chhatrapati shivaji maharajanche balpan nibandh
शिवबा’ माझा जाणता राजा
1) आदर्शपुत्र ,सावध नेता, जिगरबाज, लढवय्या, निष्ठावंत, कीर्तीवंत, वरदवंत अशा माझ्या राजाचे कार्य तुमच्यासाठी
2) सत्तेची ढाल वीरतेचा भाला निष्ठेची तलवार आणि महादेवाचा नारा स्वराज्याचा ध्यास, तोफांचा आवाज ,
घोड्यांच्या ताफांचा नाद ,कडे कपारी फिरत होता हा मर्द मराठ्यांचा वाघ!
3) “शहाजी आणि जिजाऊ चे हे रत्न;
या रत्नासाठीच जणू केला होता त्यांनी यत्न” नाव त्याचे हो कार्यातून
हाच होता जिजाऊंचा प्रयत्न.
4) “शहाजींचे दिवस ते धावपळीचे; तेव्हाच होते जिजाऊंचे कुस उजवण्याचे;
“अस्थिर वातावरणात हे सारे कसे व्हायचे
वेद लागले सर्वांनाच की चिंतेचे “.
5) “आठवण झाली राजांना शिवनेरी त्या किल्ल्याची!
विजयराज सारख्या किल्लेदारावर सोपवली जबाबदारी रक्षणाची.”
6) “जिजाऊ च्या पोटी पुत्र जन्मले ..३० साली.
रक्षण करती ती शिवाई देवीचं होती की वाली.” आशीर्वाद रुपी नाव मिळाले शिवबाचे ते नामकरण झाले
7) “बालपणीच जिजाऊंनी सांगितल्या पौराणिक आणि शौर्याच्या गाथा “
त्याचं संस्कारातूनी शिवबाने जाणिल्या
प्रजेच्या त्या व्यथा;
म्हणूनच रचल्या गेल्या शिवबाच्या त्या कथा.”

8)” शत्रुने जनतेला पुरते होते त्रासले म्हणूनच शिवबाणे स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले
लढता लढता देऊनी झुंज कडवी
फितुरी मात्र सतत येई शिवबास आडवी.”
9) “शुर, काटक, धाडसी, स्वामिनिष्ठ मराठे सरदार
विश्वासावर चाले शिवबाचा कारभार.”
10) “जपला शिवबान सर्वधर्मसमभाव
हेरून जातीचं सार (वैशिष्ट्य) दरबारी दिला त्यांस वाव.”
11) ” जिवंत ठेवल शौर्य त्यानं; स्वराज्याचे राखुनी भान;
साधुसंतांचा करूनी सन्मान
“स्त्रियांचा राखुनी मान;
रयतेचे करुनी कल्याण
नाही ठेवली कशाचीच वाण;
म्हणूनच तर प्रत्येकाच्या तोंडी शिवबाचं गाणं.”
12) “किती ती सोसायची गुलामगिरी;
घेतली शपथ रायरेश्वरी;
जमली सारी मावळे मंडळी;
का पाणी प्यावे दुसऱ्याच्या ओंजळी.”
13)” घोडदौड’, तलवारबाजी, आडमार्ग, चोरवाटा, गनिमी कावे
मावळे झाले शिवबा साठी पार वेडे
चढून ते उंच उंच च कडे
शिवबा भोवती मावळ्यांनी उभारले संरक्षक भक्कम कडे
14) “वतनदार ते वतनासाठी उठ सूठ भांडले (देशमुख)
साम-दाम दंड भेदाने शिवबाने त्यास वठणीवर आणले.”
15) पुणे सुपे चाकण इंदापूर
होती येथे जहागिरी
शिवबाची नजर मात्र होती तोरणा किल्ल्यावरी.”
“तानाजी ,येसाजी, मावळ्यांनी केली चढाई तोरण्यावरी.”
तोरणा किल्ला जिंकूनी; स्वराज्याचे तोरण बांधूनी; प्रचंड गड त्यास नाव देऊनी….
16) “मुरुंब देवाच्या डोंगरावरी;
आदिलशहाने किल्ला दिला अर्धवट
सोडुनी; शिवबाने त्यास ताब्यात घेऊनी
सर्वास कामास लावूनी
“पाथरवटाने दगड घडवूनी; लोहाराने भाता फुंकुनी; सुतार गवंडी कामाला लागुनी;
12 महाल 18 कारखाने मिळूनी; तयार झाली पहिली राजधानी.

17) “रायरीच्या किल्ल्यासाठी
शिवराय आणि मोरे तीन महिने लढले;
शेवटी शिवबाने रायरीला आपल्या ताब्यात घेतले.
रायरीचे नामकरण रायगड असे केले.
18) राजगड वसला मुरुंब देवाच्या डोंगरावरी प्रतापगड तो वसला भोरप्या डोंगरावरी डौलाने भगवा झेंडा सदाच कसा फडफडी
19) “बाजीने लावून बाजी
खिंड ती लढविली
सिद्धी जोहरास पक्की धुळ त्याने चारीली;
;बाजी उद्गारले निघा राजे निघा!रयतेला दुसरा बाजी मिळेल; पण दुसरा शिवाजी नाही ऐका राजे ऐका! पोहोचावे विशाळगडी.
“बाजीची पाहुनी स्वामी भक्ती;
कवटाळीले त्यास छातीशी;
गहिवरूनी राजे निघाले;
कडवी झुंज देता देता बाजीने घोडखिंडीस पावन केले
20) बडी मा साहेबा चा अफजलखानाने विडा उचलूनी
आणतो म्हटला शिवबाला पकडून नाही तर ठार मारुनी
गाठ पडली कपटी खानाशी
शिवराय गेले प्रतापगडाशी
चिडला खान जीवाशी
शिवबाने ठरविले मनाशी;
शक्तीने नाहीतर युक्तीने
भेटावे कपटी खानाशी;
भेट ठरली माची वरती
भवानी मातेचे दर्शन घेऊनी;
भीतीचे ते सोंग घेऊनी
एकमेकास आलिंगन देऊनी;
शिवबाची ती मान दाबुनी
पण चपळाई ने खानाचा कोथळा काढुनी; सय्यद बंधाचा वार झेलुनी जिवा महालाने शिवबाचे प्राण वाचुनी धन्य झाले ते सारे मिळूनी
21) “शाहिस्तेखानाची बोटे तोडुनी; बादशहास तुरी देऊनी ;सुरते वरती छापा घालुनी..
“पराक्रमाचे पोवाडे रचूनी; 50 व्या वर्षी रायगडी देह ठेवोनी ;शिवबा झाला साऱ्या जगाचा धनी शिवबा झाला साऱ्या जगाचा धनी
स्मिता पाटील, खैरनार (MA BED) मुख्याध्यापिका नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 21 छत्रपती शिवाजी महाराज.)..
लेखिका कवयित्री सूत्रसंचालिका गायिका महिला प्रतिनिधी NDOA