6 जून शिव राज्याभिषेक सोहळा

6 जून शिव राज्याभिषेक सोहळा


6 जून शिव राज्याभिषेक सोहळा!

शिव राज्याभिषेक हा संपूर्ण भरत खंडासाठी आनंद आणि स्वाभिमानचा दिवस आहे. तो काल जगभर आनंद उत्साहात वाजत गाजत साजरा झाला. 6 जून 1674 रोजी महाराजांनी स्वतःला वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला,  स्वतःची छत्रपती म्हणून द्वाही फिरविली. सोयराबाई साहेबाना पट्टरांनीचा मान मिळाला आणि शम्भूराजांची युवराज पदी घोषणा केली गेली, हेही एक यां दिवसाचं महत्व आहे. भारतीय पंचांग प्रमाणे तो दिवस आहे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596.

महाराष्ट्रात अल्लाउद्दीन खिलाजी यानी देवगिरीच समृद्ध यादव सम्राट घराणं संपलं. त्या दिवसापासून अहिराणी किंवा मराठी देशाला स्वकीय राजाच नव्हता. होते तें सर्व परकीय, परधर्मी, हिंसक आक्रमक. ई स 700 च्या दरम्यान महमद बिन कासीम यां अरबाने भारताच्या सिंध प्रांतावर पहिले आक्रमण केले. त्यावेळी तिथे राजा दाहीर याची सत्ता होती. महमद बिन काशिम याने दाहीर राजाची हत्या केली. त्याच्या मुलींना कैद करून खलिपाला भेट म्हणून पाठविल्या. मंदिर पाडली, मुर्त्या फोडल्या, हजारो पुरुषांच्या कत्तली केल्या. हजारो आया बहिणीवर बलात्कार केले. त्यांना भोगदासी बनवून अरबस्थान नेले. बेसुमार संपत्ती लुटून नेली.

तिथून पुढे ई स 1630 पर्यंत जवळपास एक हजार वर्ष हे हैवानी थैमान सुरु होतं. 1630 साली स्वातंत्र्य सूर्य छ शिवाजी महाराज यांचा जिजामाताच्या पोटी शिवनेरी किल्यावर जन्म झाला. आणि भारतीय जनतेची हजार वर्षाच्या अत्याचारातून सुटका झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. पुढे त्यांच्या मावळ्यांनी त्या स्वराज्याचे मराठा साम्राज्य निर्माण केले. संपूर्ण देश गुलामीतून मुक्त झाला.


6 जून शिव राज्याभिषेक सोहळा
6 जून शिव राज्याभिषेक सोहळा

महाराजा बद्दल रामदास्वामी काय म्हणतात बघा.

निश्चयाचा महामेरू l बहुत जनाशी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारू l श्रीमंत योगी
परोपकाऱाचिया राशी l उदंड घडती जयाशी
तयाचे गुण महत्वाशी l तुळना कैची?
नरपती,हयपती,गजपती l गडपती,भूपती,जळपती
पुरंदर आणि शक्ती l पृष्ठभागी
यशवंत, कीर्तिवंत l सामर्थ्यवंत वरदवंत


पुण्यवंत, नीतिवंत l जाणता राजा
आचारशील, विचारशील l दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील l सकळा ठायी
धीर उदार गंभीर l शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर l तुच्छ केले
तिर्थेक्षेत्रे मोडीली l ब्राह्मण्यस्थाने भ्रष्ट झाली
सकळ पृथ्वी आंदोळली l धर्म गेला


देव धर्म गोब्राह्मण l करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण l प्रेरणा केली
उदंड पंडित पुराणिक l कवीश्वर याज्ञानिक वैदिक
धूर्त तारकीक सभानायक l तुमच्या ठायी
यां भुमंडळाच्या ठायी l धर्म रक्षिल ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही l तुम्हा करणे
आणिकहीं  धर्म कृत्य चालती l आश्रित होऊन कित्येक राहती


धन्य धन्य तुमची कीर्ती l विश्वि विस्तारली
कित्येक दुष्ट संहारिले l कित्येकशी धाक सुटले
कित्येकाशी आश्रय जाहले l शिव कल्याण राजा
तुमचे देशी वास्तव्य केले l परंतु वर्तमान नाही घेतले
ऋणानुबंधे विस्मरण जाहले l काय नेणो
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती l सांगणे काय तुम्हाप्रती
धर्मसंस्थापनेची कीर्ती l संभाळीली पाहिजे
उदंड राजकारण तटले l तेणे चित्त विभागले
प्रसंगा नसता लिहिले l क्षमा केली पाहिजे

प्रौढप्रतापपुरंदर, गोब्राह्मणप्रतिपालक, मुगलदल संहारक, भोसले कुलदीप, विमलचरित, क्षत्रिय कुलवंतस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज कीं जय!


सर्वाना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बापू हटकर

शिवाजी महाराज की फोटो

2 thoughts on “6 जून शिव राज्याभिषेक सोहळा”

Comments are closed.