छत्रपती शिवाजीराजे आपण पुन्हा यावे

छत्रपती शिवाजीराजे आपण पुन्हा यावे
🚩👏🏼🚩🚩👏🏼🚩👏🏼🚩
*************************
नानाभाऊ माळी

       मी दररोज पाहात असतो!राजे मला दिसत असतात!किल्ला शिवनेरीवरींल बालपण डोळ्यासमोर येत असतं!वाऱ्याच्या स्पर्शाने उंच उंच उभट कडा,दऱ्या-खोऱ्या डफावर थाप मारावी तशी काठंळी बसवत असतात!राजमाता जिजाऊ डोळ्यांना दिसत असतात!रामायण,महाभारत, श्रीकृष्ण,अर्जुनाच्यां आदर्श संस्कारी गोष्टी सांगतांना दिसत असतात!मीही दररोज महापराक्रमाची,शौर्याचीं दिगंत किर्ती  ऐकत असतो!राजे आम्ही आपल्यालां डळ्यातल्या पापनीत बसवत असतो!आपलं चारित्र्य काळजात कोरत असतो!आपल्या पराक्रमाच्यां पाऊलखुणा किल्ल्यांवर जाऊन पाहात असतो!राजे आपलं त दिपवूनसोडलेलं तेज आत्मसात करीतं असतो!राजे आपण पून्हा यावे!अंधार दूर करण्या यावे!आपलं प्रकाशमान सूर्यतेज घेऊन राजे आपण पुन्हा यावे!!🚩👏🏼

छत्रपती शिवाजीराजे
छत्रपती शिवाजीराजे आपण पुन्हा यावे



इ स १९ फेब्रुवारी १६३० अत्यंत गोड आवाज ऐकायला आला होता! शिवनेरी किल्ला सजलेला दिसतो आहे!इतिहासाच सोनेरी पान पून्हा चकाकी उघडलं जातांना दिसत आहे!महाप्रतापी राजाचं दिव्यतेज डोळ्यात  डोळ्यात भरून घेत आहोत!!छत्रपती शिवाजीराजे युगेयुगे स्मरणात राहतील!नाणेघाट डोंगराव उंच ठिकाणी असलेला हा इतिहास पुन्हा जीवंत होईल!!बाळ राजे शिवाजी लहान वयातचं आपल्या सवंगडी मावळ्यांना सोबत घेऊन पुणे जिल्ह्यातीलं वेल्हे गावातील तोरणा किल्ला इ स १६४७ मध्ये जिंकून स्वराज्यांचं पहीलं तोरण बांधलं होतं!राजे आपण पुन्हा यावे!शत्रूलां धडा शिकवण्या पुन्हा यावे!आपणास मुजरा करायचा आहे आहे राजे आपण पुन्हा यावे!🚩

दुर्गम ठिकाणी,घनदाट जंगलात उंच उंच पर्वतावरील किल्ला राजांची आगमनाची वाट पाहात आहे!दहाही दिशा उजळून टाकण्या राजा आपण पून्हा याव!जीर्ण, खिळखिळे, ढासळलेले बुरुज पुन्हा जीवंत होतील!राजे आपली दिगंत किर्तीसाठी आपण पुन्हा पृथ्वीतळावर यावे!राजे आपण पुन्हा यावे!🚩

रायगडावर डोळे दिपवून टाकणारा सोहळा डोळ्यांनी पुन्हा अनुभवतो आहे!राज्याभिषेक सोहळा होतं आहे!डोळे तृप्त होतांना दिसत आहे!रयतेचे राजे छत्रपती शिवाजीराजे आपण पुन्हा यावे!मोघल,निजाम,   आदिलशाही, कुतुबशाहीचा पाडाव करण्या राजे आपण पुन्हा शंभूरूपात यावे!आपण आपलं दर्शन द्यावे!शत्रुंच्या आक्रमणाला तलवारीने चिरडण्या,राजे आपण पुन्हा यावे!गनिमांनां अद्दल घडवण्या राजे आपण पुन्हा यावे!🚩

तानाजी मालुसरे सारख्या पौलादी छातीच्या शूर मर्दास अलिंगण देण्या आपण पून्हा यावे!एक एक किल्ला जिंकत सिंहगडही जिंकून देणाऱ्या महापराक्रमी तानाजी मालुसरे सारख्या शूर महाप्रतापी जिवाभावाच्या काळजास भेटण्या!राजे आपण पुन्हा यावे!🚩👏🏼

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज



आपली पहिली राजधानी राज गडकिल्ल्यावर पून्हा यावे!सह्याद्रीचीं छाती आपल्या आगमनाची  वाट पाहात आहे!भोर तालुक्यात असणारा हा किल्ला अतिशय अवघड आहे!राजांनी दर्शन देण्या पुन्हा यावे!🚩

प्रतापगड महाप्रतापी राजा छत्रपती शिवाजी राजे यांच्याचं कारकिर्दीत बांधला गेलेला किल्ला आहे!आदिलशाहीतील क्रूरकर्मा सरदार अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा प्रतापगड गड आतुर झाला होता!अलिंगल देत अफझल खानाने धोका देताच बिचवा आणि काट्यारीने त्याच्या पोटाचा कोथळा काढणाऱ्या छत्रपतीस मुजरा करतो आहे!राजे आपण पुन्हा यावे 🚩👏🏼

आदिलशाही,निजामशाही अन मोघलांशी लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या राजास शत शत नमन करतो आहे!स्वराज्य रक्षक शिवराय स्वराज्यावर अनेक संकट आली, त्यांच्यावर मात करींतं,लढाया जिंकत एक एक किल्ला स्वराज्यात सामील करीत, ३५० किल्ले स्वराज्यात आणली होती!राजांच संपूर्ण आयुष्य शत्रूशी लडण्यात गेलं! अनेक पर्वतांच्या दऱ्या खोऱ्यातीलं सह्याद्रीच्यां रांगेतील रायरेश्वराच्या गडावर आपण सिंहासनावर बसले आहात!आपणास आम्ही नतमतक होणार आहोत !राजे आपण पुन्हा यावे!🚩👏🏼

राजे आपण मर्द मराठ्यांचा आत्मा आहात!आपल्या तलवारीतून शत्रुंना चिरडले होते!दुश्मनांना धाक बसेल असं कर्तृत्व होतं आपलं!राजे आपण युग कीर्तिवंत होतात!आपणा दुश्मनांसाठी काळ होतात!रयतेची छत्री होतात!आपण हिंदू धर्म रक्षक  वणवा पेटवणारे छत्रपती होतात!तप्त लाव्हा रस होतात!आपण मावळ्यांची रक्त होतात!आपण श्वास होतात रयतेचे!राजे पुन्हा यावे!🚩👏🏼

आपण किल्ला जिंकून देणारे प्रेरणा स्रोत होतात!ढाल होतात!राजाधिराज होतात!छत्रीयकुलावंतसं होते!पात शाहीचा निप्पात करणारे हुकमी अस्र होतात!आपली दिगंत किर्ती पृथ्वीच्या अस्तित्वापर्यंत राहणार आहे!राजे आपण पुन्हा यावे!🚩

आपण सत्याग्नी होतात!आपण अनंत नेतृत्व कलाणिपून होतात!सनई, चौघडे,बखरीतून उठून दिसतात!वीर, साहसी होतात!आपण कमी संख्याबळात युद्धकौशल्य निपून भगवाधारी भगवान शिव शंभू होतात!घोडेस्वारींतून अनेक किल्ले पालथे घालणारे अनुभवसंपन्न महाराजा होतात!दक्षिणे पासून उत्तरेपर्यंतं भगवा झेंडा स्फूर्ती दाता होतातं!आपण देवीमाता जयभवांनीचे निस्सीम भक्त होतात!राजे आपण पुन्हा यावे!🚩🚩👏🏼

आपण भगवे वादळ होतात!श्रद्धा सन्मान होतात!मर्द मावळ्यांचे काळीज होतात!बुद्धी, शक्ती अन युक्तीतून युद्ध जिंकणारे स्फूर्तीस्थान होतात!तलवार-ढालीतून युद्ध जिंकून देणारे महायुद्धा होतात!सूर्यासमान तेज असणारे तप्तसूर्य होतात!सतत आपल्या रक्तात लढाई, झुंज अन रयतेचा पालक होतात!रयतेच्या हृदयात राज्य करणारे एकमेव राजे होतात!राजे आपण पून्हा यावे!आम्हास मानसिक गुलमागितून मुक्त करावे!राजे आपण पुन्हा यावे 🚩👏🏼

प्रत्येक गडावरील दगडावर आपलं नाव कोरले गेलेले आहे!दगड भक्कम तटबंधीचा आधार आहेतं!अशा राजा धिराजांनी पून्हा यावे!आमची मान ताठ उंचावून आपणास मानाचा मुद्रा करतो!स्वाभिमान रक्षक,सळसळत्या हिंदवी स्वराज्य,रक्षक राजास मानाचा मुजरा करतो!बुद्धी युक्तीचा कधीच थांग पत्ता लागला नाही अशा युद्धकुशल राजास नमन करतो!राजे आपण पून्हा यावे!🚩👏🏼

राजे आपण आमच्या श्वासात जाऊन बसला आहात!मर्द मावळ्यांची शान आहात!आपण भूपति,प्रजादक्ष, सह्याद्रीछाती आहात!आपल्या शब्दांनाठी प्राणाहुती देणाऱ्या मावळ्यांचे पालनहार आहात!तोफांच्या आवाजात प्राणपणाने लढणाऱ्या मावळ्यांचे प्राण आहात!भक्ती शक्तीची उत्तम सांगड घालणारे महाप्रतापी राजा आहात!भवानी मातेचा जयघोष,जय जयकार करीत मावळ्यांचा शंखनादही सुरूच असतो!युद्धाने पेटलेल्या मावळ्यांचा देवं आहात!अशा राजास वंदन करतो!नमन करतो!छत्रपती राजे या भुवरी पून्हा यावे!आज आपली जयंती!आपली युगावतार प्रकट दिवस! राजे आपण पुन्हा हिचं ईच्छा!
👏🏼🚩👏🏼🚩🚩👏🏼🚩
*************************
हडपसर,पुणे -३¹४
मो नं ९९२३०७६५००
दिनांक-१९ फेब्रुवारी २०२३

शिवज्योतीचां शिवनेरी-रायगड प्रवास
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
… नानाभाऊ माळी

             त्यांना आपण काय म्हणावे? युगपुरुष!विश्वभूषण!राष्ट्रभूषण!महाराष्ट्र दैवत!शिवरूप!श्रीमंतयोगी!कुलभूषण!स्त्री रक्षक!क्षत्रियकुलावंत!छत्रपती!रायगडाधीश्वर!सह्याद्रीभूषण!प्रजाहृदयाधीश्वर!हिंदवी स्वराज्य संस्थापक!३५०किल्ल्यांचे अधीपती!का रयतेचा राजा? सर्व शब्द फिके पडतील त्याहून शिवांश म्हणूयातं!शिवतत्व अंगीकारलेली दैवी अवतार म्हणूयात!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

अंधारातून शत्रू कापीत
  🚩राजे निघाले होतें
तोफांचा आवाज कानी
छत्रपती जागले होतें!🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

कोण करितो सत्य भाकीत
अंधारातून अंतर कापीत
सह्याद्री सिंह निघाला होता
शिवबा आमचा राजा होता
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

रात्र वैऱ्याची काळोख दिसतो
डोळ्यासमोरीं भगवा दिसतो
  ती कातळ छाती सह्याद्रीचीं
   तेथे रायगड दिसत असतो
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

                 छत्रपती शिवाजी राजे शिवनेरी किल्ल्यावर पवित्र उगवत्या सूर्यसाक्षी जन्माला आले होतें!१९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजांऊच्या पोटी जन्माला आले होतें!सिंहाचं काळीज अन पोलादी छाती असणाऱ्या या युगपुरुषांच्या पिताश्रीचं नाव होतं शहाजी राजे भोसले!परकीयांच्या चाकरीत असणाऱ्या शहाजी राजांनी शिवनेरी सारख्या सुरक्षित किल्ल्यावर जिजाऊंनां ठेवले होतें!बाल शिवराय  माता जिजाऊंच्या मुखातून रामायण, महाभारत सारख्या प्राचीन आदर्श कथा ऐकत होतें!संस्कार शिकत होतें!युद्ध तंत्र शिकत होतें!डोळ्यांनी पाहात होतें!बालमनावर संस्कार होत असतांना आपण परकीयांच्या गुलामगिरीत असल्याचं त्यांना प्रकर्षाने जाणवू लागलं होतं!🚩

                अंतःकरण उफाळून आलं होतं!बालपणी मनाचा निश्चय झाला होता! “रयत गुलाम राहता कामा नये!” रयतेच राज्य उभं राहिलं पाहिजे!बाल शिवाजींनीं संवगडी गोळा केले!स्वतःचं राज्यांचां,रयतेच्या राज्याचा अर्थ सांगितला होता!धर्माचां खरा अर्थ सांगितला होता!घोडदौड सुरू झाली होती!एक एक मावळे लढण्यास येऊ लागले!रात्रंदिवस शत्रूला नामोहरम करीत एक एक किल्ले जिंकत गेलें!🚩

            मुघल, निजाम,अशा अनेकांचें किल्ले काबीज करीत सह्याद्रीचां सिंह झंजावातासारखा निघाला होता!शत्रूच्या मनात दहशत निर्माण होईल अशी गुरीला युद्ध तंत्र वापरून आक्रमण करीत हा लढवंय्या तलवारीला धार लावून निघाला होता!रात्रंदिवस युद्धाचा प्रसंगातून पुढे जात एकनिष्ठ मावळ्यांच्या साथीने स्वतंत्र राजसत्ता निर्माण करणारा शौर्यपुरुष!महापराक्रमी राजा छत्रपती शिवाजी महाराज होतें!🚩

                 शून्यातून राज्य निर्माण करीत,विश्वासू सहकार्यांच्या साथीने अनेक किल्ल्यांवर शत्रूला नामोहरण करीत विश्व विक्रमी ३५० किल्ले जिंकून धर्म रक्षण्यासाठी रायगडावर राज्याभिषेक करवून घेतलेला थोर मराठा राजा छत्रपती शिवराय होतें!चहूबाजूनी शत्रू समोर असतांना आपल्या राज्यांची सूत्रे शक्तीने, ताकदीने, युक्तीने चालवीत होतें!🚩

             शिवनेरीतं जन्मापासून सुरू झालेली कारकीर्द उत्तरोत्तर भक्कम किल्ले बांधून ताकद वाढवीत राहिले!हा प्रवास साधा नव्हता!बऱ्यावाईट संकटातून प्रवास करीत राहिले!रायगड राजधानीच ठिकाण म्हणून निवडले गेलें!सत्ता सूत्रे स्वतःकडे ठेवून राज्यकारभार
अष्ठप्रधानमंडळाकडून पाहात होतें!झुंजार सह्याद्रीसिंह छत्रपती शिवाजी राजे विश्व विजयी राजे म्हणून विश्वविख्यात झाले होतें!त्यांच्या महान कार्यास,राजांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!कोटीकोटी नमन!रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा!शिवनेरी तें रायगडी प्रवास शून्यातून राज्य निर्मितीचा होता!
🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
*************************
..