shivaji maharaj balpan तशी मासाहेब जिजाऊ तसे शिवाजी महाराज

कुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा | काळ तो असे यवनांचा ||
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा | असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले ||
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले | जिजाबाईस रत्न सापडले ||
हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले | ज्यांनी कमळा लाजविले ||
वर ख़ाली टिर्या पोटर्या गांठी गोळे बांधले | स्पटिकापरी भासले ||
सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले | नांव शिवाजी शोभले ||
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले | जसा का फणीवर डोले ||
एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले | मोती लडी गुंतविले ||
रक्तवर्ण नाजूक होटी हासू छपविले | म्हणोन बोबडे बोल ||
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले | विषादें म्रुग वनी गेले ||
नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले | ज्यांनी चंद्रा हाटविले ||
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले | कुरळे केस मोघीले ||
आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले | चिन्ह गादिचे दिसले ||
जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले | धाकट्या बाळा लेविवले ||
किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले | कलाबतुचे गोंडे शोभले ||
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले | डाग लाळीचे पडलेले ||
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे | पायी घुंगरू खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले | ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||
मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले | चिन्ह पाळणी दिसले ||
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले | पाळण्या हालवू लागले ||
धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले | गातों गीत तिने केले ||
~ महात्मा ज्योतिरावफुले यांनी १८६९ साली छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिला पोवाडा लिहिला…

2 thoughts on “shivaji maharaj balpan तशी मासाहेब जिजाऊ तसे शिवाजी महाराज”