डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्कार

डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्कार

बडोदा (गुजरात) येथे झालेल्या राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे दुसरे महाअधिवेशन पार पडले. अधिवेशनामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. निर्मला पाटील या जिजाऊ ब्रिगेड सांगली शहराध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जगदुरु तुकोबाराय साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, व प्रदेशाध्यक्ष या पदावर त्यानी काम केले आहे. मराठा सेवा संघ प्रशिक्षक, शिवधर्म शिवसेवक, लेखिका, वक्त्या म्हणून ही सामाजिक क्षेत्रांमध्ये त्या २००१ पासून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.

ऑगस्ट २०२० मध्ये जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जिजाऊ ब्रिगेडचे कार्य सुरू आहे. २०२१ मध्ये २० तर २०२२ मध्ये ३० राज्यांमध्ये जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. महिला सक्षमीकरण, स्त्री पुरुष समानतेचा विचार समाजामध्ये रुजविणे, महिलांच्या सुप्त गुणांना, क्षमतांना संधी उपलब्ध करून देणे, महिलांनी अज्ञान, अंधश्रद्धा यातून बाहेर पडून काल सुसंगत बदल स्वीकारणे, महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या पुढील आव्हाने या विषयावर चर्चा करणे व उपाय शोधणे अशा अनेक हेतूने राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड सध्या काम करीत आहे.

बडोदा नरेश श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड महाराज यांचे वंशज श्रीमंत समरजीत सिंह गायकवाड महाराज यांच्या हस्ते व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, स्वागताध्यक्ष सुनील गणदेवीकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, आमदार संगीता पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. निर्मला पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ. निर्मला पाटील यांना उत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्कार

Leave a Comment