्के नांदी सापडल्या आहेत. याच आधारावर मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे यासाठी हा लढा सुरू आहे.
गरज आहे पुन्हा एकजूट कायम ठेवण्याची, पुन्हा अशी संधी मिळणार नाही. जातीपेक्षा पक्ष, नेत्याला मोठे म्हणू नका. ओबीसी प्रवर्गात येण्याचे मराठ्यांचे निकष पूर्ण झाले आहेत त्यामुळे आरक्षणाला कुणीही रोखू शकत नाही. छगन भुजबळ हा येवल्याचा येडपट माणूस असून मला येडा म्हणतो मग जेलमध्ये हुशार माणूस कसा काय पिठलं भाकरी खात बसला, अशी टीका केली. ७० वर्षे सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी मराठ्याचा गैरफायदा घेऊन सत्ता भोगली. ज्यांना ज्यांना समाजाने माठे केलं तेच आरक्षण विरोधी आहेत त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीच्या मुला बाळाच्या कल्याणासाठी समाजाला आरक्षण मिळवून देईनच. १७ डिसेंबर रोजी सराटीत बैठक घेऊन २४ डिसेंबरला भूमिका ठरवू. २६ डिसेंबर नंतर मंत्रालयात मंत्रालय कसे आहे ते पाहू भाकरी पिठले घेऊन जाऊ म्हणत २४ डिसेंबर नंतर मुंबईत धडकणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. मुस्लिम बौद्ध समाज बांचवाकडून चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रारंभी संतोष साळुंखे यांनी मराठा आरक्षण प्रबोधन केले. सकाळ दुपारपासूनच समाज बांधवांसह महिला भगिनींची पण मोठी गर्दी झाली होती. यावेळी सीमावरती कर्नाटक भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.