श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 5
बाल शिवाजी वर्षाचा झाला, त्या वेळी मुलुखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले. गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुखातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारीत नव्हते. जिकडे जावे, तिकडे भुकेकंगाल लोकांच्या झुंडी वाटा अडवून बसलेल्या असत. जिवाची आशा सोडून मृत्यूच्या तयारीने सज्ज झालेले ते जीव मूठभर धान्यासाठी हवे ते अत्याचार करावयास मागे-पुढे पाहत नव्हते. सारा मुलूख असुरक्षित बनला होता. पक्ष्यांनी तर केव्हाच मुलूख सोडला होता. राहिली होती फक्त घारी आणि गिधाडे. ती मात्र सदैव आकाशात घिरट्या घालताना नजरेला येत होती. साऱ्या प्रदेशात धष्ट पुष्ट कोणी दिसत असतील, तर तेवढेच! मेलेल्या प्राण्यांना आणि माणसांना तोटा नव्हता! याच दुष्काळाबरोबर शहाजहानची स्वारी दक्षिणेत थैमान घालीत होती. दुष्काळातून तग धरून राहिलेल्या उरल्यासुरल्या वस्त्या मोगलाईच्या स्वारीखाली बेचिराख होत होत्या. सारा मुलूख दोन वर्षांत बेचिराख झाला.
विश्वासरावांनी गडाचा कडेकोट बंदोबस्त ठेविला होता. गडाचे दरवाजे सदैव बंद असत. आत येणाऱ्या माणसाची कसून चौकशी झाल्याखेरीज त्याला आत सोडले जात नव्हते. गडाची इतर टाकी केव्हाच कोरडी झाली होती. गंगा-जमुना अर्ध्या राहिल्या होत्या. पाण्याचा वापर कसोशीने होत होता. अंबारखाना आणि गंजीखाना जीवमोलाने राखला जात होता.
शिवाजी दोन वर्षांचा झाला. त्याचा वाढदिवस गडाच्या थंडीत साजरा झाला. थंडी संपली. उन्हाळा आला. सारे पावसाची प्रतीक्षा करीत होते. मनातून देवाला नवस बोलत होते….
एके दिवशी दोन प्रहरी पूर्वेला ढगांची कनात धरली गेली. वारा मंदावता मंदावता थांबला. कनात आकाशात चढत होती. काळी भोर. लक्खन वीज चमकली; आणि मंद गडगडाट घुमला. बाल शिवाजीसह सारे तटाकडे उभे राहून त्या ढगांच्याकडे पाहत होते. एक चक्री वादळ धुळीचा भोवरा खेळवीत माळवदातून निघून गेले. पूर्वेचा गार वारा सुटला. शिवाजीने विचारले,
‘पाऊस आला?’
‘होय, राजा! आलाच तो.’
पुन्हा वीज चमकली. आसमंत त्या आवाजात कडाडून गेले. शिवाजी आईला बिलगला. जिजाबाई शिवाजीला घेऊन आत गेल्या. पावसाचा पडदा आदब बजावीत पुढे येत होता. ताड ताड गारा पडू लागल्या. तटाखालचे सारे वाड्यात आश्रयाला
“धावले. गारा फुटून उडत होत्या. शिवाजी त्या वेचण्यासाठी सदरेत धावत होता.. गारांपाठोपाठ पाऊस कोसळायला लागला. सारी गटारे तुडुंब भरून वाहू लागली. •सगळ्या वाडाभर गळत्या झाल्या. पण त्याचे कुणाला दुःख नव्हते. मातीच्या वासाने सारे वातावरण धुंदावले होते.
पाऊस थांबताच सारे वाड्याबाहेर पडले. एका पावसाने धरित्रीचे रूप पार बदलून टाकले होते. पूर्वेला इंद्रधनुष्य पडले होते. शिवाजीने तिकडे बोट दाखवले; व तो म्हणाला,
‘आई, ते बघ!’
“बाळ, ते इंद्रधनुष्य!’
शिवाजी पुटपुटला; पण काही जमले नाही. तो लाजला.
वळवाचे पाऊस चांगले झालेले पाहताच एक दिवस जिजाबाई विश्वासरावांना म्हणाल्या,
‘संकट टळलं! चालू साली मनाजोगा पाऊस पडेल.’ ‘असं दिसतं खरं.’
‘पाऊस नव्हता, तो पाऊस आला. आता कशात अडलं?’ ‘राणीसाहेब! पाऊस पडला; पण गावं ओस पडली, तिथं जमिनी कसणार
कोण ??
‘कोण म्हणजे? जे आहेत, ते.”
‘जुन्नरची उरली निम्मी वस्ती गडावरच आहे.’ ‘मग गड खाली करू या.
‘आँ!’
‘आँ काय? मुलूख सोडून गेलेली माणसं परत आपल्या घरी येईपर्यंत त्यांची जमीन, घरं दारं यांचे तुम्हीच जबाबदार! आपण सगळे खाली जाऊ. तेवढी शेती पेरून घेऊ.’
साऱ्या गडावर उत्साह संचारला. शाही मेणे गडाखाली उतरले. जुन्नरचा वाडा गजबजून गेला. गावाच्या घरांवरून उगवलेले, जागच्या जागी वाळलेले गवत पाहून जिजाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले. जनावरं हाताशी होती, तेवढी गोळा करण्यात आली. गडावरचा लोहार- जो आजवर अस्सल हत्यारे तयार करीत होता, तो नांगरांचे फाळ बसवू लागला. सुतारशाळेत कुळव, दिंडोरी तयार होऊ लागली….. आणि एके दिवशी सुमुहूर्तावर भूमिपूजन करून नांगरट सुरू झाली. उन्हावलेली माती फुलून जमिनीवर आली. पावसाच्या पाण्याने कुकडी नदी भरून गेली.
हंगाम पाहून पेरण्या झाल्या. शिवारावर हिरवी कळा दिसू लागली. डोंगरचे रान गर्द पालवीने परत एकदा सजले. लेण्याद्रीतून आणि आजूबाजूच्या डोंगरकपारीतून दुधाचे प्रवाह झिरपू लागले.
दुष्काळात परागंदा झालेली माणसे आशेने परत गावी येत होती. उभारलेल्या शिवाराने आनंदून कष्टांत सामील होत होती.
विश्वासराव वाड्याबाहेर पडले, की हट्टाने शिवाजी त्यांच्याबरोबर असे. उन्हातून, पावसातून तो विश्वासरावांच्या पुढे बसून घोड्यावरून फिरत असे. वाढती पिके कौतुकाने पाहत असे.
जिजाबाई म्हणत,
‘हा कुणबावा होणार, वाटतं.’
‘मग त्यात काय बिघडलं? आमच्यासारखे मालक सगळ्यांनाच मिळतात. पण
शेतकरी मालक मिळणं कठीण.’
जिजाबाई समाधानाने हसल्या.
मुलूख जरा स्थिर झालेला पाहताच उमाबाई जायला निघाल्या. जिजाऊंना बरोबर चलण्याचा त्यांनी खूप आग्रह केला; पण जिजाबाई तयार झाल्या नाहीत. त्या म्हणाल्या,
“सासूबाई! मला का इथं राहण्याची हौस आहे? पण स्वारीचं सांगणं झाल्याखेरीज
मी कशी हालू?” उमाबाई काही बोलल्या नाहीत. जिजाऊ-शिवाजींना आशीर्वाद देऊन एके दिवशी त्या वेरूळला निघून गेल्या.
वर्षभरात परत जिजाबाई गडावर आल्या. मोगलांची नोकरी सोडून शहाजीराजांनी निजामशाही उभी करण्याचा प्रयत्न केला. मोगलांनी दौलताबाद घेतले, तरी शहाजीराजे हताश झाले नाहीत. त्यांनी नव्या शहाला माहुलीवर नेऊन ठेविले. विजापूरकर आणि मोगल एक झाले. या दोन प्रचंड शाह्यांशी मुकाबला करणे इतके सोपे नव्हते. निजामशाहीचा अस्त झाला. शहाजीराजांनी स्वतः फौज उभारली; आणि मोगलांशी सामना दिला. एका जहागिरदाराने नवा बंडावा उभारून मोगली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळा. दोन वर्षांत प्रबळ मोगली सत्तेने बंडावा मोडून काढला; आणि नाइलाजाने शहाजीराजांनी विजापूरकरांची नोकरी पत्करली. यात सहा वर्षांचा काल निघून गेला. सहा वर्षांच्या दीर्घ कालानंतर शहाजीराजांना स्वस्थता, स्थैर्य प्राप्त झाले.
या मधल्या काळात शिवाजी शिवनेरीवर मोठा होत होता; तट्टावरून रपेटी करीत होता. लेगसाठी आणि आळबाजूचा मुलूख त्याच्या नजरेखालून जात ह शास्त्रीबुवांनी त्याला अक्षरांची ओळख करून दिली होती, • सात वर्षे गेली, आणि विजापूरहून खलिता आला. खलित्याबरोबर घोड होते. शाही मेणे होते, काबाडीचे बैल होते. जिजाबाईनी खलिता उघडला. शहाजीराजांना पुण्याची जहागीर मिळाली
त्यांचा अत्यंत विश्वासू, चौकस व शहाणा माणूस दादोजी कोंडदेव त्यांनी पाठविता
होता. दादोजींच्या बरोबर पुण्याला हलण्याची आज्ञा होती. जिजाबाईंनी दादोजींना बोलावणे पाठविले. दादोजींनी सदरेवर येऊन मुजग •केला. वार्धक्याकडे नुकतेच झुकलेले गौर कांतीचे दादोजी उभे होते. मस्तकी पागोट, अंगात अंगरखा आणि पायी तलम धोतर होते. रुंद कपाळ आणि तीक्ष्ण नजर त्यांचा दरारा वाढवीत होती. जिजाबाईंनी वाकून नमस्कार केला. शिवबांना त्या म्हणाल्या,
‘राजे, दादोजींना मुजरा करा.’
शिवाजीराजांनी मुजरा केला. दादोजी म्हणाले,
“राणीसाहेब, आम्ही मुजरा करायचा; राजांनी नव्हे.’ ‘इतरांत आणि आपल्यांत फरक आहे. आम्हांला का ते कळत नाही? आमची • जबाबदारी उचलण्यासाठी इकडून ज्यांना पाठविण्यात आलं, ते का कमी विश्वासाने असतील?’
“राणीसाहेब, केव्हा निघायचं?’
‘आपण म्हणाल, तेव्हा! सध्या स्वारी कुठं आहे?’
‘राजे कर्नाटकाच्या मोहिमेत गुंतले आहेत, ते मोकळे असते, तर तेच आले असते.’ ‘शेवटी ज्यांनी आपली जहागीर जाळली, त्यांच्याच पदरी नौकरी करायची पाळी आली ना!’
‘राणीसाहेब, राजकारण एकपदरी नसतं. ते अनेकपदरी असतं. राजकारण येणाऱ्या प्रसंगाबरोबर बदलत असतं. ज्या मुरार जगदेवानं पुर्ण जाळलं, त्याच मुरार जगदेवाबरोबर राजांचं एवढं सख्य वाढलं की, नांगरगावाला महाराज जगदेव यांची शहाजीराजांच्या देखरेखीर्न पार पडली. नांगरगावचं ‘तुळापूर’ झालं, राजकारणाचे परत डाव फिरले. फासे उलटे पडले आणि मुरार जगदेव आदिलशहांच्या अवकृपेला बळी पडले. त्यांचा अत्यंत क्रूरतेनं वध झाला.’
‘आणि स्वारी ?’
‘राजांचं आदिलशाहीत जेवढं वजन आहे, तेवढं कुणाचंच नाही. राजांना बारा हजारांची मनसब आहे; ‘राजा’ ही किताबत आहे. पुणे-सुप्याची जहागीर त्यांच्याकडेच • आहे. ऐश्वर्यसंपन्न, अधिकारसंपन्न, राजे बंगळुरात सुखाने वास्तव्य करीत आहेत;
आपल्या पराक्रमानं आज कर्नाटक गाजवीत आहेत.’
दोन दिवसांत जिजाबाईंची तयारी झाली. सहा वर्षांच्या परिचयात गडावरचा प्रत्येक माणूस घरचा बनला होता. विश्वासराव, लक्ष्मीबाई यांसारखी माणसे सोडून जात असता आतड्यांना पीळ पडत होता. गडावरच्या साऱ्या माणसांना जिजाबाईनी शिवाजीच्या हस्ते देणग्या दिल्या. चांगल्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईनी जिजाऊंची ओटी भरली. भरल्या मनाने जिजाबाईंनी शिवाजीसह शिवाईचे दर्शन घेतले; आणि विश्वासराव लक्ष्मीबाईंनी त्यांना निरोप दिला.
दुपार टळल्यानंतर शिवबाने उद्ध्वस्त पुण्यात प्रवेश केला. एखाद्या पुरातन शहरात प्रवेश केल्याचा भास होत होता. तटांचे ढासळलेले बुरुज एके काळचे वैभव सांगत होते. ढासळलेल्या जमीनदोस्त वास्तू ठायी ठायी दिसत होत्या. त्यांच्यावर घाणेरीची झुडुपे फोफावली होती. त्यांची तांबडी-पिवळी फुले जीवनाची आठवण देत होती. वाड्याचे उद्ध्वस्त अवशेष एके काळच्या दराऱ्याची खूण सांगत होते.
गावच्या नदीकाठाला झोपड्यांतून वस्ती करून राहिलेले लोक आलेल्या लवाजम्याने भयचकित झाले होते. दुरून ते भयभीत नजरेने कविल्याकडे पाहत होते. एका मोकळ्या जागेत येताच पंतांनी हात वर करून इशारत दिली. कबिला थांबला. मेण्यातून जिजाबाई उतरल्या. दासीपरिवार गोळा झाला. कावाडीच्या बैलांवरून सामान उतरले जाऊ लागले. शिवबा भोवतालच्या ओसाड, भग्न वास्तूंवर
नजर टाकीत होता. त्याने विचारले,
‘मासाहेब, हेच पुणं?’
‘होय!’
‘इथं तर आपल्याशिवाय कुणी दिसत नाही.’
‘बोलावलं, तर सारे येतील.’ ‘राहायचं कुठं? कुठं आहे वाडा?”
‘वाडा हेरून राहायचं नसतं, राजे! मोठी माणसं वाडे बांधून राहतात.’
शामियाना उभारला गेला. भोवताली राहुट्या पडल्या. मुळामुठेच्या संगमावरचे पाणी मावळत्या सूर्यकिरणांत प्रकाशमान झाले होते. जहागिरीच्या वारसाने उद्ध्वस्त वास्तूवर प्रथम दिवा लावला होता.
दादोजी कोंडदेवांच्या समोर उद्याचे पुणे दिसत होते. दादोजींच्या बरोबर शिवाजी फिरत होता. बुजलेले लोक गोळा झाले होते.
एके दिवशी शिवबा धावत आला. ‘मासाहेब, पंतांना देव सापडला.”
‘कुठं ?”
‘नदीजवळ.’
जिजामाता उठल्या. दासीच्यासह जिजाबाई जात होत्या. शिवबा वाट दाखवीत होता. जिजाबाई येत असताना दिसताच सारे अदबीने उभे राहिले, बाजूला झाले. पंतांच्या चेहऱ्यावर कौतुक होते. विटकरांच्या ढिगाऱ्याखाली लपलेला गणेश मोकळा झाला होता. मूर्ती सुंदर होती, अभंग होती. जिजाऊंनी हात जोडले. पंत म्हणाले,
‘मासाहेब! सुरुवात तर चांगली झाली. “हो, ना! पंत, याच जागेवर सुंदर मंदिर बांधा.’ पंतांनी होकार दिला. ते म्हणाले, ‘पण, मासाहेब, अजून वाड्याची जागा नक्की
ठरत नाही.” ‘वाड्याची जागा देवळाजवळच असू द्या.’
वाड्याची आखणी झाली. भूमिपूजन होऊन वाड्याच्या जागेवर दादोजी कोंडदेवांनी पहिली कुदळ मारली. दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा, हे दादोजींना मान्य नव्हते. सुरक्षिततेच्या दृष्टीते ते योग्यही नव्हते. त्यांनी खेडबारे खोरे दुसऱ्या वस्तीसाठी निवडले. वाड्यासाठी जागा निवडली. गावठाणाची मर्यादा घातली…. आणि खेडबाऱ्यात दुसऱ्या वाड्याचे बांधकाम सुरू झाले. परगण्याचे हवालदार म्हणून बापूजी मुद्गल नन्हेकर यांना नेमले.
पावसाळा आला. तेव्हा पंतांना शिवाजी-जिजाबाईंच्या वास्तव्याची चिंता पडली. ती नन्हेकरांनी दूर केली. त्यांचा खेडबाऱ्यात वाडा होता, तो त्यांनी दिला. शिवबा जिजाबाईसह खेडबाऱ्यात राहू लागला. पंतांच्या बरोबर पुणे-खेडबाऱ्यासह त्याच्या खेपा होत होत्या. नवीन उठणारे वाडे, होणाऱ्या वस्त्या तो पाहत होता. शास्त्रीबुवांच्याकडे सकाळ-संध्याकाळ शिकत होता. सवड मिळाली, तर आईला रामायण-महाभारत वाचून दाखवीत होता.
वाडे बांधले जात होते. विहिरी पाणी शोधीत उतरत होत्या. पुणे-खेडबाऱ्यात शेकडो माणसे या कामात गुंतली होती. मुलुखाचे गवंडी, सुतार, बारा बलुतेदार ही वार्ता ऐकून पुणे-खेडबाऱ्यात धाव घेत होते. कामाचे गरजू येत होते..
खेड-पुण्याचे वाडे तयार झाले. विहिरींना मुबलक पाणी लागले. खेडपेक्षाही पुण्याचा वाडा बुलंद, देखणा होता. दोन प्रशस्त चौक धरून दिवाण सदर होती..
खासे सदर होती. राणीवशाचे महाल होते. कोठी, स्वयंपाकघर होते. सुबक देवघर होते. त्याखेरीज पागा, गोशाळा होती, ती निराळीच. वाड्याच्या वास्तूबरोबर गावठाणातल्या वास्तू उभारल्या जात होत्या. दादोजींनी पुण्याच्या वाड्याचे नाव ठेवले ‘लाल महाल’. लाल महालाला लागूनच होते ‘श्रीगजानन मंदिर’
शिवाजीराजे पुण्याच्या वाड्यात आले. दादोजींनी फडाची निवडक माणसे गोव्या केली. पागा सजली. पण गावचे वतनदार, हक्कदार बाहेरच होते. दादोजींनी त्यांना बोलावणे पाठविले. सारे गोळा झाले. पुण्यात वस्ती करण्याचे आवाहन दादोजींनी पुढे केले. एक पाटील म्हणाले, “पंत, तुम्ही म्हंतासा! पन किती डाव गाव मांडायचं आनी मोडायचं? वतन
नको हाय व्हय आमास्नी? पन कसल्या धीरावर गाव जोडायचा?” “आम्ही नाही जोडला?’ सदरेच्या बैठकीवर हे ऐकत बसलेले शिवाजीराजे म्हणाले. ‘तुमांस्नी मानूसबळ हाय, धनी!’
पंत म्हणाले, ‘मोडलेला डाव मांडायला मराठा कधी भ्याला, असं मी पाहिलं
नाही. पाटील, खरं सांगा…’
‘बोलू का?’ पाटील गलमिशांवरून पालथी मूठ फिरवीत म्हणाले, ‘हाय, तितं सुख न्हाई. पंत. गाव मिळालं, तर तेवी साऱ्यांस्नी पायजेच हाय. पन मन घाबरतं…’ ‘कशाला ?’
‘देवीच्या म्होरच्या चौकावर पार मारलिया न्हवं? घरटं उठवायला कोण धर्जल ?”
पंत विचारात पडले. त्यांनी साऱ्यांना निरोप दिला.
चार दिवस पंत गडबडीत होते. एके दिवशी साऱ्यांना परत पाचारण केले. शेकड्यांनी माणसे गोळा झाली. वाड्याच्या दारात वाजंत्रीवाले होते. जिजाऊंनी देवघरात सोन्याचा नांगर पुजला. देवाच्या पाया पडून नांगर उचलला गेला. नांगराबरोबर पंत, शिवबा चालत होते. जरी टोप, अंगरखा, पायांत सपाता, कमरेला छोटी तलवार आणि पाठीला ढाल लावलेली बालराजांची मूर्ती सारे कौतुकाने पाहत होते. वाड्याबाहेर देखणी बैलजोडी उभी होती. कलाबतूच्या झुली त्यांच्या पाठींवर होत्या. नांगर वाड्याबाहेर आला. हे पाहणाऱ्यांत वतनदार होते, पाटील होते, कुणबी होते, बारा बलुतेदार होते. नांगरासह मिरवणूक देवीच्या चौकात वाजत गाजत आली. चौकात भली थोरली पहार नजरेत येत होती. पंतांनी कुदळ उचलताच पाटील पुढे झाले. त्यांनी पहार खिळखिळी केली. पंतांनी सर्वांच्या वरून नजर फिरवली; आणि ‘हर हर महादेव’ म्हणून त्यांनी ती पहार उपसली. शेकडो मुखांतून ‘हर हर महादेव’चा गजर उठला. सोन्याचा नांगर जोडीला जुंपला गेला; आणि शिवाजीराजांच्या हातून पुण्याची उद्ध्वस्त वास्तू नांगरली गेली.
सोन्याचा फाळ जमिनीला लागला.
दुसऱ्या दिवसापासून निश्चिंत मनाने गाव वसू लागले. ओसाड शेतांवर औ जाऊ लागली. दिवस पावसाचे होते. एके दिवशी पंत जिजाऊंना म्हणाले, “मासाहेब, आज राजांना घेऊन शिवापूरला जाऊन येतो.’
‘का?’
शिवापूरला वाड्यानजीक आंब्याची बाग उठवायचं ठरलं आहे. राजांच्या हातून बाग लावतो. काल रात्रीच रोपं आल्याची वर्दी आली. त्यामुळं कळविता आलं नाही. साऱ्याच गोष्टी कुठं सांगता आम्हांला ?”
चमकून दादोजींनी विचारले, “असं कधी झालंय का? कोणती गोष्ट लपवून
ठेवलीयू मी?” जिजाबाई हसून म्हणाल्या, “स्वारांनी धाकट्या राणीसाहेब आणल्याची वर्दी कुठं दिलीत ?”
‘कुणी सांगितलं आपणांला 2 ‘पटलं ना? शिवनेरीवरच लक्ष्मीबाईनी आम्हांला सांगितलं. एवढंच नव्हे, तर
तुकाबाई राणीसाहेबांना मुलगा झाल्याचंही कळलंय् आम्हांला.’ ‘गडबडीत राहून गेलं खरं…’ दादोजी पुटपुटले.
*****