शिवजयंतीच्या शुभेच्छा
Table of Contents
काय शिकावं शिवचरित्रातुन?
राजाचं राजंपन शिकावं.
चौखूर उधळले वारू
तरी सत्तेचा मत्तेचा माज
शिरू नये डोक्यात.
हे शिकावं.
गड, दुर्ग, शस्त्रसाठा उभारावा अवाढव्य
पन रयतेच्या भाजीच्या देठालाही
लागु नये धक्का हे शिकावं.
जात, धर्म, पंथ, वंश मातीत गाडून
मातीशी इमान राखावं.
हे शिकावं.
संकटांचं नरडं चिरून,
समस्यांच्या छाताडावर
पाय रोवून उभे राहावं.
हे शिकावं.
शत्रू रणांगणात समोर
नंग्या तलवारीचा असो
वा घरातलाच नजरेआड
पाठीत खंजीर खुपसणारा असो,
त्याचा वार कसा परतावा?
हे शिकावं.
चहू बाजूनी वेढ्याने आवळावा जीव
तेव्हाच दुश्मनाची हेरावी कसर,
आणि गगणभेदी प्रतिवारानं छेदावं
दुखाःचं मुंडके.
हे शिकावं.
फितुर बदफैलीला
द्यावं तोफेच्या तोंडी वा
हत्तीच्या पायाखाली चिरडून
टाकावी आपल्याच ताटात
माती कालवनार्यास.
खाल्या मीठाला कसं जागावं?
हे शिकावं.
कध्धीही कध्धीही हार न मानता
झुंजत रहावं.
मृत्यू येईस्तोवर पराभूत न
होता लढत रहावं
शेवटाच्या क्षणापर्यंत …
हे शिकावं….
©उज्ज्वला बागुल खोब्रागडे छत्रपती संभाजीनगर १९/०२/२१

धडे आदर्शाचे घेऊ
जय बोलू शिवबाजी
जय माऊली जिजाऊ
चला करु जयकार
कार्य तयांचे आठवू॥धृ॥
माय शिवबाची आऊ
राज माऊली जिजाऊ
हिने केले बळकट
बाल शिवबाचे बाहू॥१॥
सुभेदाराच्या स्नुषेला
म्हणे, जशी माझी आऊ
पूत्र असा घडवूया
होऊ सार्याच जिजाऊ ॥२॥
हिच काळाची गरज
हाती काळासही घेऊ
सांगू नव्या दुनियेला
आम्ही आजच्या जिजाऊ ॥३॥
धडे आदर्शाचे असे
चला सख्यांनो गिरवू
नव्या युगाचा नव्याने
इतिहास या घडवू॥४॥
जय शिवबा जिजाऊ
जयघोष या घुमवू
जय बोलू शिवबाजी
जय माऊली जिजाऊ॥५॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल, जिल्हा जळगांव.

शिवभक्त
वंदन करितो शिवबांना
ज्यानी घडविला इतिहास
मॉ.जिजाऊ,शिवबाचे भक्त
त्यांनी लिहिला इतिहास
वंदन करितो शिवबांना
स्वराज्य केले स्थापन
मराठ्यांचे कैवारी सरदार
स्रीयांना दिला सन्मान
वंदन करितो शिवबांना
राजगड,रायगड,सिंहगड पुरंदर प्रतापगड ,कोंडाना,तोरणा,
लाविले पताका सर्वांवर
वंदन करितो शिवबांना
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग,
जंजिरावर उभारीले आरमार
तुटून पडायचे शत्रुवर
शूरवीर आमचे मरठा सरदार
दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे

विश्वातील दैदिप्यमान, किर्तीमान नीतिमान आदर्श राजा “श्री. छत्रपती शिवाजी महाराज”.
जय श्री शिवराय, आम्ही नाही तुमच्या शिवाय!
जय श्री शिवराय, भारतीयांचे हृदय नाही तुमच्या शिवाय!सूर्याभोवती अनेक ग्रह फिरत असतात.कारण गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह आकर्षित होऊन ग्रह फिरत असतात हे आपण जाणतोच. त्याच प्रमाणे
श्री. शिवरायांच्या नावात इतके
जबरदस्त गुरुत्वाकर्षण आहे की
प्रत्येक नागरिक या विश्वातील
महान व आदर्श राजाकडे आकृष्ट
होत असतात. केवळ त्यांच्या
जयघोषाने , जय जयकार केल्या शिवाय महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना सत्ता मिळत नाही हे उघड उघड सत्य आहे. राज्यातील कोणताही कार्यक्रम
असो शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्याशिवाय सुरू
होत नाही. प्रत्येक नागरिकाच्या
ह्रुदयात शिवरायांचे अढळ स्थान निर्माण झाले आहे. शिवराय म्हणजे आमचे दैवत असून त्यांचे
नामस्मरण केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. राष्ट्र
प्रेम, समाज प्रेम यांचे स्फूर्तिस्थान
म्हणजे श्री. शिवराय होय. आज
देशात ठिकठिकाणी शिवरायांचे
स्मारक दिसतात. कारण त्यांनी
राष्ट्र व समाजासाठी केलेला
जिवन त्याग!पूर्वी राजेशाही पद्धतीत परंपरेने राज सिंहासनावर मुलगा मुलगी बसत असे. श्री. शिवराय एक सामान्य व्यक्ती म्हणून माता
जिजाऊ व शहाजी भोसले यांच्या
कुटुंबात जन्मास आले.त्यांच्या
कुटुंबात कोणीही राजदरबारात
नव्हते. त्या काळात आपल्या देशात बाहेरील आक्रमकांनी
अत्याचार, अन्याय यांचा कहर
केला होता. मंदिरे तोडली, धर्मांतर केले, जनतेवर पाशवी
अत्याचार केले .त्यामुळे जनता
त्रासून गेली होती. जनतेला
कोणीही वाली नव्हता. अशा भयावह परिस्थिती मध्ये श्री. शिवरायांनी ग्रामीण, डोंगराळ
भागातील शुर व धाडसी तरुणांची
फौज स्थापन केली. माता जिजाऊने रामायण व महाभारत
मधील कथा सांगून शिवराय
मध्ये देश व समाज प्रेम निर्माण
केले.त्यांच्यात जन जागृती निर्माण केली. जनतेवर चे अत्याचार पाहून राजेंना चीड आली .राजेंना
कोणाचाही पाठिंबा नव्हता. आधार नव्हता. धन संपत्ती नव्हती. अशा स्थितीत तरुणांना
गनिमी काव्याचे शिक्षण दिले.
त्यांच्यात समाज व देश विषयी
प्रेम निर्माण केले. परकीय आक्रमण रोखण्याचे आव्हान स्वीकारून राजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्याचारी व दुष्ट
आक्रमण विरुद्ध लढाईचे रणशिंग
फुंकले. गनिमी काव्याने शत्रूवर
हल्ले करून त्यांच्यात दहशत निर्माण झाली. राजेंनी अनेक
प्रदेश ताब्यात घेतला. कोणत्याही
राजसत्तेचा आश्रय नसताना
राजेंनी मोठ्या हिमतीने दोन हात
केले. राजेंचा दबदबा वाढत गेला.
जनता त्यांच्याकडे आपला रक्षक
म्हणून पाहू लागले. राजे स्वतः
ग्रामीण व डोंगराळ भागात फिरून जनतेच्या समस्या जाणून घेत असे. साहजिकच जनता
त्यांच्याकडे आपला राजा म्हणून
पाहत असे.देशात सर्वत्र परकीय आक्रमकांनी
हैदोस घातला होता. सर्वत्र जनतेचे संरक्षण करण्यासाठी देशात त्या काळी फक्त श्री.शिवराय एकटे खंबीर नेतृत्व होते. पाठबळ नसतांना देशात नवचैतन्य निर्माण केले. श्री. शिवराय देशाचे आदर्श महापुरुष
म्हणून उदयास आले. भारतीय
जनतेत देश प्रेम शिवराय यांच्या मुळे जागृत झाले. परकीय आक्रमणे ठप्प झाली. शिवराय
देशाचे व जनतेचे सेवा व संरक्षण
करण्यात इतके गुंग होते की त्यांचे स्वतःच्या कुटुंबाकडे व स्वतःच्या आरोग्य कडे दुर्लक्ष झाले. पण
त्यांनी समाज सेवे कडे दुर्लक्ष केले नाही. म्हणून शिवराय आपले दैवत आहे.शिवरायांनी कधीही भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्मावर त्यांचे प्रेम होते. त्यांच्या सैनिक दलात
सर्व जाती व धर्माचे नागरिक होते. शिवरायांचा राज्यकारभार
अत्यंत उत्कृष्ट होता. त्यांच्या दरबारात हुशार व तज्ज्ञ मंडळी
होती. परस्त्रीला मातेसमान मान
देत असे. त्यांनी परकियांना सुद्धा
आपलेसे केले. म्हणून अनेक जागतिक कवी व लेखकांनी
शिवरायांचे गुणगान केले आहे.
शिवरायांना दूरदृष्टी होती म्हणून
त्यांनी सागरात किल्ले बांधले.
त्यामुळे परकीय आक्रमणापासून
भारताचे सरक्षण झाले. राज्यात
अनेक ठिकाणी किल्ले, गड बांधले. आजही त्यांचे गड व किल्ले पाहण्यास अनेक नागरिक
येत असतात. युनोने सुद्धा या गडांची व किल्ल्यांची दखल घेतली आहे.शिवराय न्याय प्रिय होते. स्वतःच्या नातेवाईकांना सुद्धा त्यांनी शिक्षा केली आहे. त्यांच्या पुढे सर्व समसमान होते. म्हणून
त्यांची विश्वात कीर्ती पसरलेली
आहे. विश्वात फक्त श्री. शिवराय
असे राजे आहेत की त्यांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. कोणत्याही राजे महाराजे
पाठबळ नसतांना त्यांनी स्वतःचे
राज्य निर्माण केले. यातच त्यांचे
गुणविशेष दिसून येतात. सारे विश्व त्यांची युद्धकला शिकत
आहे. गनिमी काव्याचे अभ्यास
करीत असतात. या गनिमी काव्याच्या डावपेचांचा अभ्यास
केल्याने अनेक लहान देशांनी
बलाढ्य राष्ट्रांना पळवून लावले
आहे.श्री. शिवराय म्हणजे विश्वाचे आदर्श आहेत. अनेक जागतिक
नेत्यांनी त्यांच्या विषयी गुणगान
केले आहे. त्यांच्यावर ग्रंथ लिहिले
आहेत. श्री. शिवराय विश्वात असे
राजे होऊन गेले की त्यांनी
स्वतःचे कधीही सुख पाहिले नाही.म्हणून विश्व त्यांचा आदर्श
घेऊन राज्यकारभार करीत आहे.
आज जगात युद्ध जन्य परिस्थिती
निर्माण झाली आहे. जागतिक
युद्ध केव्हाही भडकू शकते इतकी
वाईट स्थिती निर्माण झाली आहे.
अशा प्रसंगी शिवरायांचे आदर्श
घेऊन विश्व शांती निर्माण होऊ शकते.श्री. शिवरायांच्या जयंती निमित्त
त्यांना कोटी कोटी प्रणाम!
खान्देश सम्राट संपादक हेमंत जगदाळे धुळे

1 thought on “शिवजयंतीच्या शुभेच्छा”