सयाजीराव गायकवाड यांनी तत्कालीन काळात घेतलेले निर्णय देशाला दिशा देणारे ठरले श्री समरजीत सिंह गायकवाड

सयाजीराव गायकवाड यांनी तत्कालीन काळात घेतलेले निर्णय देशाला दिशा देणारे ठरले श्री समरजीत सिंह गायकवाड

मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन दिं 8 व 9 डिसेंबर रोजी दादा भगवान मंदिर, बडोदा येथे संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे वंशज नरेश श्रीमंत समरजीत सिंह गायकवाड महाराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विचार पिठावर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर स्वागताध्यक्ष श्री सुनील गणदेवीकर प्रमुख अतिथी माजी आमदार सौ रेखाताई खेडेकर आमदार सौ संगीता पाटील, सुरत डॉ.नरेंद्र पाटील ,उपमहापौर सुरत, श्री एम जी मुळे, माजी आमदार कर्नाटक,मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कामाजी पवार ,राष्ट्रीय महासचिव श्री प्रदीप पाटील श्री विजय घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनाची सुरुवात जिजाऊ वंदनाने झाली याप्रसंगी उद्घाटक श्री समरजीत सिंह गायकवाड म्हणाले महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्या काळात सर्व समाजांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे ,गरजूंसाठी शिष्यवृत्ती देणे व सक्तीचे शिक्षण असे कायदे केले होते या अनुषंगाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तीन वेळा शिष्यवृत्ती देऊन उच्चशिक्षित केले महाराज गायकवाड यांनी बडोदे संस्थानात राबवलेले उपक्रम व कायदे यांचा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उपयोग झाला तसेच मराठा सेवा संघाच्या समाजप्रबोधनाच्या कार्याची प्रशंसा केली.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष श्री गणदेवीकर यांनी मनुष्य व मानवता याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देऊन प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तिगत आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून आपल्यातील उनिवा व दोष याचा शोध घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात बदल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खेडेकर म्हणाले ,बडोदा नगरीत देशभरातून अनेक राज्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव आलेत यांचे मला मनापासून आनंद होत आहे,समाज बांधवांनी फक्त नोकऱ्या मागे लागण्यापेक्षा स्वतःच्या उद्योग व्यवसायावर जोर देणे आवश्यक आहे त्यासाठी बूट पाॅलीस पासून डोक्याच्या मालिश पर्यंत कोणताही व्यवसाय करायला लाजता कामा नये व मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करून प्रशासनातील व उद्योगातील महत्त्वाचे स्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.बडोदा विमानतळाला महाराज सयाजीराव गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी ऐवजी सयाजीराव गुजरात राज्य असे नाव देण्याची मागणी करण्याची सुचना दिली.
या प्रसंगी आमदार सौ संगीता पाटील यांनी महाराष्ट्र बाहेरील मराठा समाज बांधवांनी केलेली वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन कौतुकास्पद प्रगती केले आहे मात्र त्यांनी आपापल्या न्याय हक्कासाठी व सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी बडोद्याच्या विमानतळाला महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव देण्यात यावे तसेच पुनर्विवाहास प्रोत्साहन देणे व हुंडा देणे ,घेणे, मानपान देणेघेणे पद्धत बंद करणे तसेच देशातील सर्व मराठा समाजास केंद्र व संबंधित राज्य सरकारांनी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण द्यावे हे ठराव अधिवेशनात सर्वांनुमते मंजूर करण्यात आले .
याप्रसंगी श्री संजय बच्छाव यांनी श्रीमंत महाराज सर सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन चरित्रावर अंत्यंत महत्वपूर्ण माहिती विषद करून व्याख्यान दिले .
तसेच मराठा सेवा संघ काल आज आणि उद्या या संदर्भात मराठा सेवा संघाची वाटचाल विषयी व्याख्यान श्री डॉ सोपानराव क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा दिलीप चौधरी यांनी दिले .
अधिवेशनाच्या उत्तरार्ध सत्रात मराठा सेवा संघाच्या विविध कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे कार्य अहवाल व मनोगत श्री प्रदीप पाटील राष्ट्रीय महासचिव यांच्या अध्यक्षतेखाली झाले याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ डॉ निर्मला पाटील व सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री दिलीप साळुंखे यांनी मनोगत मांडले .
तसेच मराठा सेवा संघाच्या सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचे कार्य अहवाल व मनोगत श्री कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी दिव दमनचे प्रदेशाध्यक्ष श्री गणेश पाटील, हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष जिले सिंग खेंची राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी श्री समरजितसिंह गायकवाड महाराज यांच्या हस्ते देशातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी चां सन्मान करण्यात आला त्यामध्ये
उत्कृष्ट राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ संजय पाटील, संगीतसुर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद चे डॉ सतिष पावडे, उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ निर्मला पाटील, उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्षा, मराठा सेवा संघ दमन दिव चे श्री गणेश पाटील उत्कृष्ट प्रदेशाध्यक्ष (प्रथम क्रमांक), मराठा सेवा संघ छत्तीसगड चे डॉ रविंद्र दाणी यांना उत्कृष्ट प्रदेशाध्यक्ष (द्वितीय क्रमांक) मराठा सेवा संघ हरियाणा चे श्री जिले सिंह खेंची उत्कृष्ट प्रदेशाध्यक्ष (तृतीय क्रमांक) मराठा सेवा संघ गुजरात चे प्रोत्साहनात्मक श्री अशोक पवार (प्रदेश अध्यक्ष , मराठा सेवा संघ गुजरात) प्रोत्साहनात्मक श्री अनंतराव निकम, प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ दादरा नगर हवेली,विशेष सन्मान श्री भाऊसाहेब पवार (अध्यक्ष नियोजन समिती राष्ट्रीय अधिवेशन) श्री डॉ गिरीश ठाकरे प्रदेश महासचिव, मराठा सेवा संघ गुजरात यांचे सन्मान पत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अधिवेशन यशस्वीतेसाठी राष्ट्रीय अधिवेशनाचे नियोजन समितीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब पवार व प्रदेशाध्यक्ष श्री अशोक पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ संजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी अधिवेशनासाठी सहकार्य केलेल्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तसेच विविध समाज संघटनेच्या प्रमुखांचा प्रशस्तीपत्र द्वारे सन्मान करण्यात आला.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुजरात मधील कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्याचे नियोजन कुमारी हेमांगी सोनवणे यांनी केले. दुसऱ्या दिवशी गुजरात बाहेरील इतर राज्यातील कलावंतांच्या सहभागाने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक परिषदेच्या पुढाकाराने झाले श्री कामाजी पवार यांनी गुजरात राज्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अधिवेशन दिमाखात साजरा केल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त केले व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हेवे ,दावे, मानसन्मान व भेदभाव करण्याचे बाजूला ठेवून समाज हितासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले
विशेषतः अधिवेशन यशस्वीतेसाठी श्री सौ कोकीळा ताई पवार, श्री साहेबराव पाटील, कालेश्वर सोनवणे, कृष्णा पाटील,राजु पाटील, श्री संजय बोरसे, पकंज बोरसे आदींचा सन्मान करण्यात आला*

Leave a Comment