धुळे येथे मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न
जय जिजाऊ,

मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक ६ जुलै २०२४ रोजी धुळे येथे मराठा सेवा संघ कार्यालय, नकाणे रोड, धुळे येथे मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पूर्व विधायक तथा अध्यक्ष धुळे, नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. धुळे बाबासाहेब राजवर्धन कदमबांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.

मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सोपान क्षीरसागर, सुनील महाजन, डॉ संजय पाटील तसेच कक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड चे डॉ निर्मलाताई पाटील, वैशाली पाटील, शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद चे प्रा. एम एल देशमुख.


मराठा उद्योग कक्षाचे अविनाश पाटील, तानुबाई बिरजे पत्रकार परिषद चे विलास पाटील, मराठा विद्यार्थी दत्तक कक्षाचे प्रमोद महाजन, मराठा सहकार परिषदेचे गणेश कापसे, मराठा वधू वर सूचक कक्षाचे गजानन पाटील, बाजीराव खैरनार, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे दिलीप साळुंके, डॉ रखमाबाई राऊत आरोग्य कक्षाचे डॉ आनंद पाटील, कृषी परिषदेचे विद्याचरण कडवकर, मराठा वसतिगृह कक्षाचे दिनेश कदम, गुजरात चे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब पवार, गिरीश ठाकरे, उद्योजक आनंद पाटील, मराठा सेवा संघ धुळे चे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
