श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8
राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते; पायरीवर आलेला न्याय जिजाबाईनी गोतमुखाने सोडविलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते, भजनी लोक येत होते. भजन-कीर्तनांत राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचरे. खरा कंटाळा येई, तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर थोर माणसांच्या बरोबर फिरण्यात त्यांचे मन थकत असे. जायला हवं.’
सकाळी दादोजींनी राजांना सांगितले, ‘राजे आज नाणेमावळात
‘परत केव्हा येणार?’ जिजाऊंनी विचारले.
‘पाच-सहा दिवस तरी मोडतील. पुष्कळ हिशेब राहिला आहे. ‘ राजे नाराजीने दादोजींच्याकडे पाहत होते. दादोजींच्या ते लक्षात आले. ते म्हणाले,
‘पाहा, राजे! जहागीर तुमची. मोठ्या राजांच्याकडून हौसेने ती घेतलीत. आधीच तंट्याबखेड्यांनी भरलेली. मालकाशिवाय रेटणार कशी? तुम्हांला कंटाळा येत असेल, तर तसं सांगा. मी महाराजसाहेबांना कळवून टाकतो.’ ती मात्रा बरोबर लागू पडत असे. शिवाजीराजे आपोआप घोड्यावर स्वार होत.
मावळात फिरत असता राजांचे लक्ष मुलुखात उठलेल्या, आकाशाला टेकलेल्या
गडांच्याकडे जायचे. ते पंतांना विचारायचे, ‘पंत, हे गड कुणाचे?’
‘आदिलशाहीचे.’
‘जहागीर आमची, आणि गड त्यांचे कसे?’
‘राजे, जहागीर म्हणजे मालकी नव्हे. फक्त वसुलाचा हक्क तुम्हांला. पण सत्ता आदिलशाहीचीच!’
मावळात शिवाजीराजांचा दरारा खूप होता. त्यांच्या नावाला फार मान होता. दादोजींच्या बरोबर आलेले शहाजीपुत्र पाहताच साऱ्यांच्या माना झुकत होत्या. देशमुख प्रेमाने वळत होते. प्रजेला राजा पाहायला मिळत होता. त्यांच्या सुखदुखांना वाचा फुटत होती. सामोपचाराबरोबरच प्रसंगी दंडनीतीचादेखील दादोजी वापर करतात, हे राजे पाहत होते. गुंडगिरी, अरेरावी करणाऱ्या बांदल देशमुखांना जबर शिक्षा केल्यामुळे मुलुखाचा वाढलेला आदर राजांच्या ध्यानी येत होता.
वाड्याच्या पुढच्या चौकसदरेवर राजे एकटेच बसले होते. मागे मासाहेब उभ्या होत्या. त्या केव्हा आल्या, हे शिवबांना कळले नाही. जिजाबाईंनी विचारले,
“राजे, एवढं टक लावून काय पाहता ?’ नजर न काढता राजे म्हणाले,
‘मासाहेब, मुंग्या किडा पकडून नेताहेत, ते पाहतो आहे.’ “मग त्यात काय एवढं पाहायचं?’
‘केवढा मोठा किडा आहे! मघापासून पाहतो आहे. किडा जिवंत आहे. सुटण्यासाठी धडपडतो आहे. पण मुंग्यांपुढं काही चालत नाही. चारी बाजूंनी जेर केलंय् त्याला.’
जिजाबाईंचे उत्तर आले नाही. राजांनी मागे पाहिले. जिजाबाई आत गेल्या होत्या. राजांची नजर दरवाज्याकडे गेली. एक इसम येत होता. सावळा, उंचापुरा. चेहरा तुकतुकीत होता. डोळ्यांत हसू होते. काढणी बांधली, तर श्वासाबरोबर तुटेल, अशी छाती होती. गुडघ्यापर्यंत धोतर होते. अंगात भरड्या वस्त्राची बंडी होती. बंडीचा डावा खांदा फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. खांदा जखमी होता. रक्ताचे ओघळ पंज्यापर्यंत येऊन हातावर वाळले होते; पण वेदनेचा लवलेश चेहऱ्यावर नव्हता. हातातली जाडजूड भरीव काठी पेलीत तो आत आला.
त्याने चौकात नजर टाकली. शिवाजीला पाहताच मुजरा करून तो म्हणाला, ‘राम राम! शिवाजीराजांचा हाच वाडा न्हवं?”
‘होय. का?’
‘काम व्हतं.’
‘वरती ये!’ राजांनी फर्माविले.
‘आँ?’
शांतपणे राजे म्हणाले, ‘वरती ये.’
बिचकत तो इसम वर आला.
‘बैस.’
‘पन…’
‘बैस, म्हणतो ना!’ राजांची नजर पाहताच तो बसला. शिवाजीराजे उठले. त्यांनी काही न बोलता त्याचा हात पाहिला; आणि ते ओरडले, ‘कोण आहे तिकडे?’
चारी वाटांनी हुजरे धावले. प्रथम आलेल्याला राजे म्हणाले,
‘देवडीवरचे कुठं गेले? जा, वैद्यांना ताबडतोब बोलावून आण.’
नोकर गेला. राजांनी विचारले,
‘नाव काय तुझं?’
‘भीमा. लव्हार हाय मी.’ चूक सुधारीत भीमा म्हणाला, ‘….सरकार.’
एव्हाना दादोजीही उठून बाहेर आले. राजांनी भीमाला विचारले, ‘का आला होतास?’
‘सांगू का? मी ह्या मुलुखाचा न्हवं. आमी तिकडचं…. साताऱ्याचं. दुस्काळ पडला, तवा मुलूख सोडून मोगलाईत गेलोतो. वाटंनं येत हुतो. रान हुतं. आन् आलं की अंगावर.’
‘कोण?’ राजांनी विचारले.
‘लांडगं, वंऽऽ… चुकलो, सरकार!’
“मग?’
‘तीन हुते. आडरानात एकटा माणूस मी. हातात निस्ती काठी. करनार काय? घेतलं देवाचं नाव, आन् म्होरं आलंल्यावर हानली काठी. ते धूड मागं कोलमडलं.. उरलेलं मागं ठिसकत सरकलं. पर जनावर भारी. तसंच उठलं, आन् घेतली उडी. डाव्या रट्ट्यानं रेटीपातूर बावळा काढला भडव्याननं! डोस्कंच फिरलं. मुस्काट बघून एकच काठी हानली. उठलंच न्हाई!’
‘आणि दुसरे लांडगे ?’
‘म्होरक्या पडल्यावर कशाला हात्यात?’
राजे कौतुकानं ऐकत होते. त्यांना गंमत वाटत ‘पण तू इकडं कसा?’ राजांनी विचारले.
होती.
‘आयला…. ते हायलंच की! तिथनं वाट सुदरली. वाटंनं येत हुतो, तर दोन मानसं भेटली. तुमांवानीच त्यांनी बी इचारलं, बावळ्याला काय झालं, म्हनून. म्या सांगितलं. तर ते म्हनले, ‘अरं, लांडग्याची शेपटी का आनली न्हाईस?” म्या म्हनलं, ‘कशाला?’ तर ते म्हनले, ‘अरे, येड्या! लांडगा मारला, आन् शेपटी दावली, तर शिवाजीचा बामन बक्षीस देतो.’
साऱ्यांची नजर दादोजींच्याकडे गेली. दादोजी हसत होते. भीमा सांगत होता, ‘परमुलुखाचा म्या. मला काय ठावं? तसाच माघारी गेलो, आन् शेपटी आनली. ही घ्या.’ म्हणत कमरेला खोवलेली झुपकेदार शेपटी त्याने समोर टाकली. लांडग्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी दादोजींनी ही बक्षिसाची प्रथा ठेवली होती,
हे साऱ्या मावळात प्रसिद्ध होते. वैद्य आले. त्यांनी भीमाच्या जखमेला औषधं लाविली. औषध लावीत असता त्याने विचारले,
‘शिवाजीराजं म्हंत्यात, ते तुमीच ??
‘हो, का?’
‘काय न्हाय. लई बोलवा ऐकली हुती. मला वाटलं, कुनी तरी जानता मानूस
असेल.’
सारा वाडा हसला.
दादोजींनी सांगितले,
‘कुलकर्णी, याला दप्तरी घेऊन जा; आणि याचं बक्षीस द्या.’ ‘थांबा.’ राजे म्हणाले. राजे उठून आत गेले. जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा त्यांच्या हातात एक तलवार होती. भीमाला ती देत राजे म्हणाले,
नशीब तुझं, म्हणून काठीवर भागलं. ही तलवार जवळ राहू दे.’ भीमाने तलवार हाती घेतली. पान बघत तो म्हणाला,
‘रामपुरी दिसते.’
‘तुला यातलं कळतं?’ राजांनी विचारले. ‘म्हंजे? धंदाच न्हवं माझा? हेच करत आलो.’
‘आता कुठं जाणार?’ ‘पोट भरंल, तिकडं.’
‘इथं राहतोस?’
‘हाईन की! काम सांगा.’
“तुला लोहारशाळा देतो. करशील?”
भीमाने राजांचे पाय धरले. ‘लई उपकार हुतील, सरकार!’
‘सोनोपंत!’ राजे सोनोपंताच्याकडे वळून म्हणाले, ‘याला लोहारशाळा काढून
द्या.’
सोनोपंतांनी दादोजींकडे पाहिले. दादोजी म्हणाले,
‘सोनोपंत, राजाज्ञा झाली. वाट कसली पाहता?’ ‘आज्ञा!’ म्हणत सोनोपंत भीमाला घेऊन गेले.
सारे पांगले.
राजे एकटे असता दादोजी म्हणाले,
‘राजे, एवढ्या तडकाफडकी माणसं नेमायची नसतात. तो परका माणूस! कोण, कुठला, काय, सांगता येत नाही.’
‘पंत, संधी मिळाली, तर कळणार ना? हात बळकट आहेत. कष्टाळू आहेत. छाती निधडी आहे. पोलादाची जात सहज ओळखता बस्स! आणखी काय
हवं? संधी दिली आहे. मगदूर आपोआप कळेल.’ दादोजी कौतुकाने ऐकत होते.
संध्याकाळी जिजाऊंच्या दर्शनाला गेले असता दादोजी जिजाऊंना म्हणाले, ‘मासाहेब, राजांची नजर तयार होत आहे. भीमाची पारख किती चटकन केली। ‘मलाही कौतुक वाटतं. माणसं बरोबर हेरतो. काही
“हेही राजलक्षणच! पाहून येतं, तेवढं शिकून येत नाही, म्हणतात, ते खोटं नाही.’
ते ऐकून जिजाबाईंना आनंद वाटत होता. दादोजींच्याकडून अशी उघड स्तुती फार क्वचित ऐकायला मिळत असे. दादोजी म्हणाले, ‘मासाहेब, सोलापुराहून एक शाहीर आला आहे. आज्ञा असेल, तर वाड्यात
कवन करावं, असं म्हणतो.” ‘जरूर! राजांना पोवाड्याची फार हौस आहे. रात्री आम्ही पोवाडा ऐकू.’
रात्री पलित्यांच्या उजेडात वाड्याचा प्रथम चौक उजळला होता. चौकात दाटीवाटीने माणसे बसली होती. सदरेत खास बैठक अंथरली होती. शाहीर वाड्याच्या धुमीजवळ आपले कडे तापवीत बसला होता. साथीदार तुणतुणे, डफ, टाळ जुळवीत होते. खाशा स्वाऱ्यांनी बैठक सजली. मुजरे झडले. बैठकीच्या उजव्या बाजूला दादोजी, अमात्य, डबीर ही मंडळी बसली होती. बैठकीवरच्या डाव्या हाताला दादोजींची मंडळी, ब्राह्मण स्त्रिया. त्यांच्या पलीकडे मराठा स्त्रिया बसल्या होत्या.
शाहीर चौकात आला. त्याने व त्याच्या साथीदारांनी मुजरा केला. डफावर थाप पडली. तुणतुण्याने लय धरली, टाळ खणखणू लागले. आणि होती, ती बारीक कुजबूजही थांबली. मुजरा करून शाहिराने नमनाला तोड घातले:
आदि नमोनी गणरायाला देवि भवानीला मुजरे करितो जिजाऊ माते, बाळ शिवाजीला। मदांचे गाइले पवाडे आजवर कैकांनी ऐका आता स्त्रीजातीच्या शौर्याची कहाणी। रजपुतरमणी राणि पद्मिनी अनुपरूपखाणी चितोडगडचे नाव गाजवी थोर तिची करणी लक्ष्मणसिंग राणा चितोडाचा भीमसिंग त्याचा। चुलता नात्याचा शोभली उमा शंकरा
जानकी रामा रघुवीरा की रंभा शोभे सुरखरा
भिमसिंगाला तशी पद्मिनी चितोडची राणी रजपुतवंशा धन्य करी ती, धन्य तिची करणी ॥ १ ॥
शाहीर नमन करून पोवाडा गात होता. विषय होता राणी पद्मिनीचा, चितोडची ही रूपसंपन्न राणी उपजतच स्वाभिमान घेऊन जन्मलेली. तिच्या राज्यात कोणी उपाशी नव्हता, दुःखी नव्हता, भीमसिंग पद्मिनीची जोडी चितोडच्या राज्यात लक्ष्मीनारायणांसारखी शोभत होती.
शुक्राची चांदणी पद्मिनी स्वरूपाची मूर्ती रूपगुणांची तिच्या पसरली जगावरी कीतीं। अल्लाउद्दिन खिलजि माजला होता शिरजोर पद्मिनीची कीर्ती गेली त्याच्या कानांवर। ‘खुबसुरती का अजब खजाना जरूर देखूं तो मनात मांडे खात गडावर चाल करून ये तो।
पद्मिनीच्या रूपाची कीर्ती अल्लाउद्दीन खिलजीच्या कानांवर गेली. ते अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी तो बेचैन झाला. पापी वासनेने पछाडलेल्या अल्लाउद्दिनाने चितोडवर हल्ला केला. सुखासमाधानांत वावरणारी चितोडची भूमी रक्ताने न्हाऊन निघाली. भीमसिंग चितोडचे रक्षण करण्यासाठी पराकाष्ठा करीत होता, पण दैवात यश लिहिले नव्हते. भीमसिंग अल्लाउद्दिनाच्या हाती सापडला. पद्मिनीचे कुंकू धोक्यात आले. अल्लाउद्दिनाने पद्मिनीला पाहण्याचा हट्ट धरला. कुंकू राखण्यासाठी पद्मिनी त्यालाही तयार झाली. अल्लाउद्दीन महालात आला. त्याचे पापी डोळे अधीर झाले होते; पडदा सरकवला गेला… आणि अल्लाउद्दिनाची नजर पडद्यामागे ठेवलेल्या आरशावर गेली. स्वप्न अवतरावे, तसे हळूहळू त्याला पद्मिनीचे दर्शन घडले. ते असामान्य लावण्य पाहून अल्लाउद्दीन पाघळला; वचन विसरला. भीमसिंग तर सुटलाच नाही; पण अल्लाउद्दिनाने सरळ पद्मिनीला मागणी घातली. मागणी कोण मान्य करणार? संतापाने बेभान झालेल्या अल्लाउद्दिनाने हल्ला केला. पण त्याला रजपुतांचा स्वाभिमान माहीत नव्हता.
भडकला खिलजी अनिवार उलटे तलवार। चितोडगडावर
कत्तल केली त्याने सरस बुरुजाबुरुजावर प्रेतांची रास गड रुधिरानं न्हाला समयास।। जी।। झाला विजय क्रूर म्लेच्छाचा दुष्ट खिलजीचा अधम वासनेचा पराजित पातिव्रत्य होई पुण्याला पाप शह देई सत्याचा बळी असत् होई॥ जी ॥ पद्मिनीने वक्त जाणला पराजय झाला। जरी समराला रजपुत बाणा कोण जितणार? खिलजीला नखहि नाही दिसणार जाहली सिद्ध करण्या जोहार ॥ २॥
पोवाडा ऐकत असता राजांचे डोळे अश्रूंनी भरत होते; जीव गुदमरत होता. शाहीर सांगत होता….
सौंदर्याने सीमा गाठली अंतिम शौर्याची धडधडत्या अग्रीत मिसळली ज्योत पद्मिनीची। तिच्या संगती रजपुत नारी करिती जोहार सद्धर्माचा विजय एका परि खिलजीची हार। पद्मिनीवाणी अगणित आज भगिनी बळी जाती म्लेच्छ माजला, धाय मोकलुन रडे बघा धरती ।। पुरुषार्थ पार लोपला गोरगरिबाला । आयाबहिणीला कुणी आज वाली ना उरला का, रे, देवा डोळा झाकला? चितोडचा जोहार व्यर्थ का गेला? गुलामगिरीचं जगणं नव्हे हे जितं कलेवर पराक्रम पुरुषात दिसेना काय गाऊ म्होरं ? ॥ ५ ॥
राजांना पुढचे ऐकणे अशक्य झाले. ते तसेच उठून आत गेले. पाठोपाठ जिजाबाई गेल्या. राजे पाठमोरे झाले. डोळे टिपीत होते. मागून आवाज आला,
‘का, राजे, का आलात?”
राजे वळले. सारा चेहरा फुलला होता. डोळे भरून आले होते. मुठी वळल्या होत्या. राजे म्हणाले,
‘मासाहेब, आम्हांला असले पोवाडे ऐकवत नाहीत. फत्तराच्या काळजाचा माणूसदेखील हे ऐकू शकणार नाही, सहन करू शकणार नाही!’
‘सारं सहन करतो. खुद्द पद्मिनीनं सहन केलं नाही? माणसाइतकी निर्लज्ज जात या वालीद पृथ्वीतलावर दुसरी नसेल. चितोडच्या राणीचं असं झालं. दाहीरच्या राजकन्या खलिफाच्या जनानखान्यात कोंबल्या, तेव्हा कुणी अडवलं? पद्मिनीनं जोहार केला. सुटली बिचारी! पण अशा हजारो पद्मिनी आज नरकात कुजत पडल्या आहेत, देवाधर्माला मुकल्या आहेत. दुसऱ्यांचं कशाला? खुद्द माझी जाऊ गोदावरीस्नानाला गेली होती, तिला दिवसा ढवळ्या महाबतखानाने पळवून नेली. काय केलं आम्ही?’
‘मग माणसं ओठावर मिशा बाळगतात कशाला?” ‘बोलणं फार सोपं, राजे! ही माणसं, गावं, शहरं आहेत कुठं? एकदा उघड्या डोळ्यांनी पाहा.’
‘हे थांबणार केव्हा?’
‘थांबवणारा भेटेल, तेव्हा! आज थोर बलशाली आहेत, ते शाही कृपेवर तृप्त आहेत. प्रजेला जुलुमाची सवय झाली आहे; ती पार हाडीमांसी खिळली आहे.. नशीब तुमचं आमचं, की एकाच वेळी एकच जेठाबाई ऐकायला मिळते. साऱ्या कथा एका वेळी कानांवर आल्या असत्या, तर…..”
‘मासाहेब, आम्ही ते बंद करू!’
‘राजे, स्वप्नातले मनोरे भूतलावर दिसले असते, तर मग कशाला असं घडलं असतं? पुसा ते डोळे, आणि सदरेवर चला. मधून उठून जाणं बरं दिसत नाही. शाहिराचा हिरमोड होतो. पोवाडा संपेपर्यंत तुम्हांला बसायला हवं.’
राजे जिजाबाईच्यासह परत बैठकीवर गेले.
*****
त होते. वाड्यात दप्तर पाहत होते; पायरीवर आलेला न्याय जिजाबाईनी गोतमुखाने सोडविलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते, भजनी लोक येत होते. भजन-कीर्तनांत राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचरे. खरा कंटाळा येई, तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर थोर माणसांच्या बरोबर फिरण्यात त्यांचे मन थकत असे. जायला हवं.’