जिजाऊचे विचार
सा-या जगात गाजे चमचम शिवबाची तलवार
त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार…..!!धृ!!
केली चढाई ऐसी की गनिमहि फाकला
मातेसमान लेखून शिलाचा जगी दिला दाखला
साडीचोळीचा आहेर देऊन रक्षिली वै-याचीही नार
त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार….!!1!!
मायभूमीच्या रक्षणा सदा ऊभा केला शेतकरी
देठ तयाच्या बांधावरचा जावो कधी ना चोरी
काळ्या मातीच्या कष्टक-यावर नकोच अत्याचार
त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार…!!2!!
कठीण समयी मुलूखावरी पतीराजाची स्वारी
गर्भारपणी समशेर हाती स्वजनास पडली भारी
कुलाचंही रक्षण करण्या केलं बापालाही गार
त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार…!!3.!!
संस्काराचे मोती विणले घडविला शिवबाराणा
बहुजनासाठी झिजला जिजाऊचा कणखर बाणा
अमृतसागर लढवय्याचा घेई सदा सुविचार
त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार….!!4!!महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवि गायक
भास्कर अमृतसागर
धुळे