महाराज सयाजीराव गायकवाड
महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे निर्माते
छ. सयाजीराव महाराज आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे निमति होते. हा सिद्धांत प्रस्थापित करणारे शेकडो पुरावे सयाजीचरित्रात सापडतात. त्यानिमित्त या सिद्धांताला बळकट करणारे काही निवडक आणि ठळक तपशिलांचे पुनर्वाचन अनिवार्य ठरते.
महाराज सयाजीरावांचा जन्म
गोपाळराव म्हणजेच सयाजीरावांचा जन्म 11 मार्च 1863 रोजी कवळाणा (जि. नाशिक) येथे झाला. 27 मे 1875 रोजी दत्तकविधानानंतर ‘सयाजीराव तिसरे’ असे नामकरण करण्यात आले. वयाच्या 14 व्या वर्षी अहमदाबाद येथे अस्पृश्यांसोबत सहभोजन केले. वयाच्या 18 व्या वर्षी सयाजीरावांच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे सोपवण्यात आली.

महाराज सयाजीराव गायकवाड राज्यकारभार
राज्यकारभाराच्या दुसऱ्या वर्षी 1882 ला बडोद्यातील सोनगड तालुक्यातील आदिवासी आणि अस्पृश्यांसाठी मोफत निवासासह शिक्षणाचा क्रांतिकारक हुकूम काढला. स्रीशिक्षिका तयार करण्यासाठी फिमेल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना केली. राजवाड्यातील खंडोबाचे खाजगी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करणारे सयाजीराव आधुनिक भारतातील पहिले प्रशासक आहेत. महात्मा फुलेंच्या ‘शेतकन्याचा असूड’ ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आर्थिक मदत केली.
महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक उद्योग व्यवसायाचे जनक
आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना गणदेवी येथे सुरु केला. शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी खासेराव जाधवांना लंडनला पाठवले. बडोद्यात भारतातील महिलांसाठीची पहिली व्यायामशाळा सुरू केली. राजवाड्यातील अस्पृश्यांसाठी वेगळ्या जेवणाच्या पंगतीची पद्धत स्वतः त्या पंगतीत बसून मोडणारे सयाजीराव आधुनिक भारतातील पहिले प्रशासक उरले. लंडन येधील इंम्पीरिअल इन्टिटयूटला 50 हजार रु.ची आर्थिक मदत दिली. 1888 ला सवाजीरावांनी केलेल्या सूचनेवरून जोतीबा फुलेंना ‘महात्मा’ पदवी देण्यात आली. सयाजीरावांचा साध्या बेशातील फोटो मागवून घेवून फुलेंनी तो आपल्या बैठकीच्या खोलीत लावला होता.
सक्तीच मोफत प्राथमिक शिक्षण
फुल्यांच्या मृत्यूनंतर 1892 मध्ये सावित्रीबाईना 1,000 रु. च्या ठेवीच्या व्याजातून दरमहा 50 रु. पेन्शन चालू केली. सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाची भारतातील पहिली सुरुवात बडोद्यात झाली. दादाभाई नौरोजींना इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्सच्या निवडणूक खर्चासाठी 15,000 रु. तसेच निवडून आल्यांनतर पक्षनिधीसाठी 15,000 रु. ची मदत केली. शिवकर तळपदेच्या मुंबई येथील जगातील पहिल्या विमानोड्डाण प्रयोगास आर्थिक सहाय्य केले. बडोद्यात रामजी संतूजी आवटे व धामणस्कर यांनी मराठा जातीचे पुजारी तयार करण्यासाठी पोरोहित पाठशाळा सुरु केली. बडोद्यात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणामध्ये प्रसंगी पुरोहित बदलून वेदोक्त विधी सुरु केले.

कोल्हापूरच्या वेदोक्त संपर्षात सयाजीराव शाहू महाराजांच्या पाठीशी
कोल्हापूरच्या वेदोक्त संपर्षात सयाजीराव शाहू महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले1888 सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी वेदोक्त विर्षीची सुरुवात करताना क्षत्रियत्य सिद्ध करण्यासाठी उदेपुराहून आणलेल्या पुराव्याची कागदपत्रे उपलब्ध असल्यास आपल्या माणसांकरवी शाहू महाराजांना देण्याचे सयाजीरावांनी पत्राद्वारे मान्य केले होते.
गाव तेथे ग्रंथालय
आदिवासी, अस्पृश्य,औद्योगिक कामगार, भंगी, ब्राह्मण अशा सर्व समाजघटकांसाठी एकूण 58 प्रकारच्या सहकारी संस्था 90 वर्षापूर्वी यशस्वीपणे कार्यरत केल्या. 1907 साली ‘गाव तेथे ग्रंथालय’ हा हिंदुस्थानातील पहिला प्रयोग सुरु करून पत्र्याच्या पेटीतून फिरते बाचनालय सुरु केले. याच वर्षी महिला लायब्ररी निर्माण करुन तेथे महिला ग्रंथपाल नेमली. हा भारतातील पहिला प्रयोग होता.
साक्षर जनतेला ज्ञानी बनवण्यासाठी 1910 साली बडोद्यात एक लाख पुस्तके असणारी आशिया खंडातील सर्वात मोठी सेंट्रल लायब्ररी उभारली. 1910 मध्ये बडोद्यातील ज्युचिली बागेत बुद्धाचा पुतळा जपानहून आणून बसविला. 1913 मध्ये कन्या इंदिरादेवी यांचा कुचबिहार या आदिवासी संस्थांनातील राजकुमार जितेंद्र नारायण यांच्याशी विवाह लावून दिला. हा राजघराण्यातील पहिला मराठा आदिवासी विवाह आहे.
संस्कृत वेदशाळेची स्थापना बचतगट चळवळीचे जनक
1913 मध्ये अस्पृश्य आणि ब्राह्मणेतरांसाठी पहिल्या संस्कृत वेदशाळेची स्थापना केली. 1913 मध्ये धारा सभेवर डॉ. आंबेडकरांची अस्पृश्य सदस्य म्हणून निवड केली. 1916 मध्ये बडोदा कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्म अभ्यासाचे स्वतंत्र अध्यासन सुरू केले, अशा प्रकारचे हे जगातील बहुधा पहिले अध्यासन असावे.
1931 मध्ये हुकुमाद्वारे हौद किवा विहिरी बांधल्यावर किंवा त्याची योजना सादर करताना अस्पृश्यांना त्याचा बापर करुन देणे बंधनकारक केले. 1931 साली महिलांच्या काटकसर संस्थांची (बचत गट) निर्मिती केली. महिलांप्रमाणे पुरुषांच्याही काटकसर संस्था सुरु करून आदर्श निर्माण केला. भारतातील बचतगट चळवळीचे जनक महाराजा सयाजीराव होते.
महाराज सयाजीराव गायकवाड डॉ बाबासाहेब आंबेडकर
1931 च्या दुसन्या गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांचे विद्वत्तापूर्ण भाषण ऐकल्यानंतर खुस होऊन महाराजांनी लंडनमध्ये हॅन्स क्रिसेंट हॉटेलमध्ये आंबेडकरांना पार्टी दिली. या पार्टीत बाबासाहेबांचे पूर्वआयुष्य व विद्वत्ता विशद करणारे भाषण केले. यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या आवाहनानुसार उपस्थित मान्यवरांनी अस्पृश्योद्धाराच्या कामाला भरघोस मदत केली. यामध्ये महाराजांच्या 150 पौंडासह इतर मान्यवरांनी 1335 पॉडची मदत केली. ही रक्कम आजच्या रुपयाच्या मुल्यात 4 कोटी 44 लाख रु. इतकी भरते.
जागतिक सर्वधर्मपरिषदेचे सयाजीराव अध्यक्ष
संस्थानातील सर्व सरकारी मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली करण्याचा आदेश दिला. शिकागो येथे झालेल्या दुसन्या जागतिक सर्वधर्मपरिषदेचे सयाजीराव अध्यक्ष होते. हे अध्यक्षपद भूषविणारे सयाजीराव एकमेव भारतीय आहेत. पाली भाषेला राजाश्रय देणारा हा आधुनिक भारतातील पहिला राजा आहे.

युगपुरुषांना मदत
देशातील बहुतांश सर्वच युगपुरुषांना सयाजीरावांनी वेळोवेळी मदत केली. यापैकी दादाभाई नौरोजी, म. गांधी, ना. गोखले, म. फुले, डॉ. आंबेडकर, पं. मालवीय, टिळक इ. काही ठळक उदाहरणे आहेत. सयाजीरावांनी साहित्य, कला, शिल्पकला, ग्रंथालय, संगीत इ. ना सर्व प्रकारची मदत केली.
कायदे कायदे निर्मिती आणि अंमलबजावणी
सयाजीराव महाराजांनी केलेले भारतातील पहिले 18 कायदे केले. राजवाड्यावरील धार्मिक विधी बेदोक्त पद्धतीने करण्याचा हुकूम, विधवा पुनर्विवाहाचा कायदा, धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा, ग्रामपंचायत नियम, हिंदू कोड बील, हिंदू विवाह, सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण कायदा, परोपकारी संस्था कायदा, विशेष विवाह कायदा, हिंदू दत्तक विधान कायदा, हिंदू पुरोहित कायदा, हिंदू घटस्फोट कायदा, जातीय छळ निर्मूलन कायदा, संन्यास दीक्षा प्रतिबंध कायदा, सामाजिक दुर्वलता मिलन कायदा, सरकारी नोकरीत स्त्रियास दाखल करण्यास हरकत नाही, त्यांच्याशी सभ्यतेने वागणे, संस्कृत पाठशाळा अमुक एका वर्गासाठी नसून हिंदूतील सर्व जातींसाठी आहे.
64 वर्षे बडोदा संस्थानाचे शासक
महाराजा सयाजीराव गायकवाड 64 वर्षे राज्य करणारे हिंदुस्थानातील एकमेव राजा आहेत. आपल्या सर्व 24 जगप्रवासांचे अहवाल छापून प्रकाशित करणारे भारतातील एकमेव राज्यकर्ते आहेत. भारतीय महिलांचा हा भारतातील पहिला क्लब होता.
सयाजी महाराज दानवीर शासक
देशातील संस्था व व्यक्तींना महाराजांनी दिलेली एकूण आर्थिक मदत 5 कोटी 6 लाख 21 हजार 639 रु. इतकी होती. ही रक्कम आजच्या रूपयाच्या मूल्यात 286 कोटी 89 लाख 47 हजार 839 रु. इतकी भरते. त्या काळात महाराष्ट्राला एवढी मदत करणारे सयाजीराव हे एकमेव होते.

महत्वाची बाब म्हणजे ही यादी अपूर्ण असून यापेक्षाही जास्त मदत महाराजांकडून महाराष्ट्राला मिळाली असल्याची शक्यता आहे. हा सर्व इतिहास क्रांतिकारक समाजपरिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या एका तळमळीच्या प्रशासकाचा आहे. हा इतिहास समाजाला प्रेरणा आणि उर्जा देणारा आहे. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आपल्या समकालीन समस्यांना भिडत असताना आपल्या समोरील गुंतागुंतीच्या आव्हानांना सकारात्मक उत्तर देणारे आहे.
संकलन
सौरभ गायकवाड वारणानगर, 9175001862






सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन
2 thoughts on “महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक”