मराठांना झालंय तरी काय?
मराठा समाजाचा मसिहा :श्री.मनोज जरांगे पाटील हेच आहे पण
आज महाराष्ट्रात प्रत्येक मराठा
समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला विचारले तुझा आवडता नेता कोण आहे? गळ्यातील ताईत कोण आहे? प्रत्येक व्यक्ती एकच
उत्तर देईल…आमच्या आरक्षणासाठी दिवस रात्र झटणारा महाराष्ट्रतील महान व्यक्तिमत्त्व श्री. मनोज जरांगे पाटील हे आहेत! हे उत्तर प्रत्येक
मराठा समाजाच्या व्यक्ती कडून अपेक्षित आहे…असणारच!
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. आपण मोठ्या अभिमानाने व गर्वाने म्हणतो की
महाराष्ट्रात मराठ्यांची सत्ता आहे.
मुख्यमंत्री मराठा, अनेक मंत्री मराठा, अनेक आमदार मराठा आहे
हे आपणास पाहण्यास व ऐकण्यास मराठा
समाजाची छाती किती विस्तारित
होत असेल! पण ही सत्ता ठराविक व मोजक्या मराठा परिवाराच्या हाती आहे, त्यांची
मक्तेदारी आहे . वडील नंतर मुलगा, कन्या हे सत्तेत सामील
होतात . म्हणजे ही घराणे शाही
आपण पाहत आहोत. अनेक प्रकारच्या संस्थेत त्यांचेच सगे संबंधी, नातेवाईक यांचा भरणा असतो. त्यांचीच संस्थेच्या पदावर
वर्णी लागलेली असते. पण जी
मराठा समाजाची सामान्यजनता ही नेत्यांच्या घरी पाणी भरत असते. त्यांना निवडणूक काळात प्रचारासाठी उपयोगात आणून खाऊपिऊ घालून सतरंज्या उचलण्याचे काम करवून घेतात. पण त्यांच्या भावी
जीवनाचे काय होणार याचा विचार या नेत्यांनी केला नाही. नेत्यांची मुले लोकप्रतिनिधी होऊन त्यांना भविष्याची चिंता भेडसावत नसते .संपत्ती गडगंज
असल्याने त्यांना आरक्षणाची गरज उरत नाही . त्यामुळे सत्ता
धारी मराठा नेत्यांनी समाजाला
आरक्षणाची गरज आहे याचा विचार केलाच नाही. ज्या दोन तीन मराठा नेत्यांनी विषय काढला त्यांना पक्षातून निलंबित केले.उलट काही सत्ता धारी नेत्यांनी इतर समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजासाठी कोटा
शिल्लक ठेवला नाही. यामुळे मराठा समाज आज पूर्णपणे
आरक्षणापासून वंचित राहिला आहे.तसेच मराठा समाजाची
इतकी वाईट अवस्था पाहून आताही आजी माजी मराठा नेते
आरक्षण साठी एकत्र येण्याचे नाव घेत नाही व आरक्षण विषयी
मूग गिळून बसले आहेत .यावरून
हे स्पष्ट होत आहे की कोणताही
आजी माजी मराठा लोकप्रतिनिधी आरक्षण विषयी उदासीन आहेत इकडे मात्र सामान्य व गरीब मराठा समाज
आरक्षण मिळविण्यासाठी तळमळ करीत आहे .मराठा नेत्यांना अशी भीती आहे की समाजास एकदा आरक्षण दिले की आपले सामाजिक महत्त्व आहे त्यांचा अधिकार कमी
होऊ शकतो त्यांची भीती त्यांना असते .निवडणूक काळात
आपल्याला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. आज महाराष्ट्रात
अनेक शेतकरी मराठा समाजातील आहेत .निसर्गाच्या
लहरीपणामुळे आज त्यांची दैन्यावस्था पाहवत नाही.कित्येक
शेतकरी आत्महत्या करतात.त्यांच्या मुलांची लग्ने जमत नाही. शिक्षण सुद्धा अपूर्ण राहते. त्यांची अनेक मुले अवैध
व्यवसाय करीत असतात. काही
व्यसनाधीन झालेली दिसतील.
शिक्षणाचा खर्च करण्यास ते असमर्थ आहेत. इतर समाजाची
मुले मात्र उच्च शिक्षण कमी पैशात घेत आहेत.अशा प्रसंगी मराठा समाजाला आरक्षणची
किती गरज आहे हे सिद्ध होत आहे.
आज आम्हाला सांगण्यास शरम,
लाज वाटते की महाराष्ट्राची सत्ता
मराठा नेत्यांच्या हाती आहे.कारण
त्या नेत्यांनी समाजासाठी काहीही
केले नाही. त्यांनी फक्त आपल्या
परिवाराचे कल्याण केले आहे. त्यांचे समाजाकडे लक्ष नाही. म्हणून अशा प्रसंगी मराठा समाजाला आता अंधारात एक उगवता तारा दिसला आहे.मनोज जंरागे या नेत्याची घरची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. श्रीमंती तर नाहीच. हे त्याच्या राहणी वरून समजते. मराठा समाजाला या गरीब नेत्या पासून
खूप अपेक्षा आहे. कारण त्याची
आरक्षण विषयी तळमळ, कळकळ पाहिली तर सर्व मराठा समाजाला खात्री पटली आहे की हीच व्यक्ती आरक्षण मिळून देईन.
या नेत्याने स्वतःची शेतजमीन विकून आंदोलनाचा खर्च करीत आहे.अहो किती हा मोठा त्याग!
मराठा समाजाच्या आरक्षण साठी
जीवन त्याग करण्याची सुद्धा तयारी आहे! आज पर्यंत समाजासाठी इतकी त्याची वृत्तीची व्यक्ती पहाण्यात आली नाही. आजी माजी मराठा सत्ताधाऱ्यांनी फक्त संपत्ती गोळा केली आहे पण या कर्णा सारखे
उदार असलेल्या श्री जरांगे पाटिल यांनी
तर स्वतःची जमीन विकून समाजात त्यागाचा आदर्श निर्माण केला आहे. म्हणूनच मराठा समाजाला खात्री आहे की
हीच व्यक्ती आरक्षण मिळवून देण्यास समर्थ आहे.महाराष्ट्रातील सारा मराठा समाज
या दानशूर व्यक्तीच्या मागे एकटवले आहेत. ग्रामीण ते मुंबई,
पासून मराठी जनता त्याच्या भाषणाला गर्दी करीत आहेत. ती
गर्दी पाहिली तर असे वाटते अजून पर्यंत कोणत्याच नेत्याच्या
सभेला इतकी अलोट गर्दी पाहिली
नाही. जनतेचे इतके प्रेम या
नेत्याला दिले आहे! कोणत्याही पक्षाचे पाठबळ नाही, मदत नाही!आर्थिक सहाय्य नाही. काय
ही त्याच्या कार्याची जादू!. आकर्षण, चमत्कार! केवळ त्याच्या हृदयात समाजाच्या फायद्यासाठी रात्रंदिवस धडपड चालू आहे.
समाजासाठी इतके महान ईश्वरीय
कार्य चालू असताना देखील मराठा समाजाचा राज्याची सत्ता
उपभोग घेतलेला कोणताही नेता
आता पर्यंत त्यास सहकार्य करण्यास पुढे सरसावला नाही .
त्याच्या थोर सामाजिक कार्यास
पाठिंबा सुद्धा जाहीर केला नाही.
किती हे नतद्रश्ट नेते! यांना नेते
म्हणण्याची सुद्धा लाज वाटत आहे! मराठा समाज विषयी
इतका आकस!मराठा समाजात पूर्वी एकी नव्हती. अनेक गटात विभागले गेले होते. कारण प्रत्येक नेता मराठा समाजाला दावणीला बांधत असे. पण श्री जरंगे पाटील
यांनी आरक्षणाच्या निमित्ताने सर्व
मराठा समाज एका छत्राखाली आणला. आज त्यांची गर्दी पाहिली असता मराठा समाजाची
ताकत सारा देश पाहत आहे. या नेत्यात इतके गुरुत्वाकर्षण आहे
की झोपडी ते बंगला यातून प्रत्येक मराठा या नेत्याच्या सभेसाठी गर्दी करीत आहे. कारण आता हीच व्यक्ती आरक्षण
मिळवून देणारी आहे असा ठाम विश्वास जनतेत निर्माण झाला आहे.श्री. जरांंगे पाटील यांनी एका दिवसात अनेक सभा घेऊन रेकॉर्ड निर्माण केले आहे. त्यांना कोणतेही राजकीय, शासकीय पद
नसताना तसेच लाल दिव्याची गाडी नसताना त्यांच्या संरक्षणासाठी पोलिस ताफा मागेपुढे असतो. त्यांच्यावर मराठा
समाजाचे इतके प्रेम आहे की
जेसीबी ने त्यांच्यावर प्रत्येक गावी
पुष्वृष्टी होत असते. इतके अतिभव्य स्वागत कोणत्याही नेत्याच्या नशिबी आले नसावे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे गर्दीच्या
ठिकाणी गाडीखाली उतरून समाज बांधवांना प्रत्यक्ष भेटतात .साहजिकच त्यांच्या विषयी मराठा समाजात अतिशय
जिव्हाळा निर्माण झाला आहे. इतके जीवापाड प्रेम कोणत्याही
मराठा नेत्याला लाभले नाही. याचे
कारण म्हणजे त्यांनी समाजासाठी केलेला त्याग होय .
जे नेते मुख्य मंत्री पदावर होते , मंत्री होते, मोठ्या राजकीय पदावर आहेत आज त्यांना मराठा
समाज विसरला असून खरा महाराष्ट्राचा नेता म्हणून श्री. मनोज जरांगें पाटील यांच्याकडे
पाहत आहे इतका विश्वास त्यांनी
संपादन केला आहे .
खान्देश सम्राट संपादक हेमंत जगदाळे धुळे
3 thoughts on “मराठांना झालंय तरी काय?”