श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग १२
दादोजींना आज दप्तरी यायला बराच उशीर झाला होता. दादोजींनी दप्तरी प्रवेश करताच शामराव नीळकंठ, सोनोपंत डबीर, बल्लाळ सबनीस उठून उभे राहिले. दादोजी बैठकीवर बसत म्हणाले,
“आज पूजेला जरा वेळ झाला. शामराव, आपले वैद्य कुठं आहेत? काल मात्रा मिळाली नाही. ‘ शामराव नीळकंठ म्हणाले, ‘वैद्यराज चार दिवसांपूर्वी शिवापूरला गेले आहेत.’
‘कारण ?”
‘राजांनी पाठविलं होतं.’
‘शिवापूरला ?’ दादोजी पुढे काही बोलले नाहीत.
वाड्याबाहेर चौकीदार सकाळच्या उन्हात गप्पा मारीत होते. टापांचा आवाज कानांवर आला. भाले सरसावून ते गडबडीने उभे राहिले. भरधाव वेगाने एक स्वार येत होता. वाड्याच्या दाराशी तो पायउतार झाला. घोडा चौकीदाराकडे देऊन अंगावरची धूळही न झटकता तो स्वार आत गेला. दप्तराच्या पायऱ्या चढून दप्तरी गेला. त्याने दादोजींना मुजरा केला. तो
‘काय आहे?’
स्वाराने सर्वांवरून नजर फिरविली. तो घुटमळला.
‘पंत, जरा बाहीर येतासा?’ त्रासिकपणे पंत म्हणाले, ‘अरे, सांग ना ? इथं कोण परकं आहे?’
स्वार एकदम पुढे झाला. पंतांच्या कानाला लागला. पंत किंचाळले. ‘काय सांगतोस?’ आणि भानावर येत पंत म्हणाले, ‘काय नशा तरी करून आला नाहीस?’
‘नाही, पंत! देवाशपथ, वाड्यात जखमी…’
‘चल, चल. बाहेर चल. इथं नको…’ पंत उठले. भ्रमिष्टासारखे ते दप्तराच्या बाहेर जात होते. उपरणे पडल्याचे भान नव्हते.
मासाहेब मुदपाकखान्यात शिधा सांगत होत्या. पंतांचा निरोप येताच त्या
महालात आल्या.
‘काय, पंत?’
‘तरी सांगत होतो, मासाहेब! गेल्या काही दिवसांतली राजांची लक्षणं ठीक
दिसत नव्हती. त्यासाठी त्यांना शिवापूरचा तळ हलवायचा होता. वाडा मोकळा हवा होता ना?’
“पंत, नीट काही सांगाल, की नाही?”
‘नीट घडलं, तर नीट सांगणार!’ पंत बोटांशी चाळा करीत म्हणाले, ‘मासाहेब,●राजांचा पराक्रम ऐका– राजांनी रोहिडेश्वर घेतला.’
‘रोहिडेश्वर?’ शंका येऊन मासाहेबांनी विचारले, ‘तब्येत ठीक आहे ना?’ ‘होती, मासाहेब! आता राहील की नाही, ते माहीत नाही. राजांच्या रोहिडेश्वराच्या खेपा, दादाजी नरसप्रभूची वाढती संगत, मावळ्यांची जमवणी… साऱ्यांचा अर्थ
आता कळला.’ ‘कुणी सांगितलं? खोटं असेल।’
‘खोटं ? मासाहेब, शिवापूरचा वाडा जखमींनी भरला आहे.’ ‘आणि राजे ?’
‘देवाची कृपा! राजे सुखरूप आहेत.’
जिजाबाईंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या हसून म्हणाल्या, ‘पण हे घडलं कसं?’
‘मासाहेब, बाराशे स्वारांनिशी राजे रोहिडेश्वरावर चालून गेले. किल्लेदाराला कैद केलं. गडावर आज आदिलशाही निशाण नाही.’
“शिवबा आला, की सारं कळेल!’
‘आता कळून तरी काय फायदा ? जे घडायला नको होतं, ते
घडून
गेलं.’
‘राजे केव्हा येणार आहेत ?’ ‘शिवापूर सोडायच्या तयारीत होते, अशी वर्दी आहे. मासाहेब, उभं राहवत नाही. जरा बाहेर जाऊन बसतो.’
दादोजी बाहेर गेले. जिजाऊंना शिवबाच्या पराक्रमाचे कौतुक वाटत होते, पण त्याचबरोबर कसली तरी हुरहुर वाटत होती. जिजाबाई मुदपाकखान्यात गेल्या. सईबाई बदाम खात होत्या. मासाहेबांना पाहताच त्या उभ्या राहिल्या. मनोहारी
शेजारी उभी होती. मासाहेब म्हणाल्या, ‘सई, लौकर चांगले कपडे कर. आरती तयार ठेव.’
‘कुणाला ओवाळायचं?’
‘मला ओवाळ आता! शहाणे, तुझा नवरा पराक्रम करून घरी येतोय्. त्याला ओवाळ. राजांनी रोहिडेश्वर काबीज केलायू.’
सईबाई सणासुदीचे कपडे घालून तयार झाल्या. मनोहारी सईबाईंच्या अंगावर एक एक दागिना चढवीत होती. सईबाईंनी विचारले, ‘मनोहारी, तू ह्यांना पाहिलंस?”
‘आत्ता, ग, बया! अवो, राजांनी मला पाहिलं नसतं, तर हे पाय कशाला दिसलं
असतं?’
‘नशीब तुझं. घरात असून आम्हांला दर्शन घडत नाही.’ “आत्ता येतीलच की!”
‘इकडून यायचं, आणि तिकडे जायचं।’
‘आता राजे आले, की सोडूच नका, नवरा मुठीत ठेवावा, म्हंत्यात.’ • सईबाई हसल्या. राजांना मुठीत ठेवण्याच्या कल्पनेने त्यांना हसू आले. त्या
म्हणाल्या, ‘ठेवला असता, ग… पण…’
‘पन काय ?”
‘मूठच लहान आहे, बघ!’ सईबाई खळखळून हसल्या. ‘खिदळत काय बसलाय्?’ जिजाबाईंचा आवाज आला.
दोघी उठून उभ्या राहिल्या. सईबाई म्हणाल्या, ‘आमची तयारी झाली.’ ‘हो! ते दिसतंच आहे. पण आरतीकडे कुणी पाहायचं?’
दोघी जीभ चावून बाहेर पळून गेल्या.
राजांचा रोहिडेश्वराचा पराक्रम साऱ्या वाड्यात पसरला होता. जिकडे तिकडे कुजबूज चालू होती. घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला; आणि जो तो हातांतली कामे टाकून धावू लागला. अश्वपथक वाड्यासमोर येऊन थांबले. घोड्यांच्या टापांनी राजवाड्याबाहेरचे मैदान भरून गेले. राजे पायउतार झाले. वाड्याच्या दाराशी सुवासिनींनी राजांच्या पायांवर पाणी घातले. दहीभात ओवाळून टाकला. राजांनी पाय उचलला, तोच पिवळे जरी वस्त्र नेसून येणाऱ्या सईबाई नजरेत आल्या. पुन्हा पाऊल मागे घेतले. सईबाई आल्या. त्यांनी राजांच्या मस्तकी टिळा लावण्यासाठी हात उंचावला. राजांनी मान वाकवली. घामाने भरलेले कपाळ, धारदार नाक, कानांत हेलकावे घेणारी ती कर्णकुंडले- क्षणात केवढे मोहक दर्शन घडले! सईबाई लाजल्या. राजांची नजर सईबाईंना निरखीत होती. सईबाईंनी गडबडीने विडा हाती दिला, आणि ओवाळले. विडा तबकात ठेवताना राजांच्या ओठांवर हसू होते. राजे आत आले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते पाया पडले. मासाहेब म्हणाल्या,
‘औक्षवंत व्हा! विजयी व्हा!’ राजांचे लक्ष मासाहेबांच्या शेजारी उभ्या असलेल्या मनोहारीकडे गेले. राजे थांबले. जिजाबाईंनी विचारले,
‘का थांबलात, राजे?’
मनोहारीकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, ‘हिला कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतं.’ जिजाबाई हसल्या. त्या म्हणाल्या,
‘राजे, एवढ्यात विसरलात? नाचणीला पाटलांनी तुमच्या समोर…’
‘आठवलं! ही मनोहारी ना?”
‘हो. चांगली आहे मुलगी! तुम्ही भेटला नसता, तर काय झालं असतं म मुलीचं,
कुणास ठाऊक?’
राजे सदरेत आले. सदरेत तानाजी, दादाजी नरसप्रभू उभे होते. राजांनी पेशव्यांना विचारले,
‘दादोजी कुठं आहेत?’
‘दप्तरी!’
• राजांनी दादाजींच्याकडे पाहिले. दादाजी राजांच्या मागून चालू लागले. ते दप्तरी
जाताच दादोजी उठून उभे राहिले. दप्तरी दादोजी एकटेच होते. राजांनी दादोजींना नमस्कार केला. दादोजी राजांच्याकडे पाहत होते.
‘राजे, हे करायचं होतं, तर आधी का सांगितलं नाही?’
राजे काही बोलले नाहीत.
“आम्ही विश्वासातले वाटलो नाही?”
‘गैरसमज होतोय्, दादोजी!” ‘चांगला समज झाला आहे. भावनेच्या भरात एक गोष्ट करून गेलात. परिणाम
माहीत आहेत?’ ‘ते आनंदानं सहन करू!’ राजे सहजपणे बोलून गेले. ‘हं! बोलणं फार सोपं. आज रोहिडेश्वर काबीज केलात आदिलशाहीचा गड
घेतलात! बादशाहीत राहून बादशाहीशी वैर पत्करलंत.’ ‘कुठली बादशाही, दादोजी? कुणाची?’ राजे उफाळले. ‘जिथं धर्म सुरक्षित
नाही, दैवत सुरक्षित नाही, नोकरीही स्थिर नाही.’
‘कुठली नोकरी ?’
“आपण सांगितलं नाही, म्हणून आम्हांला कळायचं राहिलं थोडंच ? शहाजीराजांच्यावर, त्याबरोबर तुमच्यावरही, उपका देऊन थोरल्या महाराजांची
दरबारी चौकशी झाली, ती कशासाठी?’
‘तो गैरसमजाचा प्रकार होता.’
‘गैरसमज! शाही गैरसमजाचे परिणाम आम्ही जाणतो. मुरार जगदेव हाल हाल करून मारले गेले. अशाच गैरसमजातून आमच्या आजोबांचे, लखुजी जाधवरावांचे, मानाच्या सरदारांचे भर दरबारी तुकडे उडवले गेले. असले गैरसमज फार दिवस सहन व्हायचे नाहीत आम्हांला!’
“मग तुमच्या प्रकारानं थांबतील?’ ‘श्रींच्या मनात असेल, तर जरूर थांबतील!’
दादोजी दादाजी नरसप्रभूंकडे पाहत उफाळले, ‘आणि तू! तुला तरी अक्कल हवी होती. अरे, जेध्यांचा कारभारी तू, शाही दरबाराचा वतनदार, रोहिडखोऱ्याचा देशपांडे या पोरखेळात सामील झालास?’ “राजे शांतपणे म्हणाले, ‘पंत हा पोरखेळ नाही.’
“राजे, तुमचं वय लहान आहे. फार पावसाळे या पिकल्या केसांनी पाहिलेत! निदान राजकारणात तरी मला शिकवू नका. थोरल्या महाराजांनी असाच बंडावा केला होता. सहाहजारी फौज होती. सारा मावळ महाराजांच्या मागे उभा होता. काय
झालं त्या बंडाव्याचं ? धुळीला मिळालं ते स्वप्न जिथं त्यांची ही स्थिती…’ “एक अपयश हे कदाचित दुसऱ्या यशाची सुरुवात असते….. राजे, मला फार बोलता येत नाही. पण मी सांगतो, ते ध्यानी ठेवा. पुढं हे शब्द
आठवतील. तुम्ही जो डाव टाकीत आहा, तो कदाचित…! राजे ओरडले, ‘थांबा, पंत! दैव कुणाला चुकलं नाही. आमच्या कार्याला आशीर्वाद देता येत नसेल, तर देऊ नका. पण आज देवांचं राज्य उभं करीत असता शाप तरी नका देऊ! येतो आम्ही…..
– आणि भावनाविवश झालेले राजे दप्तरातून निघून गेले.
साऱ्या मावळ्यांचे जेवणखाण होऊन हातावर पाणी पडायला संध्याकाळ झाली. जिजाऊंच्या महालात राजे बराच वेळ बसले होते, जिजाऊ म्हणाल्या, ‘दादोजींनी हे मनाला फार लावून घेतलं आहे. राजे, आता थोडे दिवस सबुरीनं
घ्या.’
‘मासाहेब, तसं करता येईल, असं वाटत नाही.’
‘कारण?’
‘कारण एक गड घेतला काय, आणि अनेक गड घेतले काय, आता जाणून बुजून सापाच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. दुसरे गड सावध व्हायच्या आत, सत्ता बळकट करायला हवी.’
‘आणि विजापूरकर चाल करून आले, तर?’
‘त्याचाही आम्ही विचार करून ठेवला आहे. मंद गती हे शाह्यांचं बिरूद आहे.. कागदी घोडे नाचवून हवा तेवढा वेळ काढता येईल.’
जिजाबाई निःश्वास सोडून म्हणाल्या, ‘तुम्ही काय करावं, हे जाणता! लक्षात ठेवा एवढंच आम्हांला दुसरा आधार नाही. जे काही कराल, ते पूर्ण विचारानं आणि श्रद्धेनं करा.’
राजे उठत म्हणाले, ‘मासाहेब, येतो आम्ही. पहाटे परत गडावर जायचं आहे. सारा बंदोबस्त पुरा व्हायचा आहे.”
‘थांबा.’ जिजाबाई म्हणाल्या. त्यांनी आपली संदूक उघडली. एक थैली राजांच्या हाती देत त्या म्हणाल्या,
‘हे हजार होन आहेत- माझे स्वतःचे. ठेवून तरी काय उगवतात? तुम्हांला है। उपयोगी पडतील.’ राजांना अश्रू आवरणे कठीण गेले. ते म्हणाले,
‘मासाहेब, हे हजार होन नाहीत. यांची किंमत होणार नाही. स्वराज्यावरचं कोणतंही संकट टाळायला ही दौलत समर्थ आहे.’ राजांनी मासाहेबांचे पाय शिवले. राजांच्या पाठीवरून मायेचा हात फिरला, आणि राजे आपल्या महाली गेले.
सकाळी राजे स्नान करून महाली आले. सईबाई उभ्या होत्या. पलंगावर कपडे काढून ठेवले होते. जिरेटोप, तलवार, बिचवादेखील व्यवस्थित ठेवला होता. ‘सुखाचे दिवस आले, म्हणायचे!’ राजे म्हणाले. ‘तर! जसे काही आत्तापर्यंत हालच होते.
‘पुरुषांची दुःखं तुम्हांला कशी कळणार? केवढाही पराक्रमी पुरुष असो, त्याला हवे ते कपडे आणि हत्यार वेळेवर मिळणं कठीण! मग सेवकांवर रागवायचं; आरडाओरड व्हायची; आणि जेव्हा तयार व्हायचं, तेव्हा सारे रचलेले बेत त्या संतापानं विरघळून जायचे, हे ठरलेलं!’
राजांनी कपडे केले. सईबाईनी एक एक हत्यार दिले; शेवटी टोप दिला. राजे
म्हणाले,
‘आज शिरस्त्राण असतं, बरं झालं असतं….
‘आता कुठली लढाई ?’
‘छे, आता कुठली लढाई? आता माधार! दादोजींना भेटण्यासाठी आम्ही निघालो आहोत ना?’
‘पंत काही रागावले नाहीत!’
‘कुणी सांगितलं?’ ‘सांगायला कशाला हवं? आपण मासाहेबांच्या महालातून आलात आणि
‘काय म्हणत होते?’
करतात, याची भीती वाटते.”
दादोजी मासाहेबांच्या बरोबर बोलताना बाहेरून ऐकलं.’ ‘दादोजी म्हणत होते- हे कुणी तरी करायलाच हवं. ती वेळच आली होती. राजे
न कळत सईबाई दादोजींची नक्कल करीत होत्या. राजे हसले. म्हणाले. ‘राणीसाहेब, आम्ही स्वराज्याची स्थापना केलीच आहे. आता आम्हांला जासूदही ठेवावे लागणारच. वाड्यातल्या बातम्या काढायला आपली नेमणूक करायला काहीच हरकत नाही. एवढ्या विश्वासाचा आणि काळजीचा जासूद मिळणार कुठं ?’
सईबाई लाजल्या; आणि राजे दादोजींच्याकडे हसत गेले. त्यांची भीती थोडी
कमी झाली होती. “राजे पंतांच्या पाया पडले. पंत काही बोलले नाहीत, राजे म्हणाले, ‘पंत, आम्ही रोहिडेश्वराला जाऊन येतो.’
‘ठीक!’
‘बरोबर पेशवे, डबीर, अमात्य न्यावे, म्हणतो.’
‘राजे तुम्ही नेऊ शकता. आपल्याच जहागिरीसाठी महाराजांनी ते दिले आहेत.’ ‘येतो आम्ही.’ म्हणत राजे वळले. तोच पंतांनी हाक मारली, ‘राजे!’
राजे थांबले. मागून शब्द आले. ‘राजे ! गड नवखा. नुकताच घेतलेला. घातपात होण्याचा संभव असतो. सावधगिरीनं राहा.’
दुसऱ्या दिवशी सकाळी दोन स्वार तातडीने रवाना झाले. जिजाबाईंनी विचारले,
“एवढ्या तातडीनं स्वार कुठं गेले?”
‘बंगळूरला ?’
‘कारण ?’
‘मासाहेब! इथं जे घडतं, ते थोपवू शकलो नसलो, तरी थोरल्या महाराजांना, जे घडलं, ते कळवणं माझं कर्तव्य आहे. ते मी केलं आहे.’
******