शिवचरीत्र
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजिक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स.१६३० मध्ये छत्रपती महाराजांचा जन्म झाला.एका आख्यायिके नुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान शूर साहसी योध्दा पुत्र व्हावा अशी शिवाई देवीला जिजाबाईंनी प्रार्थंना केली होती.म्हणून त्यांचे नांव “शिवाजी” असे ठेवण्यात आले.
शिवाजी महाराजांचा जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर ,अमहदनगर,आणि गोवळकोंडा या तीन मुसलमांनी सल्तनीमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवळी अमहदनगरची निजामशाही निजाम विजापूरची, आदिलशाही,आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली.पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहांगीर ठेवली.आणि स्वता:ची एक लहानशी फौज पदरी बाळगली.हे प्रथम अमहदनगरच्या नीजमशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते.मलिक अंबरच्या ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यु नंतर मोघल सम्राट शहांजनच्या सैन्याने इ.स.१६३६ मध्ये अमहदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशाहने त्यांना पुण्याची जहांगीरी दिली.शहाजीरांजानी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला.
लहान शिवाजीरांजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या, तुकाबाई आणि शहाजी राजे ह्यांच्यात एकोजी भोसले, व्यंकोजी भोसले ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडुमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.पुण्यात जिजाबाई रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती.तेव्हा छोटे शिवाजी राजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतिका दाखल सोन्याच्या मुलाम्यांचा नांगर फिरवून जिजाबाईंनी पुण्याची पुन: स्थापना करायला सुरुवात केली.
शिवाजीराजे लहानचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारखा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीरपणे मार्गदर्शन दिले.शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू होते. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे इतिहासामध्ये लिहिलेले आढळते.
युध्द अभ्यास रणनिती तसेच राजकारण ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजी राजाकडून, दप्तर व्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण मासाहेब जिजाऊ यांच्या कडून त्याच बरोबर परकिय सत्तेविरुद्ध लढा करण्याकरता आवश्यक असे शिस्तीचे शिक्षण जिजाबाई कडून मिळाले.असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहिती वरून निश्र्चितपणे सांगता येते.
जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना युद्धकला राजनितीशास्राचे शिक्षण दिले.शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादिंच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फूलिंग चेतविले.
अतिशय शिस्तबद्ध लष्कर सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.भूगोल आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करून गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २००० सैनिकांच्या तुकड्या पासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले.
किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्ले त्यांनी उभारले . राज्य कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.सर्व साधारण पणे शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.(१६३०)ते औरंगजेबाच्या मृत्यू इ.स.(१७०७)ह्या ७७ वर्षाच्या काळास इतिहासकार शिवकाळ असे म्हणतात.
छत्रपती हे हिंदू राष्ट्रवादाचे प्रतिक म्हणून मानले जातात.स्वराज्यासाठी महाराज अत्यंत धैर्यशील व्यक्ती महत्व असलेले नेतृत्वगुण संपादन केलेले नेते होते.त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट निर्माण केला.आणि भोसले कुळातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.भोसले कुळातील याराजाने विजापूरच्या आदिलशहा विरूद्ध व मोघल साम्राज्य विरूद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.
रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवरायांनी उभे केले.आणि यांचा धडका घेत अखेर मोघल साम्राज्य मोडकळीस आले.
छत्रपती महारांजाचा मृत्यू
इ.स.न.(१६८०) मध्ये झाला.तरी त्यांच्या नंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होई पर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती
(पुस्तकी संकलन)
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
